1 Wonderful All India Marathi Sahitya Sanmelan
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक !
All India Marathi Sahitya Sanmelan : पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला.
All India Marathi Sahitya Sanmelan
संत तुकाराम यांचा जीवनपट उलगडणारा महानाट्याविष्कार
‘जाऊ देवाचिया गावा‘ महानाट्याने रसिक झाले भावविभोर
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय दिवशीही गर्दीचा उच्चांक
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता सादर झालेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्याने रसिकगण भावविभोर झालेत. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर झालेले हे महानाट्य पाहण्यासाठी रसिकांनी गर्दीचा उच्चांक मोडला. सभागृह रसिकांच्या उपस्थितीने हाऊसफुल्ल झाले होते. साडे सातला सुरू झालेले महानाट्य रात्री सव्वाबारापर्यंत चालले.
चार तासापर्यंत सभागृह होते हाऊसफुल्ल
सायंकाळी साडेसातला महानाट्यास सुरवात झाली. महानाट्य चार तास चालले. नाटकाचा समारोप होईपर्यंत सभागृह हाऊसफुल्ल होते. जवळपास चार हजार प्रेक्षकांनी हे नाटक प्रत्यक्ष पाहिले. तर या नाटकाचे थेट प्रसारण ‘97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर’ या यू ट्यूब चॅनलवरून दाखवण्यात येत होते. त्यावरूनही अनेक नागरिकांनी घरी बसून या महानाट्याचा लाभ घेतला.
All India Marathi Sahitya Sanmelan
असे आहेत महानाट्यातील कलावंत
या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले असून त्यांनी संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे. या महानाट्यात 150 कलावंतांनी ीग घेतला आहे, तर 70 कलावंतांनी आपल्या नृत्यकौंशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले आहे. या महानाट्याची निमिर्ती डॉ.जर्नादन चितोडे अध्यक्ष वृंदावन चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांनी केली आहे. या महानाट्यात बैलगाड्या, पालख्या, घोडे यांच्या सहभागाने या महानाट्यात जिवंतपणा आणला होता. या म हानाट्यास अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे. यात 12 गाणी दाखवण्यात आली आहेत. मयूर वैद्य यांनी कोरीओग्राफी केली आहे. तर सतीश काळे यांनी गीते लिहीली आहेत. सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, रवींद्र साठे यांनी गायली आहेत.
All India Marathi Sahitya Sanmelan
म्मबाजीचे गाण्याला मिळाली दाद
या महानाट्यात आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर करण्यात आलेले व त्यागराज खाडीलकरांनी गायलेले म्मबाजी हे गीत दाद घेऊन गेले.
सभामंडपात गुंजला जय हरी विठ्ठलचा गजर
महानाट्यात संत तुकाराम जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठलाचे नामस्मरण करण्याचा प्रसंग दाखवण्यात येत होता. त्या प्रसंगानुसार सभागृहातील रसिक श्रोतेही ‘जय हरी विठ्ठल’च्या नामस्मरणाचा गजर केला.
सदेह वैकुठागमनाने डोळ्यात आणले पाणी
महानाट्याचा समारोप संत तुकाराम यांचा सदेह वैकुठागमनाने करण्यात आला आहे. या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी तराळले.
All India Marathi Sahitya Sanmelan
आणि असा झाला अमळनेरला प्रयोग
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे बजरंग अग्रवाल यांनी पुणे येथे पाहिला होता. संतश्रेष्ठ तुकाराम महारांजावरील या महानाट्याने बजरंग अग्रवाल यांच्या मनावर चांगलेच गारूड केले आणि त्यांनी ठरविले की, या महानाट्याचा एक प्रयोग आपल्या अमळनेकरांसाठी करावा. योगायोगाने 97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात होत असल्याने त्यात हे नाटक सादर करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि त्यानुसार संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी रविवार, 4 फेब्रुवारीस ते सादर करण्यात आले. यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
All India Marathi Sahitya Sanmelan
‘माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजूला फेकून दिलं असतं‘
प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी प्रकट मुलाखत
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : ‘माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजूला फेकून दिलं असतं,’ असे मत प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सकाळी सभामंडप -1 खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर (बदलापूर) यांनी ही मुलाखत घेतली. त्यात बाबासाहेब सौदागर यांनी आपला जीवनपट उलगडला.
All India Marathi Sahitya Sanmelan
माजी आजी व बहिणाबाई सख्ख्या मावस बहिणी?
घरात पुस्तकाचे, साहित्याचे असे कुठलेच वातावरण नव्हते. माझी आजी 105 वर्षे जगली. तिने मला ओव्या शिकवल्या. ओव्या, कविता काय असते, हे तिने मला शिकवलं. घरात आई चिडत असेल तर ती काव्यातूनच. तिच्या ओव्या मी ऐकायला लागलो. ते ऐकता, ऐकता मी बहिणाबाई वाचायला लागलो. बहिणाबाई ऐकत असताना, वाचत असताना वाटायचं की, माजी आजी आणि बहिणाबाई या सख्ख्या मावस बहिणी तर नाही ना? पुढे मी व्यंकटेश माडगूळकर आदी वाचायला लागलो. पुढे ना.धों. महानोरांना वाचायला लागलो. यातून माझं खान्देशशी नातं जुळलं. हे नातं पुढे घट्ट जुळलं.
All India Marathi Sahitya Sanmelan
आजीच्या चालीवर गाणी म्हणायला लागलो
चित्रपट पाहात असताना सिनेमा सुरू होण्याआधी नावांच्या पाट्या येतात. त्यात गीतकार जगदीश खेबुडकर अशी काही नावं यायची. तेथे आपलंही नाव आलं पाहिजे, असं वाटायचं. तेव्हा गीतकार म्हणून काम करायचं असं ठरवलं. चित्रपटासाठी मी कोल्हापुरात गेलो. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कोणी उभे करीत नव्हते. कोल्हापूरला जाण्यासाठी भाड्याला पैसेही नसायचे. मग घरातील पितळाची एकेक भांडी मोडून त्या पैशाद्वारे जायचो. पुढे माझी मुंबई दूरदर्शनला मुलाखत झाली.
All India Marathi Sahitya Sanmelan
प्रसंगी निसर्गकवी बाजुला ठेवावा लागतो
आजीला ओव्यांचे संस्कार होते. आजीच्या चालीवर गाणी म्हणायला लागलो. त्याचा गीतांसाठी चांगला उपयोग झाला. उत्तराताई केळकर यांनी आपलं गाणं गावं, अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली. चित्रपटासाठी गीतांची मागणी झाल्यावर मला माझ्यातला निसर्गकवी बाजुला ठेवावा लागतो. मी चांगल्या लावण्या लिहितो, पण त्या घेणारा मला भेटावा, अशी अपेक्षा असते.
चित्रपटाचे दिग्दर्शक कडक लावणी मागतात. गाणं नसतं तर मी जगलो नसतो, फक्त एक पेन आणि चार कागद हेच माझं साधन आहे. माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजुला फेकून दिलं असतं. चित्रपटासाठी गाणं निवडताना समोर 10 माणसं असायची. एकेक जण त्यात त्रुटी काढायचा. पण त्यांच्या मागणीनुसार, मी गीतं लिहून द्यायचो. पुढे गीतं लिहिताना चाल, धून यानुसार गीतांसाठी आव्हानं स्वीकारली. लावणी, युगल गीते, देशभक्तीपर, संभाजी, जिजाऊंवर गीते ही मागणीनुसार लिहित गेलो. दिग्दर्शकाला काय हवंय, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कोणतीही गाणी ही ठरवून लिहिली नाही तर परिस्थितीनुसार ती लिहिली गेली. यशाचा एक हार झेलायचा असेल तर 100 प्रहार सहन करावे लागतात. All India Marathi Sahitya Sanmelan
मुलाखत सुरू असताना व्यासपीठावरील स्क्रिनवर गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेली काही गाणं दाखविण्यात आली. मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.
All India Marathi Sahitya Sanmelan
जीवनात पाच पांडवही भेटले
बाबासाहेब सौदागर म्हणाले, माझ्या प्रवासात मला 100 कौरव भेटले, यांनी मला थकवले. तसे पाच पांडवही भेटले आणि एक कृष्णही भेटला. या पाच पांडवांमध्ये प्राचार्य तानसेन जगताप, मनोहर आंधळे, कविवर्य रमेश पवार, कविवर्य रमेश माने आणि डॉ.अमोघ जोशी यांचा समावेश आहे आणि या सर्वांना सांभाळणारा कृष्णाच्या रुपात डॉ.अविनाश जोशी भेटले.
All India Marathi Sahitya Sanmelan
मराठी साहित्य संमेलनात
गझल कट्टा रंगला
पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी गझल कट्टा रंगला. गझलकारांनी एकसे बढकर एक गझल सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली.
सभामंडप-3 बालकवी त्रंबक बापूजी ठोंबरे सभागृहात हा गझलकट्टा पार पडला. प्रतिमा सराफ, मुंबई, वृषाली अभिजित देशपांडे, नागपूर यांनी या गझल कट्ट्याचे संयोजन केले. डॉ.अविनाश सांगोलकर (सोलापूर) अध्यक्षस्थानी होते. मनोहर नेकर यांनी सूत्रसंचालन केले.
चोपडा येथील राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गझलकार प्रा.योगिता पाटील बोरसे यांच्या
“सामान्य माणसांचा जयकार होत नाही,
सामान्य माणसांचा उद्धार होत नाही
विश्वास ठेवला की विश्वासघात होतो
परका कुणी कधीही गद्दार होत नाही”
या गझलेने रसिकांची सर्वाधिक पसंती मिळविली.
मनोज वराडे यांची ‘कावळे जमलेत खुर्चीला शिवाया, नेमका वारस तिच्या नजरेत नाही’ ही गझलही रसिकांना भावली.
डॉ.अविनाश सांगोलकर यांची ‘बनली जरी ही दुनिया जनावरांची, अविनाश तू तरीही अपवाद एक आहे’ ही गझल सभागृहात वेगळे वातावरण निर्माण करून गेली.
यासोबतच बबन धुमाळ (पुणे), सुनीता कपाळे (छत्रपती संभाजीनगर),चंद्रशेखर भुयार यांच्यासह इतरही गझलकारांनीही आपापल्या गझल सादर करून गझलकट्ट्यास उपस्थित रसिक, प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
गझलकार आपल्या गझल सादर करीत असताना श्रोते कधी टाळ्यांनी दाद होते, तर कधी हात उंचावून कौतुक करीत होते.