स्थानिक बातम्या

lonar sarovar mystery 1 : जागतिक लोणार सरोवर !

Lonar Sarovar : जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर

lonar sarovar : चालुक्य, यादव, मोगल काळातही लोणारला महत्व होते. संपूर्ण लोणार तालुक्याला ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्व व वारसा लाभलेला आहे. यामुळे जागतिक अभ्यास केंद्र म्हणून लोणार सरोवराची एक नवी ओळख निर्माण होत आहे.

lonar sarovar लोणार सरोवर हे महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले उल्कापातामुळे तयार झालेले निसर्गनिर्मित खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराच्या परिसरात घनदाट जंगल असून अप्रतिम शिल्पकृती असलेले ऐतिहासिक प्राचीन धार्मिक मंदिर आहेत. तसेच सरोवर परिसरात विविध प्राणी, पक्षी, जीवाणू आणि दुर्मिळ वनस्पती आढळून येतात.

Lonar Sarovar
लाल रंगाचे पाणी झालेले लोणार सरोवर

lonar sarovar लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजीकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या सारख्या संस्थांनी सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

लोणार हे औरंगाबाद पासून सुमारे 160 किमी, अकोला पासून 130 आणि बुलढाणा पासून 100 किमी अंतरावर आहे. लोणार सरोवराच्या काठापासून काही अंतरावर लोणार हे शहर वसलेले आहे. लोणार शहरात पोहचण्यासाठी खाजगी वाहतूक तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने यावे लागते. मलकापूर, शेगाव, खामगाव, परतूर, जालना, अकोला, वाशीम हे जवळचे रेल्वे स्थानक आहेत.

lonar sarovar सरोवर कसे तयार झाले, यावर विविध मते नोंदवण्यात आलेली आहेत. काही मतांनुसार अंदाजे 170 ते 200 फुट व्यास असलेली तब्बल दोन कोटी वजनाची अशनी 20 किमी प्रति सेकंद वेगाने आदळून लोणार सरोवर तयार झाल्याचे सांगण्यात येते. तर काहींचे आध्यात्मिक मते वेगळे आहेत.

lonar sarovar लोणार सरोवराचा परीघ हा सुमारे 8 किलोमीटर असून सर्व बाजूंनी 60 ते 70 अंश उतार आहे. सरोवराच्या काठापासून खाली उतरल्यावर साधारण 4 किलोमीटर परीघ असलेले आणि समुद्राच्या पाण्यापेक्षा काही जास्त पट खारे असलेल्या पाण्याचे सरोवर लागते. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे – हिरवे शेवाळे आढळून येतात.

सरोवराच्या परिसरात पसरलेल्या घनदाट जंगलात विविध प्रकारचे दुर्मिळ फुलपाखरे, पक्षी, प्राणी तसेच जीवाणू वास्तव्य करत असल्याचे दिसून येते. याठीकाणी असलेले वनस्पती, झाडे यावर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल एवढी निसर्ग संपन्नता आहे.

लोणार सरोवर परिसरात हजारो वर्षापूर्वी बांधलेली पुरातन मंदिरे आहेत. मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. मंदिरावरील शिल्पकृती आणि कोरीव कामांचा अभ्यास करून संशोधन केल्यास ऐतिहासिक आणि वैज्ञानिक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो असे काही अभ्यासू व्यक्तींचे मत आहे. सदरील मंदिरे पुरातत्व विभागाच्या अधीन आहेत. काही मंदिराची पडझड झालेली दिसून येते. यामुळे या ऐतिहासिक व पौराणिक वारसाचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्व  विभागाच्या वतीने सुरु असल्याचे दिसून येते.

sculpture
दैत्यसुदन मंदिरावरील शिल्प

लोणार हे एक पौराणिक महत्व असलेले ठिकाण आहे. लोणार गावाचा उल्लेख पदम पुराण, स्कंद पुराण व विरज महात्म्य मध्ये असल्याचे सांगण्यात येते. लोणार पूर्वी विरज तीर्थ तथा विष्णू गया म्हणून ओळखल्या जायचे. लोणार येथे 32 मंदिर, 17 स्मारक, 13 कुंड, 4 पाण्याचे प्रवाह आहेत. यापैकी 27 मंदिर, 03 स्मारक, 07 कुंड, 04 पाण्याचे प्रवाह लोणार सरोवराच्या lonar sarovar  कडावर व मध्ये आहेत. यादव काळातील काही मुख्य बाजारपेठेच्या शहरामध्ये लोणारचे सुद्धा नाव होते. मुघल बादशहा अकबरला  लोणार येथे तयार होणारे साबण पुरविले जायचे असा उल्लेख ऐन अकबरी पुस्तकामध्ये असल्याचे सांगण्यात येते. मीठ, काच, बिबासाठी लोणार बाजारपेठ प्रसिद्ध होती.

सरोवराच्या परिसरात असलेले घनदाट जंगल हे वन्यजीव अभयारण्य विभागाच्या अधीन आहे. सरोवर निसर्गाच्या विविधतेने संपन्न असल्याने लोणार अभयारण्य नावाने ही ओळखले जाते. वन्यजीव विभाग पक्षी, प्राणी व इतर तस्तम जीवांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याने परिसरात राष्ट्रीय पक्षी मोर सरार्स पाहायला मिळतो. बिबट्या, कोल्हे, निलगाई, रानडुकर, ससा, हरण, तडस, मुंगुस, साप, सायाळ, माकड असे विविध प्राणी सरोवर परिसरात दिसतात.

Nilpankh
निलपंख

स्वर्गिय नर्तक, पोपट, कोकिळा, रातवा, कबुतर, पारवा, चिमणी, घुबड, भरतद्वाज, रेड मुनिया, स्लीव्हर मुनिया, किंगफिशर, मैना, सात भाई, टिटवी, कावळा, बार्बेट, निलपंख, हुदहुद, खाटिक, चातक, वेडा राघू, कोतवाल, सुगरण, तुरेवाला चंडोल, लावा, माळ टिटवी, शिक्रा, डोंबारी, धावीक, गप्पीदास, तालवारी, पाकोळी, युरेशियन चिमनमार, कापशी घार, शिपाई बुलबुल, चस्मेवाला, तांबट, दयाळ, नाचण, राखी वाटवटया, शिंजीर, शिंपी, शुभग, हरेल, हळद्या, टिकेलचा निळा मासीमार  असे विविध पक्षी सरोवर परिसरात आढळतात. तसेच हंगामी काळात परदेशातील पाहुणे पक्षी सुद्धा सरोवरात वास्तव्याला असतात.

 

Daitysudan Temple
दैत्यसुदन मंदिर

lonar sarovar सरोवराकडे जाणारा एकमेव धावता स्त्रोत म्हणजे धारतीर्थ होय. धारतीर्थ परिसरात अनेक अप्रतिम मंदिर व शिल्प आहेत. त्याचप्रमाणे आवर्जून पहावे असे शहरातील दैत्यसुदन मंदिर आहे. चालुक्य काळात १२ व्या शतकात हे मंदिर बांधले गेले असावे असा अंदाज आहे. मंदिरात भगवान विष्णू ची मूर्ती असून संपूर्ण मंदिर हे शिल्पांनी सजलेले आहे. विशेष म्हणजे मैथुन शिल्पेही याठिकाणी पाहायला मिळतात. शहरापासून काही अंतरावर मोठा मारोती मंदिर आहे. मंदिर परिसर विशेष चुंबकीय क्षेत्र दाखवतो.

 

lonar sarovar

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button