1 Breaking Badlapur घटनेची अतिशय गंभीर दखल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आंदोलकांना शांततेचे आवाहन..
Badlapur : बदलापूर येथे घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद पाहता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे.
Badlapur बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल; आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार
मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज www.lonarnews.com
बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. तसेच शाळांमध्ये ‘सखी सावित्री समित्या’ स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. Badlapur
बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.
विद्यार्थिनींना संशय आल्यास संबंधित व्यक्तीस न घाबरता तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना निदर्शनास आणून देता आले पाहिजे अशी यंत्रणा हवी. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी चर्चा करून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. Badlapur
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत जनतेत संताप व्यक्त होतोय. घटनेचे माहिती होताच सकाळपासून नागरिक रस्त्यावर उतरले असून बदलापूर परिसरात आंदोलन सुरु आहेत. सदरील घटनेचे पडत असलेले तीव्र पडसाद पाहता शिंदे सरकारने तातडीने प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Badlapur
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले !
मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगितलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु. पोलिसांनी आरोपींना अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील, जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Badlapur
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती..
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बदलापूर अत्याचार प्रकरणात SIT स्थापन
बदलापूर इथल्या नागरिकांचा संताप आणि झालेला गंभीर प्रकार लक्षात घेत सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे. Badlapur
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना आदेश
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आय.पि.एस. अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एस.आय.टी. गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे. Badlapur