1 Remarkable ! Education with the help of AI : भारत देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शिक्षण क्षेत्रातही होतोय, हि बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल.
केरळ मध्ये शाळेत शिकवणार AI शिक्षक !
गेल्या काही वर्षापासून विदेशाप्रमाणे भारतातहि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. या क्षेत्रात रोज नवनवीन बदल होताना दिसत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भारतातही शिक्षण क्षेत्रातही होतोय हि बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल. भारतातील केरळ हे पहिले राज्य बनले आहे, जिथे AI च्या मदतीने शिक्षण दिले जात आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने शिक्षण देण्यासाठी एका ह्युमनॉइड रोबोटचा वापर करण्यात येत आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात या AI शिक्षकाचा गेल्या महिन्यातच समावेश करण्यात आला. हा AI शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. साडी घालून शिकवणाऱ्या या महिला रोबोट शिक्षकाचे नाव ‘आयरिस’ आहे. या रोबोटमध्ये अनेक फीचर्स आहेत. AI रोबोट आणणाऱ्या कंपनी ‘MakerLabs Edutech’ च्या मते ‘आयरिस’ (Iris) ही केरळमधील, नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह AI शिक्षक आहे. (Education With The Help of AI)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘आयरिस’ (Iris) तीन भाषांमध्ये बोलू शकते आणि विद्यार्थ्यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे अगदी सहज आणि सोप्या भाषेत देऊ शकते. ChatGPT सारख्या प्रोग्रॅमिंगपासून बनवलेले आयरिसचे नॉलेज बेस इतर ऑटोमॅटिक शिक्षण साधनांपेक्षा खूप प्रगत आहे.
MakerLabs च्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना ड्रग्ज, सेक्स आणि हिंसा यासारख्या विषयांची माहिती देण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. MakerLabs चे सीईओ हरी सागर म्हणाले की, AI च्या वापरातुन अनेक गोष्टी करता येतात. विद्यार्थी प्रश्न विचारतात तेव्हा आयरिस मानवाप्रमाणे उत्तरे देते. AI सह शिकणे मजेशीर असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 हजारांहून अधिक विद्यार्थी असलेल्या सदरील शाळेतील पुढील शैक्षणिक सत्रात जनरेटिव्ह एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याची योजना आहे.
(Education With The Help of AI)
केरळ राज्य सरकारनं सुरू केला ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ !
मनोरंजन क्षेत्रामध्ये केरळ सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकताना ‘सीस्पेस’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला सुरूवात केली आहे. स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करणारे केरळ हे भारत देशातील पहिलेच राज्य बनले आहे. या प्लॅटफॉर्मुळे मल्याळी सिनेमाला एक निर्णायक वळण मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री पी. विजयन यांनी प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केला. या प्लॅटफॉर्मचे नियंत्रण केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाकडे (केएसएफडीसी) असेल.
केरळ राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले की, ‘‘ मुख्य चित्रपट उद्योगाला क्षती न पोचविता प्रादेशिक चित्रपट आणि सांस्कृतिक मूल्यांना प्राधान्य देण्यात येईल. खासगी ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्देश केवळ नफा कमावणे हा असल्याने त्यावरून तशाच प्रकारचे चित्रपट आणि मालिका प्रसारित करण्यात येतात.
(Education With The Help of AI)
सीस्पेस च्या माध्यमातून घरातील सर्वच सदस्यांना एकत्र बसून पाहता येणारे कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न राहील. बहुतांश ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगामध्ये ज्या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात केवळ त्याच भाषांतील कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात येते. प्रादेशिक पातळीवरील कलात्मक आणि सांस्कृतिक मूल्यांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या कार्यक्रमांचे सदरील प्लॅटफॉर्मवरून प्रसारण करण्यात येईल. मल्याळी भाषा आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा प्रचार या प्लॅटफॉर्मवरून करण्यात येईल.’’
जे चित्रपट याआधीच रिलीज झाले आहेत, तेच चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. त्यामुळे मुख्य चित्रपट उद्योगावर त्याचा कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. चित्रपट निर्माते आणि प्रदर्शित करणारे यांच्या हिताला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता चांगल्या चित्रपटाला प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येईल. ज्या चित्रपटांना प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत तेच चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. (Education With The Help of AI)
याबाबत माहिती देताना केएसएफडीसीचे अध्यक्ष शाजी एन म्हणाले की, या प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट निर्मात्यांना क्राउड फंडिंगचा मार्ग मोकळा होईल. चित्रपटांना मिळणारा नफा आणि त्यांना लाभलेली दर्शकसंख्या यामध्येही पारदर्शकता येऊ शकेल. या फ्लॅटफॉर्मवरून नेमके कोणते चित्रपट प्रसारित केले जावेत, हे ठरविण्यासाठी साठ सदस्यांचे एक वेगळे मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. कोणताही चित्रपट या प्लॅटफॉर्मवर येण्याआधी त्याचे कलात्मक अंगाने मूल्यमापन करण्यात येईल त्यानंतरच तो अपलोड करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
३५ चित्रपट, ६ माहितीपट, १ लघूपट, या प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. एका चित्रपटासाठी साधारणपणे ७५ रुपये एवढे शुल्क द्यावे लागेल. माहितीपट आणि लघूपटासाठी तुलनेने कमी शुल्क आकारले जाईल. यातील अर्धी रक्कम कंटेंट प्रोव्हायडरला मिळू शकेल. या प्लॅटफॉर्मचे ‘सीस्पेस’ हे अॅप प्लेस्टोअर आणि अॅपस्टोअरमधून डाउनलोड करता येणार आहे. (Education With The Help of AI)
WhatsApp चे एक नविन फीचर !
WhatsApp हे एक असे अँप आहे जे सतत आपल्याला काही ना काही नवीन फिचर देत असतं. काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, व्हॉट्सॲपमध्येही तारखेनुसार मेसेज सर्च करता येऊ शकतात. याशिवाय, एका नवीन रिपोर्टनुसार, ताज्या अपडेटमध्ये लवकरच स्टिकर एडिटर हे फीचर येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, Meta च्या या ॲपमधील स्टिकर एडिटर फीचर सध्या अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी रिलीज करण्यात आले आहे. हे फिचर वापरण्यासाठी, आपल्याला WhatsApp चे नवीन अपडेट (Version 2.24.6.5) इन्स्टॉल करावे लागेल. (Education With The Help of AI)
WhatsApp एक नवीन टूल आणत आहे, ज्याच्या मदतीने कोणताही फोटो स्टिकरमध्ये बदलवता येऊ शकतील. हे करणे अगदी सोपे राहू शकते. आपल्याला फक्त स्टिकर कीबोर्डवर जावे लागेल आणि तेथे “create” पर्याय निवडावा लागेल. अथवा तो फोटो थेट उघडून , वर असलेल्या तीन डॉट्सवरील मेनूवर जाऊन आणि तेथून “create sticker” सिलेक्ट करता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार आधीपासून अस्तित्वात असलेले स्टिकर्स सुद्धा एडीट (Edit) करता येतील. कोणतेही स्टिकर निवडल्यावर, WhatsApp आपोआप ड्रॉईंग एडिटर उघडेल, जे त्या फोटोचा मुख्य भाग फोकसमध्ये आणेल. त्यानंतर एडिट करून तो स्टिकर बनवून दाखवला जाईल. स्टिकर आवडत नसल्यास, स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या पर्यायांमधून दुसरा स्टिकरची निवड करता येईल.
(Education With The Help of AI)
मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, युजर्सना नवीन फिचरचा फायदा होईल. ते आता त्यांच्या फोटोंमधून स्वतःचे स्टिकर्स तयार करू शकतील. याद्वारे, ते त्यांच्या आवडीनुसार स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतील असे टीमकडून सांगितले जात आहे. तसेच, त्यांना इतर कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची किंवा बाहेरून स्टिकर्स शोधण्याची आवश्यकता पडणार नाही.
(Education With The Help of AI)
TikTok संदर्भात अमेरिका काय निर्णय घेणार !
भारताचे चीनसोबतचे राजकीय संबंध तणावाचे झाल्यानंतर, 2020 मध्ये भारताने चिनी अॅप टिक-टॉकवर बंदी घातली होती. आता अमेरिकेतही या अॅपवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अमेरिकन संसदेत खासदारांनी मांडलेल्या विधेयकात चिनी कंपनी टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. ‘द प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन ॲडव्हर्सरी कंट्रोल्ड ॲप्लिकेशन्स अॅक्ट’ मध्ये कंपनीवर चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि अॅपमुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Education With The Help of AI)
हाऊस सिलेक्ट कमिटीचे अध्यक्ष आणि कायद्याच्या लेखकांपैकी एक, माईक गॅलाघर यांनी कंपनीला एका प्रेस स्टेटमेंटमध्ये इशारा दिला की, हा माझा TikTok ला संदेश आहे, CCP (चीनी कम्युनिस्ट पार्टी) सोबत संबंध तोडा किंवा तुमचा अमेरिकेतील व्यवसाय बंद करा. अमेरिकेतील एका मोठ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्ही अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला देऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
संसदेत सादर केलेल्या विधेयकात टिक-टॉकचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. परंतु हे विधेयक अमेरिकेच्या शत्रू देशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी एक व्यापक फ्रेमवर्क तयार करते. वॉशिंग्टनने शत्रू देश म्हणून लेबल केलेल्या देशांमध्ये चीन, रशिया, इराण, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. (Education With The Help of AI)
कृष्णमूर्ती, ज्यांनी हे विधेयक सादर केले, त्यापैकी एक, म्हणाले की, रशिया असो किंवा सीसीपी, हे विधेयक हे सुनिश्चित करते की राष्ट्रपतींना धोकादायक अॅपवर कारवाई करण्याचा आणि आमच्या प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अमेरिकन लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. अमेरिकेत जर हे विधेयक मंजूर झाले, तर ByteDance कडे TikTok विकण्यासाठी फक्त ५ महिने असतील. जर कंपनी तसे करू शकली नाही तर ते अमेरिकेतील Apple Store आणि Google Play Store वरून काढून टाकले जाईल.
अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी एका रिपब्लिकन पक्षाने आणलेल्या विधेयकात टिकटॉकवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, याशिवाय सिनेटरने एक कायदाही आणला होता, मात्र दोन्ही विधेयके मंजूर होऊ शकली नाहीत. (Education With The Help of AI)
सोशल मिडिया युजर्सला धाकधूक !
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ठप्प पडले होते. तर काहींना युट्युब आणि एक्सपर्यंत पोहोचणेही अशक्य झाले. अकाउंट मधून अचानक लॉग आऊट झाल्यामुळे युजर्स बुचकुळ्यात पडले होते. तासाभरात सेवा पूर्ववत करून देण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे ट्विटर आणि व्हाट्सअप या सोशल मीडियावर या प्रसंगाचे मीम्स प्रचंड वायरल झाले.
सोशल मीडियावर सर्वाधिक युजर्स असलेले फेसबुक इंस्टाग्राम आणि एक्स या अकाउंट वापरणाऱ्यांचे मंगळवारी रात्री नऊ वाजता ऑटोमॅटिक लॉग आऊट झाले होते. अचानक फेसबुक मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा लॉगिन करण्यास अडथळे येत असल्याने एकमेकांकडे चौकशीही करण्यात आली. प्रत्येकालाच अडचण येत असल्याने सर्वरचा काही प्रॉब्लेम असेल असा विचार करून युजर्सनी या क्षणाचा मीम्सच्या माध्यमातून आनंद घेतला. तर रशियन हॅकर्स, ब्रिज ऑफ ट्रस्ट, का डिजिटल वॉर याबाबत सायबर तज्ज्ञ विविध मत बांधत आहेत. (Education With The Help of AI)
थेट लॉग आऊट होणं धोक्याची घंटा
सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांना फेसबुक आणि इंस्टाग्राम अधिक सुरक्षित वाटते. एन्ड टू एन्ड इनस्क्रिप्शन असल्यामुळे येथे वापरकर्त्याची प्रायव्हसी उत्तम पद्धतीने राखली जात असल्याने या सोशल मीडियावर कोट्यावधींचा भरोसा आहे. मंगळवारी रात्री अचानक फेसबुक मधून सर्वजण लॉग आऊट झाल्यानंतर या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच वेळी जगभरातील अकाउंट ऑटोमॅटिक लॉग आऊट होणं याचाच अर्थ सिक्युरिटी कॉम्प्रमाईज झाली असं सायबर तज्ज्ञ सांगतात.
(Education With The Help of AI)
डिजिटल वॉरची नांदी की रशियन हॅकर्सचा प्रताप
फेसबुक आणि इंस्टाग्राम हे मेटाचे दोन्ही प्लॅटफॉर्मचे सर्वर अत्यंत सुरक्षित मानले जातात. मेटाकडे स्वतःचे सर्वर फार्म आहेत. हजारो हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या सर्वर फार्मची कडेकोट सुरक्षा व्यवस्था कोणी छेदली का? यावरही आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासणी सुरू आहे. (Education With The Help of AI)
जागतिक स्तरावर अस्तित्व असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सुरक्षितता भेदणे सोपे नाही. शहरापेक्षा अधिक मोठ्या भागात स्वतःच्या मालकीचे फार्म सर्वर असलेल्या मेटाच्या तांत्रिक सुरक्षिततेवर युजर्स कडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत जगभरातील सायबर तज्ञ लवकरच आपले निष्कर्ष मांडतील.
-जय गायकवाड, सायबर तज्ज्ञ.