स्थानिक बातम्या

1 Science Festival is an effective strategy

Science Festival : बनमेरू विज्ञान महाविद्यालयामध्ये सातवा राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात साजरा !

Science Festival : विज्ञान महोत्सव म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित सह सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.

बनमेरू विज्ञान महाविद्यालयामध्ये सातवा राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सव उत्साहात साजरा !

स्थानिक कै कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार येथे राष्ट्रीय विज्ञान दिन आणि लोणार सरोवर संवर्धन जनजागृती या उद्दिष्टाने दिनांक 04 आणि 05 मार्च 2024 रोजी सातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन कै कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार व लोणार सायन्स सेंटर-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार, नारायणराव नागरे महाविद्यालय- दुसरबीड, बुरुंगले महाविद्यालय शेगाव, आर. ए. महाविद्यालय वाशिम, जिजामाता महाविद्यालय बुलढाणा आणि विमुक्त फाउंडेशन पुणे यांच्या सहयोगाने संपन्न झाले.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalसातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवास मा.डॉ. पंडित विद्यासागर (माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड), मा. सौ. उषाताई गोले (अध्यक्षा, अमृत सेवाभावी संस्था परभणी), डॉ. प्रसाद वाडेगावकर, (प्र- कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ), डॉ. संजय ढोले (पुणे विद्यापीठ), डॉ. विजय नागरे (व्यवस्थापन परिषद सदस्य अमरावती विद्यापीठ), डॉ. संतोष बनमेरू (सचिव,अमृत सेवाभावी संस्था परभणी), प्रमुख आयोजक डॉ. प्रकाश बनमेरू (प्राचार्य, बनमेरू महा. लोणार), डॉ.यादवकुमार मावळे (विभागप्रमुख भूगर्भशास्त्र विभाग अमरावती विद्यापीठ आणि समन्वयक, लोणार सायन्स सेंटर ,लोणार), डॉ. ओमप्रकाश झंवर (प्राचार्य आर. ए. महा. वाशिम), डॉ. आर ई खडसान (प्राचार्य, बुरुंगले महाविद्यालय शेगाव), डॉ. प्रशांत कोठे (प्राचार्य जिजामाता महा. बुलढाणा), डॉ. विजय दाभाडे व डॉ. सिद्धार्थ पैठणे (सदस्य अमृत सेवाभावी, संस्था, परभणी) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

(Science Festival is an effective strategy)

विज्ञान महोत्सवाची सुरुवात विज्ञान ज्योत रॅली ने झाली. सदर रॅली ची सुरुवात लोणार धारतीर्थ येथून करण्यात आली. या रॅलीमध्ये विज्ञान ग्रंथ दिंडी, डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा, अमळनेर, मिसाईल, उपग्रह इत्यादींचे मॉडेल तसेच सी व्ही रमण, संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषा साकारलेली विद्यार्थी यांचा समावेश होता. रॅलीचा समारोप झाल्यानंतर रीतसर सातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी प्रास्ताविक सादर करताना प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी लोणार विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात मागचा संपूर्ण हेतू स्पष्ट केला आणि उपस्थितांना लोणार विज्ञान महोत्सवाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि जागतिक कीर्तीच्या रामसर दर्जा प्राप्त लोणार सरोवराचे संवर्धन व्हावे यासाठी महाविद्यालय प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalसातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाचे उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉ. पंडित विद्यासागर यांनी लोणार येथे विज्ञान संशोधन केंद्र सुरू व्हावे, ही संकल्पना पहिल्या विज्ञान महोत्सव मध्ये मांडली होती व त्या दृष्टीने असे केंद्र आता सुरू होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त केला. विज्ञान महोत्सवाची व्याप्ती वाढत असून येणाऱ्या काळात हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळी पर्यंत जाईल असा आशावाद व्यक्त केला.

सातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवामध्ये प्रमुख अतिथी मार्गदर्शन मध्ये प्रा.कुलगुरु प्रसाद वाडेगावकर यांनी सहा महाविद्यालये व अमरावती विद्यापीठ एकत्र येऊन हा लोणार महोत्सव साजरा करत आहे आणि येऊ घातलेल्या क्लस्टर पद्धतीप्रमाणे हे आयोजन केले ही खूप अभिमानास्पद बाब आहे असं नमूद केले. विद्यापीठाने सुरू केलेल्या सायन्स सेंटर लवकरच कार्यन्वित करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच या महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थांना सीबीसीएस पद्धतीत क्रेडिट दिले जातील हे नमूद केले.

(Science Festival is an effective strategy)

सातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवामध्ये  मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. संजय ढोले यांनी ह्या विज्ञान महोत्सवातून चांगल्या संकल्पना समोर येत आहेत आणि ह्या संकल्पना समोर जाऊन यामधून चांगले संशोधक निर्माण होतील तसेच अशा महोत्सवामधूनच आपल्या देशाला पेटंट आणि नोबेल पारितोषिक मिळतील असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान डॉ. यादवकुमार मावळे यांनी लोणार सरोवराला विविध माध्यमातून जतन आणि संवर्धन करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत मिळालेल्या प्रयोगशाळेचे माध्यमातून आपणही लोणार सरोवरचं संवर्धन आणि जतन तसेच पाण्यामध्ये असलेले विविध गुणधर्मांचा अभ्यास करून उत्कृष्टपणे माहिती संकलन करू व ते निश्चितपणे जगासमोर मांडू असा आशावाद व्यक्त केला.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalदरम्यान डॉ.विजय नागरे यांनी लोणार विज्ञान महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला वाव निश्चित मिळेल व विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगले संशोधन कार्य करून आपलं नाव उज्वल करावे अशी अशा व्यक्ती केली. विद्यापीठाने सुद्धा या लोणार विज्ञान प्रयोग शाळेच्या माध्यमातून उच्च संशोधनसाठी स्थानिक बनमेरू विज्ञान महाविद्यालयाला व्यवस्थापन आणि नियोजन करण्यासाठी संधी द्यावी अशी भूमिका मांडली. डॉ. ओमप्रकाश झंवर यांनी लोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थांना चांगलं पाठबळ देऊन त्यांना संशोधनाकडे वळविण्याचा प्रयत्न करूया व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले संशोधन कार्य व्यवस्थित पार पडून आपणही आयआयटी, एनआयटी सारख्या विद्यार्थ्यांना स्पर्धा देऊ शकतो. यासाठी आपण आपला आत्मविश्वास जागरूक ठेवून आपल्या कार्य प्रामाणिकपणे व श्रद्धेने करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalडॉ.आर.ई.खडसान यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम विकसित भारत होती. याचप्रमाणे आपणही राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून लोणार सरोवरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करूयात. विद्यार्थ्यांचा संशोधनात्मक विकास साधण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. डॉ. प्रशांत कोठे यांनी लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली, यावर भाष्य केले आणि या नगराला लोणार नाव देण्यामागची इतिहासातील नोंदिबद्दल माहिती दिली. डॉ. संतोष बनमेरू यांनी अमृत सेवाभावी संस्था, परभणी संचलित हे बनमेरू महाविद्यालय लोणार सरोवराच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करत राहील अशी ग्वाही दिली. आदरणीय उषाताई गोले यांनी अध्यक्षीय भाषणातून बोलताना विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण चांगली प्रगती करू शकतो आणि लोणार विज्ञान महोत्सवाचे छोटेसे लावलेले रोपटे आज राष्ट्रीय पातळीवर पोहचले याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalलोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व सहभागी महाविद्यालयांनी येथे येऊन लोणार सरोवरचा संवर्धन आणि विकास करण्यासाठी ज्या संकल्पना मांडल्या त्या कृतीत आणण्यासाठी या लोणार विज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून सतत प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या. दरम्यान  डॉ. प्रकाश बनमेरू, डॉ. संतोष क.बनमेरू व डॉ.मिलिंद गायकवाड यांनी लिहिलेल्या लोणार सरोवर वरील संशोधन पुस्तकाचे मान्यवरांचे असते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. सौरभ गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शारीक शेख यांनी केले.

(Science Festival is an effective strategy)

सातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाच्या दुपारच्या सत्रात डॉक्टर कल्पना चावला सायन्स सेंटर लोणावळा येथील डॉक्टर संजय पुजारी व त्यांचे टीम यांनी विज्ञानाचे प्रयोग अतिशय सोप्या पद्धतीने व विद्यार्थ्यांसोबत हसत खेळत सादर केले. महत्वाचे हे एक प्रमुख आकर्षण होते. या कार्यक्रमानंतर विज्ञान प्रदर्शनी मॉडेल आणि पोस्टर त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच या सायन्स टॅलेंट ऑनलाइन प्रश्र्नमजुषा सुद्धा घेण्यात आली. या महोत्सवामध्ये विविध महाविद्यालयातून 268 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा, अमळनेर येथील फिरती प्रयोगशाळे मधील ज्ञानाचे प्रयोग समजून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. अनिरुद्ध पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ही प्रयोगशाळा महाराणा प्रताप हायस्कूल, विवेकानंद शाळा आणि सरदार पटेल हायस्कूल इथेही जाऊन शाळेतील विद्यार्थांना विज्ञानाचे प्रयोग समजून सांगितले.

(Science Festival is an effective strategy)

Science Festivalसातव्या राष्ट्रीय लोणार विज्ञान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 5 मार्च रोजी महोत्सवचा निरोप समारंभ पार पडला आणि विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार, बुरुंगले महाविद्यालय शेगाव, शिवाजी महाविद्यालय मोताळा, खंडेलवाल महाविद्यालय अकोला, नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड , जिजामाता महाविद्यालय बुलढाणा आणि कमलाबाई बनमेरू महाविद्यालय लोणार येथील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.

(Science Festival is an effective strategy)

विज्ञान महोत्सव चे महत्व !

प्रभावी आणि चांगला विज्ञान संवाद हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, जे विद्यार्थ्यांच्या विज्ञान साक्षरतेसाठी त्यांच्या मूळ सक्षमतेला मजबूत समर्थन देते.  उत्तम संवाद वाढवून वैज्ञानिक ज्ञान वाढवता येते. वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी तपशीलाची ही पातळी एक शक्तिशाली प्रेरक ठरू शकते. विज्ञान महोत्सव म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित सह सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे.

(Science Festival is an effective strategy)

त्यामध्ये अनेकदा विविध क्रियाकलापांचा समावेश असतो, जसे की हँड-ऑन प्रात्यक्षिके, व्याख्याने, कार्यशाळा आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी अधिक सुलभ आणि आकर्षक बनवण्यासाठी डिझाइन केलेले प्रदर्शन शाळा, विद्यापीठे, संग्रहालये, समुदाय संस्था आणि इतर गटांद्वारे विज्ञान महोत्सव आयोजित केले जाऊ शकतात. विज्ञान महोत्सव हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समुदाय-व्यापी उत्सव आहेत. हे वैज्ञानिक विषयांबद्दलचे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी धोरण आहे.

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button