राष्ट्रीय

14 January Breaking प्रसादाची जय्यत तयारी !

14 January Breaking : अयोध्येत टाटा ची इलेक्ट्रिक कार भाविकांसाठी सज्ज !

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 14 January 2024 . अयोध्‍येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी सुरु असलेल्या तयारीवर थोडक्यात नजर टाकूया.

Breaking 14 January 2024

भाविकांसाठी करण्यात येत असलेल्या लाडू प्रसादाची जय्यत तयारी !

अयोध्‍येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी देशभरात अभूतपूर्व उत्‍साहाचे वातावरण आहे. देशातील विविध राज्‍य आणि तीर्थक्षेत्रांमधून अयोध्‍येला प्रसाद आणि धान्‍य पाठवणे सुरु आहे. 22 जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी जनतेमध्‍ये प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिरातील लाडू प्रसाद अयोध्येला पाठवला जाणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे.

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील प्रसादासाठी लाडू बनवणाऱ्या कारागिरांची संख्याही वाढली असून, मंगळवार, 16 जानेवारीपासून हे लाडू ट्रकने अयोध्येला पाठवले जाणार आहेत. श्रीराम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात महाकाल मंदिरातून 5 लाख लाडू प्रसाद पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी घेतला आहे. महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीकडून लाडू प्रसाद तयार केला जात आहे. (Breaking 14 January 2024)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , 5 लाख लाडूंसाठी 5 लाख पाकिटे बनवली जात  आहे. यापूर्वी 80 कारागीर लाडू बनवत होते. मात्र वेळ लक्षात घेऊन आणखी 20 कारागिरांची वाढ करण्यात आली आहे. आता दररोज 100 कारागीर लाडू बनवण्यात गुंतले आहेत. 16 जानेवारीपर्यंत लाडू तयार केले जातील. त्यानंतर हे लाडू 2 ते 3 ट्रकमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे.

14 Januaryपाच लाख लाडूंचे वजन सुमारे 250 क्विंटल असेल, असे मानले जात आहे. यासोबतच 50 क्विंटल लाडू स्वतंत्रपणे बनवले जाणार आहेत. विशेषत: भाविकांसाठी करण्यात येत असलेल्या लाडू प्रसादाची तयारी पाहण्यासाठी जिल्हाधिकारी नीरजकुमार सिंह यांच्यासह मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी लाडू युनिटमध्ये पोहोचून तयारीची माहिती घेतली.

महाकाल मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी माध्‍यमांशी बोलताना माहिती दिली की, प्रत्येक लाडू 50 ग्रॅमचा बनवला जात आहे. हे प्रत्येक लाडूच्या बॉक्समध्ये बनवले जातील, 10 किलोच्या मोठ्या बॉक्समध्ये पॅक केले जातील आणि 21 जानेवारीपर्यंत ट्रकमध्ये अयोध्येला पाठवले जातील.

5 लाख लाडू बनवण्यासाठी आणि पॅक करण्यासाठी सुमारे 80 क्विंटल शुद्ध तूप, 90 क्विंटल साखर, 70 क्विंटल हरभरा डाळ, 1 टन काजू, 5 क्विंटल बेदाणे आणि 1 क्विंटल वेलची लागेल. महाकाल मंदिरातील लाडूंना भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) या संस्थेने स्वच्छतेसाठी पंचतारांकित रेटिंग दिले आहे. (Breaking 14 January 2024)

महाराष्ट्रातील  नागपूरमधील बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी स्वीट डिश बनविण्याचा निर्धार केला आहे. ‘राम हलवा‘ या नावाने ते गोड पदार्थांची डिश बनविणार आहेत. हा गोड प्रसाद 7 हजार किलोंचा असणार आहे. अयोध्येतील भक्तांना हा प्रसाद ते वाटणार आहेत.

हैदराबादस्थित छल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी हैदराबाद येथून पायी चालत जाऊन प्रभू श्रीरामासाठी अनोखी देणगी दिली आहे. त्यांनी सोन्याच्या मुलाम्यातील पादुका राम मंदिर ट्रस्टला दान केल्या आहेत.

मथुरेतील यज्ञांसाठी 200 किलो लाडू पाठविण्यात येणार आहेत. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेच्यावतीने हे लाडू पाठविण्यात येणार आहेत. तिरूपती देवस्थानच्या वतीने 1 लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत. सीता मातेसाठी सुरतहून खास साड्या पाठविण्यात येणार आहेत. या साडीवर प्रभू श्रीराम आणि अयोध्येची छबी असणार आहे. मध्य प्रदेशातूनही 5 लाख लाडू पाठविण्यात येणार आहेत.

Breaking 14 January 2024

प्रभू श्रीरामसांठी हिर्‍यांचा हार, 40  कारागिरांचे लाभले योगदान !

14 Januaryपाच हजार अमेरिकन हिऱ्यांचा वापर करून प्रभू श्रीरामसांठी हिर्‍याचा हार तयार करण्यात आला आहे. यामध्ये चांदीचाही वापर करण्यात आला आहे. 40 कारागिरांनी 35 दिवसांत हा हार तयार केला आहे. हिर्‍याच्या हारात श्रीराम मंदिराची प्रतिकृती दिसणार आहे.

अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेले 18 दरवाजे बसविण्यात येणार आहेत. यातील 18 दरवाजांना दिल्लीतील कारागिरांनी 100 किलो सोन्याचा मुलामा दिला आहे. सोन्याचा दरवाजा 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद असणार आहे.

Breaking 14 January 2024

अयोध्येत टाटा ची इलेक्ट्रिक कार भाविकांसाठी सज्ज !

अयोध्येत आगामी 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. राम मंदिराच्या या भव्य कार्यक्रमासाठी पर्यावरण पूरक वाहने दिमतीला असतील. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्या आणि लखनऊ या दोन शहरात इंटरसिटी प्रवासासाठी 15 इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा केली आहे.

14 Januaryभाविकांना या दोन शहरात प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करता येईल. भविष्यात यापेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा कंपनीच्या कारची खरेदी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने अयोध्या विकास प्राधिकरणाने पर्यावरण पूरक योजनांवर काम सुरु केले असल्याची माहिती मिळत आहे. (Breaking 14 January 2024)

अयोध्येत चार भाविकांची सोय होईल अशा 15 इलेक्ट्रिक कारची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या वर्षी दीपोत्सव कार्यक्रमानंतर अयोध्येत ई-कार्ट सेवा सुरु करण्यात आली. यामध्ये एकाच वेळी 6 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा वापर मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात येतो. या सोयी आधारे श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसराची प्रदक्षिणा पूर्ण होते.

मेक इन इंडियाच्या पहिल्या टप्प्यात टाटा टिगोर ईव्ही कार तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी अयोध्या विकास प्राधिकरणाने इलेक्ट्रिक कारची सेवा सुरु केली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या दरम्यान अयोध्येत विविध कलाकार, पर्यटक आणि भाविक भक्तांसाठी 200 ईव्ही कार दाखल होण्याची शक्यता आहे. (Breaking 14 January 2024)

पॅशन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने माय ईव्ही प्लस या नावाने कॅब सेवा सुरु केली आहे. पिक अँड ड्रॉप सेवा 6 जानेवारीपासून अयोध्या विमानतळावरुन सुरु झाली आहे. ही सेवा संपूर्ण अयोध्येत सुरु असेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना व्हॉट्सअपवर संपर्क करता येईल. लखनऊ आणि अयोध्या या दोन शहरादरम्यान ही सेवा सुरु होत आहे. एका बाजूच्या प्रवासासाठी प्रवाशांना 3000 रुपये मोजावे लागतील. तर अयोध्येत भाविकांना 0 ते 10 किमीसाठी 250 रुपये, 0-15 किमीसाठी 399 रुपये,  0-20 किमीसाठी 499 रुपये,  20-30 किमीसाठी 799 रुपये,  30 ते 40 किमीसाठी 999 रुपये भाडे द्यावे लागेल.

Breaking 14 January 2024

श्रीराम मंदिराबाबत  पुरीच्या शंकराचार्यांचे महत्त्वाचे विधान !

श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघा एक आठवडा उरला असताना देशातील चार पिठाच्या शंकराचार्यांमध्ये या सोहळ्यावरून मतभेद असल्याचे समोर आले होते. पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या चारहीजणांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शास्त्रातील विधीनुसार प्राणप्रतिष्ठा व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, “चार शंकराचार्यांमध्ये राम मंदिराच्या विषयावर मतभेत असल्याचे गैरसमज पसरविले गेले आहेत. आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आमचे एवढेच म्हणणे होते की, प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार व्हावी.

14 Januaryदेवाची प्रतिमा किंवा मूर्तीमध्ये विधीवत देवाच्या तेजाचा प्रवेश होत असतो. विधिवत पूज प्राणप्रतिष्ठा झाली नाही, तर डाकीन, शाकिनी, भूत-प्रेत-पिशाच्च चारही दिशांना पसरतात आणि सर्व छिन्न-विछिन्न करतात. त्यामुळे शास्त्रासंमत पूजा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आमचे चौघांचेही हेच म्हणणे आहे. त्यात कुठलेही मतभेद नाहीत. (Breaking 14 January 2024)

थोडक्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधीवत न झाल्यास त्याचे तेज कमी होते आणि त्यात अशुभ शक्ती वास करतात, ज्यामुळे सर्वकाही अमंगल होते, असे त्यांना सुचवायचे होते. ही भूमिका त्यांनी याआधीही मांडली होती.

मकरसंक्रातीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये गंगासागर मेळा भरला आहे. या मेळाव्यात शाही स्नान करण्यासाठी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आलेले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, 22 जानेवारी रोजी मी अयोध्येत जाणार नाही. याचा अर्थ असा नाही की, मी अयोध्यावर नाराज आहे. मी कुणालाही अयोध्यात जाण्यापासून रोखतही नाही. (Breaking 14 January 2024)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button