राजकीयस्थानिक बातम्या

1 Powerful ;विराट कल्पवृक्ष श्री आश्रूजी मापारी

आदरणीय 'बाप्पू' शतायुषी होवोत !

Powerful : श्री. आश्रुजी मापारी यांना पंचक्रोशीतील सर्व लहानथोर ‘बाप्पू’ या प्रेमळ नावानेच हाक मारतात आणि ओळखतात. आदरणीय ‘बाप्पू’ शतायुषी होवोत आणि आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने आम्हाला समृद्ध करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु।

Team Lonar News : किशोर मापारी, लोणार.

शब्दरचना व लेखक : प्रा.डॉ. राहुल पाटील, (एम्. ए., पीएच्. डी.).

Powerful विराट कल्पवृक्ष : श्री. आश्रूजी मापारी

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति ।

देह कष्टविती परोपकारें॥

लोणार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘हरिप्रभा’ ही भव्य वास्तू आहे. कोणत्याही रसिक आणि मर्मज्ञ माणसाला ‘नितांतसुंदर’ असं म्हणायला भाग पाडेल इतकी भव्य आणि सुंदर. या वास्तूत प्रवेश केल्यावर आपण एखाद्या मंदिरात जातो आहोत की काय असा भास होतो. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर चार पायऱ्या चढून आत हॉलमध्ये तुम्ही प्रवेश करता. चारही बाजूंनी सोफे मांडलेले, शेजारीच एक प्रशस्त बैठक आणि समोरच काही अंतरावर राधाकृष्णाची अत्यंत सुबक व रेखीव अशी मूर्ती असलेलं एक छोटेखानी मंदिर. मांगल्य आणि वात्सल्याचा मिलाफ असलेल्या या वातावरणात तुम्हाला या वास्तूपेक्षाही भव्य वाटणारी एक असामी दिसते, त्यांचं नाव श्री. आश्रूजी धोंडूजी मापारी. मात्र या नावाने त्यांना फार कमी लोक ओळखतात. शहरातील सर्व लहानथोर त्यांना ‘बाप्पू’ या प्रेमळ नावानेच हाक मारतात आणि ओळखतात. (Powerful)

Powerful15 जुलै 1940 ला जन्मलेले आणि यंदा केवळ 85 वर्षांचे होणारे बाप्पू हे एक अविश्वसनीय रसायन आहे. प्रचंड संपत्ती, प्रचंड प्रतिष्ठा आणि राजकारणात हेवा वाटेल इतकं जोरदार वजन. स्वभावतः पुण्यामुंबईकडे असं कोणी वजनदार व्यक्तिमत्त्व असेल तर स्वभावात गुर्मी आणि अहंकार हा ठरलेलाच. पण बाप्पूंना बघून आपला समज अगदी 100 टक्के बदलतो. देवाने इतकं भरभरून सगळं दिलेलं असूनही इतकी विनम्रता आणि समाजातील लहानात लहान घटकालाही मायेने गळ्याशी लावण्याचा उदारपणा बाप्पूंनी कसा काय जोपासला, याचं नवल वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी गावचा कारभार बघितला. त्यांच्या शब्दाला राजकारणात आणि समाजकारणात असलेलं वजन अद्यापही अबाधित आहे. (Powerful)

शहरासंबंधी कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी ती बाब बाप्पूंच्या कानावर टाकण्याची परंपरा कित्येक दशकांपासून अक्षुण्ण आहे. या वयातही ते शारीरिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक या सर्व अंगांनी पुरेपूर सक्रिय आहेत. या वयातील त्यांची ऊर्जा खरोखरच कौतुकाचा विषय ठरावी. (Powerful)

संसार हा नेहमी द्वंद्वात्मक असतो. पुरुषाला पूर्णत्व आणण्यासाठी प्रकृतीची गरज असते, तसेच पतीला पूर्णत्व आणायला पत्नीची. बाप्पू हे कृष्णभक्त. भगवद्गीतेचे उपासक; पण ज्या भगवद्गीतेची आराधना बाप्पूंनी तहहयात केली आणि ज्या गीतेविषयी कृतज्ञता म्हणून त्यांनी उत्सव सुरू केला, त्या गीतेच्या नावाची अर्धांगिनी त्यांना मिळाली हाही एक विलक्षण योगायोग. सौ. गीताबाई आश्रूजी मापारी उर्फ आई या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणून गेली कित्येक दशके त्यांचा संसारवृक्ष फुलत गेला. आईही तब्बल 80 वर्षांच्या आहेत.  मात्र पतीविषयी निष्ठा, समर्पणाचा भाव आणि अपत्यांचं संगोपन करताना जपलेला करारीपणा कुणालाही बघायचा असेल तर एकदा हरिप्रभामध्ये जाऊन आईंची भेट अवश्य घ्यावी. जन्म देणाऱ्या आईखेरीजही आपली वात्सल्याने चौकशी करणारी मोठी आईही तिथे आपल्याला मिळेल. (Powerful)

लेकुराचे हित। पाहे माऊलीचे चित्त॥

ऐसी कळवळ्याची जाती। करी लाभाविण प्रीती॥

Powerfulबाप्पूंना बघून स्वर्गातील एका विशाल कल्पवृक्षाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण काहीही मागितले तर मिळते असे म्हणतात. त्याचप्रमाणे बाप्पूंकडे कोणीही आपली अडचण घेऊन आला तर ती सोडवण्याचा यत्न त्यांनी आयुष्यभर केलेला आहे.  ‘यत्न तो देव जाणावा’  ही उक्ती त्यांच्याकडे बघूनच कुणाला सुचली असावी. या कल्पवृक्षाचा विस्तारही वंशवृक्षरूपाने समृद्ध झाला. त्यांचे ज्येष्ठ पुत्र आदरणीय श्री. प्रकाशभाऊ मापारी यांचे नाव माहिती नसलेली व्यक्ती पंचक्रोशीत सापडणे असंभव. आपल्या सच्चरित्र वृत्तीने आणि निस्वार्थ भावनेने त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुल्य आहे. राजकारणातील खरे किंगमेकर म्हणून त्यांना एक ऋषितुल्य स्थान प्राप्त झाले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून प्रकाशभाऊंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संस्थेला आणि संलग्नित शाळांना एका उत्तुंग मापदंडावर स्थापित केले. (Powerful)

बाप्पूंचे द्वितीय पुत्र श्री. राजेशभाऊ मापारी हे केवळ शेतीनिष्ठ शेतकरीच नव्हे, तर कर्मयोगी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांचा कामाचा उरक आणि शेतीचे प्रभावी व्यवस्थापन MBA झालेल्या लोकांनाही खाली बघायला लावेल इतके दर्जेदार आहे. शेती आणि तत्संबंधी इतर गोष्टींसाठी त्यांचे मार्गदर्शन घ्यायला विविध भागांमधून लोक त्यांना भेटायला येतात.

बाप्पूंचे तृतीय चिरंजीव श्री. किशोर उर्फ नंदुभाऊ मापारी हे समाजसेवेचा अत्युच्च मापदंड म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. जेव्हा कुठेही काहीही उपाय चालत नाही, तेव्हा हतबल शेतकऱ्यांपासून तर प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत सर्वांना नंदुभाऊ हक्काचा आधार म्हणून पुढे येतात आणि कितीही कठीण समस्या असली तरीही मार्गी लावतात. शिवछत्र मित्र मंडळाचे ते अध्यक्ष असून मेडिकल व्यवसायातील एक यशस्वी उद्योजकही आहेत. (Powerful)

बाप्पूंचे सर्वात धाकटे पुत्र श्री. विनायकभाऊ मापारी हे लोणारातील कापड व्यवसायातील फार मोठे व्यावसायिक आहे. त्यांचे ‘विनायक कापड केंद्र’ हा तालुक्यातील अनेकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरलेले आहे. एक दिलखुलास आणि आपलं व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांचे ते अत्यंत लाडके आहेत. क्रिकेटसंबंधी त्यांची आवड आणि तरुणाईला एकत्र बांधून ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती अजोड आहे. पुत्ररत्नांच्या या कोंदणात एक अमूल्य कन्यारत्नही घराची शोभा वाढवणारं ठरलं आहे.

Powerfulसौ. संगीताताई हे बाप्पूंचे लाडके कन्यारत्न. अकोल्याला स्थित असणाऱ्या प्रा. परशराम कुळसुंदर यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांनी गृहिणीची जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडली. बाप्पूंकडून आलेला कणखरपणा, सासर आणि माहेर दोन्हीही बाजूंनी मोठ्या घरण्यातील असूनही जपलेला नम्रपणा आणि शिस्तप्रियता ही ताईंची ओळख सर्वत्र आदर्श मानली जाते. कोणत्याही समारंभात त्या भेटल्यावर जाणवणारा आपलेपणा हा नेहमी समृद्ध करणारा अनुभव असतो. (Powerful)

सध्या विभक्त कुटुंब हा प्रकार सर्वत्र दिसतो. सामान्यपणे दोन भाऊ एकत्र राहणे इथे दुरापास्त; पण या कुटुंबात आई-बाप्पू यांच्यासह दुसऱ्या पिढीतील चार जोड्या, तिसऱ्या पिढीतील उर्वरितांसह आठ जोड्या आणि चौथ्या पिढीतील बालगोपाल असे तब्बल 30-35 जण आजही एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांच्या सुखदुःखात सदैव हजर असतात, एकत्र असतात. जिल्ह्यातील, नव्हे महाराष्ट्रातील हा एक चमत्कारच मानायला हवा. जीवनाच्या सर्व क्षेत्रात चौफेर यशस्वीपणे वावरणाऱ्या मापारी परिवाराची पताका एकत्रित कुटुंबरूपाने सर्वत्र डौलाने फडकते आहे.दुसरी पिढी बाप्पूंनी आपल्या सत्वाच्या आणि तत्त्वाच्या जोरावर यशस्वी केली. त्यापेक्षाही कांकणभर जास्त तिसरी पिढी आपापल्या कार्यकर्तृत्वक्षेत्रावर यशस्वी भरारी मारत आहे. हे सर्व केवळ त्याग, निष्ठा आणि समर्पण यांच्याच जोरावर होऊ शकते. (Powerful)

सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयांचे।

परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥

भगवंताचे अधिष्ठान असल्याशिवाय सर्व व्यर्थ. ही गोष्ट बाप्पूंनी कायम स्मरणात ठेवली आणि मुळातच त्यांची अध्यात्मपर प्रकृती होती, तिच्याकडे उत्तरायुष्यात जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. मापारी परिवारातर्फे दरवर्षी ‘गीताजयंती उत्सव’ साजरा केला जातो. या उत्सवात कीर्तनसेवा, प्रवचनसेवा आणि अन्नदानसेवा केली जाते. समाजहिताचे कार्यक्रमही राबवले जातात.

Powerfulबाप्पूरूपी हा कल्पवृक्ष अनेक वर्षांपासून अनेक वादळांना तोंड देत समर्थपणे उभा आहे. या वृक्षाच्या छायेखाली असंख्य वाटसरूंना हक्काची छाया आणि आधार मिळत गेलेला आहे. या कल्पवृक्षाचा विस्तारही अचंबित करणारा आहे. वाशिम जिल्ह्यातील अत्यंत प्रबळ मानले गेलेले त्यांचे व्याही स्व. श्री. रामरावजी झनक, माजी मंत्री स्व. श्री. सुभाषरावजी झनक आणि रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. अमित झनक अशी सलग तीन पिढ्यांची परंपरा असो किंवा बुलडाण्याचा अभेद्य प्रतापगड म्हणून ज्यांची ख्याती आहे असे केंद्रीय मंत्री खा. श्री. प्रतापराव जाधव यांचे घराणे असो, यांच्यासारख्या अनेक प्रभावी प्रतिभावंतांची प्रभावळ बाप्पूंनी आपल्या प्रेमाच्या, सौहार्दाच्या आणि अक्षुण्ण स्नेहाच्या जोरावर एकत्र आणली आणि जोपासली. (Powerful)

आजही ज्या आदराने एखादा सामान्य कार्यकर्ता हरिप्रभाला आल्यावर बाप्पूंचे दर्शन घेतो, अगदी त्याच आदराने वाशिम जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव मतदारसंघाचे आमदार श्री. अमित झनक किंवा लोणार मेहकर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. संजयजी रायमूलकर किंवा जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री असलेले त्यांचे भाचे श्री. प्रतापराव जाधव घरी आल्यावर त्यांचे दर्शन घेतात. दोन्ही ठिकाणी सारखाच जीव लावणारे आणि आधार देणारे आमचे लाडके बाप्पू शतायुषी होवोत आणि आपल्या अमूल्य मार्गदर्शनाने आम्हाला समृद्ध करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु।

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button