महाराष्ट्रराष्ट्रीयस्थानिक बातम्या

14 April : Education Is The Greatest Wealth !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी देश सज्ज !

14 April : Education Is The Greatest Wealth ! “शिक्षण ही सर्वात मोठी संपत्ती आहे.” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी देश सज्ज !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. या अनुयायांना विविध नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता पालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

14 April : Education Is The Greatest Wealth !

Educationचैत्यभूमी परिसर सुशोभीकरण !

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्याना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजवण्यात आले आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

छत्रपती संभाजीनगर : मिल कॉर्नर ते सिटी क्लब रस्ता बंद !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. विविध ठिकाणी पारंपरिक ढोलताशांची तयारी सुरू आहे. सामाजिक उपक्रमांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांनी देखील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 1200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजेपासूनच बंदोबस्त तैनात आहे. त्याशिवाय मिरवणुकीच्या मुख्य मार्गांवरील वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

सायंकाळपासून भडकल गेट, सिटी क्लब रस्ता बंद !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सायंकाळी 6 वाजेपासूनच नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्या धर्तीवर सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत भडकलगेट ते सिटी क्लब हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

रविवारी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील !

– महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते अमरप्रीत चौक .

– गोपाल टी, क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, बाराभाई ताजिया, गुलमंडी, सुपारी हनुमान मंदिर, उत्तम मिठाई भांडार, सिटी चौक, जुना बाजार, मुख्य पोस्ट ऑफिस, भडकल गेट.

– शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक.

– औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया.

-मिल कॉर्नर ते सिटी क्लब

– एन-12 नर्सरी, गोदावरी पब्लिक स्कूल, टी.व्ही. सेंटर, एन-9, अयोध्यानगर, शिवनेरी काॅलनी, एन-7 शॉपिंग सेंटर.

– दरवर्षीप्रमाणे मुख्य मिरवणूक क्रांती चौकातून सुरू होऊन भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित होईल.

– क्रांती चौक ते मिलकॉर्नर दरम्यान एकूण 72 मिरवणुकांचा सहभाग.

– हडको सिडको समिती उत्सवादरम्यान 16 मिरवणुकांचा सहभाग.

– सतरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 126 मिरवणुका.

– शहरात विविध 77 ठिकाणी अभिवादन कार्यक्रम होतील.

14 April : Education Is The Greatest Wealth !

एकूण 60 व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागत !

एकूण 60 व्यासपीठांद्वारे नागरिकांचे स्वागत केले जातील. यामध्ये क्रांती चौकात 42, सिटी चौक 13 तर सिडकोत 5 व्यासपीठांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत परवानगी देण्यात आल्याचे विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.

14 April : Education Is The Greatest Wealth !

Educationलेझर शोचा अनोखा देखावा ; जयंतीची अमूल्य भेट !

भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक स्वातंत्र्याचे उद्गाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात येत असतो. देशातच नव्हे तर विदेशातही बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते. वैचारिक कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांना अनोखं अभिवादन केलं जातं. मुंबईतही बाबासाहेबांना यंदा अनोखं अभिवादन करण्यात आलं आहे. प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा झळकावण्यात आली आहे. लेझर शोच्या माध्यमातून ही प्रतिमा झळकवण्यात आली आहे. त्यामुळे हा अनोखा नजारा पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे ऊर भरून येताना दिसत आहेत.

आज 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची जयंती आहे. या निमित्ताने वांद्रे-वरळी सी लिंकवर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी सी लिंकवर लेझर शो करण्यात आला असून या लेझर शोमध्ये बाबासाहेबांच्या दोन प्रतिमा दिसत आहेत. त्याशिवाय तिरंगा झेंडा आणि अशोक चक्रही या लेझर शोमध्ये दिसत आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

अनोखा नजारा…

विस्तीर्ण असा वांद्रे-वरळी सी लिंक… त्यावर लावलेले दिवे… विद्यूत रोषणाई आणि लेझर शोमधून दिसणाऱ्या प्रतिमा… वर ढगांचं अच्छादन तर पुलाखाली अथांग पसरलेला काळाशार अरबी समुद्र… या पार्श्वभूमीवर हा लेझर शो पाहून येणारे जाणारे हरखून जात आहेत. बाबासाहेबांची प्रतिमा दिसताच अपसूकच तोंडातून जयभीम असे उद्गार येत आहेत.

वांद्रे वरळी सी लिंकवरील लेझर शोमधून बाबासाहेबांची प्रतिमा पाहायला मिळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे असंख्य लोकांनी सी लिंककडे धाव घेतली. महामानवाची प्रतिमा पाहण्यासाठी लोक येत होते. महापुरुषाची ही तस्वीर आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती.

दरम्यान, आज आंबेडकर जयंती आहे. त्यानिमित्ताने हजारो लोक चैत्यभूमीला बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. मात्र, उद्या रविवार असल्याने रेल्वेने नेहमीप्रमाणे मेगा ब्लॉक घेतला आहे. हा मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनीही मेगा ब्लॉक रद्द करण्याची मागणी केली आहे.

14 April : Education Is The Greatest Wealth !

1891 मध्ये 14 एप्रिल रोजी भीमरावांचा जन्म झाला !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील  रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान स्मारकाच्या जागेवर असलेल्या बॅरेकमध्ये घालवली. 1891 मध्ये 14 एप्रिल रोजी भीमरावांचा जन्म झाला.

बालक भीमराव यांचे प्राथमिक शिक्षण दापोली व सातारा येथे झाले. 1907 मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन स्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व भेट म्हणून त्यांचे शिक्षक कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांना ‘बुद्ध चरित्र’ हा स्वलिखित ग्रंथ भेट म्हणून दिला. भीमरावांनी बडोदाचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून फेलोशिप मिळाल्यानंतर 1912 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली. संस्कृत शिकण्यास मनाई असल्याने ते फारसी घेऊन उत्तीर्ण झाले. अनेक अडचणीवर मात करत त्यांनी ज्ञान अर्जन करत विविध पदव्या घेतल्या.

14 April : Education Is The Greatest Wealth !

योगदान

भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकरांनी आपल्या 65 वर्षांच्या आयुष्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्योगिक, घटनात्मक अशा विविध क्षेत्रात अगणित कार्य करून राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Educationसंविधान आणि राष्ट्र निर्माण

त्यांनी 02 वर्षे, 11 महिने आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमाने समता, समता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधान तयार केले आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केले. देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीच्या अखंडतेच्या आणि प्रतिष्ठेच्या जीवनपद्धतीने भारावून गेलेली भारतीय संस्कृतीने अभिभूत केले.

14 April : Education Is The Greatest Wealth !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार !

1. शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
2. हिंसा ही वाईट गोष्ट आहे त्या पेक्षा ही वाईट गोष्ट म्हणजे गुलामी आहे.
3. काम लवकर करावयाचे असल्यास, मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
4. माणूस हा धर्म साठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
5. ग्रंथ हेच गुरु.
6. वाचाल तर वाचाल.
7. तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
8. मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
9. तुम्ही वाघा सारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही.
10. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
11. शक्तीचा उपयोग काळ-वेळ पाहून करावा.
12. नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.
13. माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
14. जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.
15. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
16. प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.
17. स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.
18. एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
19. धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
20. जो माणूस मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.
14 April : Education Is The Greatest Wealth !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button