16 November – Breaking – आगीत घराचे नुकसान
लोणार तालुक्यातील अजिसपूर येथे आगीत होरपळून एक महिला जखमी
16 November – Breaking : गावातील लोकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले.
16 November : घराला आग लागून अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान ..
लोणार : 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान लोणार तालुक्यातील अजिसपूर गावातील एका घराला आग लागून अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे घटना घडली. सुदैवाने यात काही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक लागलेल्या आगीत एक महिला होरपळून जखमी झाली.
सविस्तर माहिती असे की, लोणार तालुक्यातील अजिसपूर गावात गजानन पिराजी सुपेकर हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र काही दिवसापूर्वी अपघात झाल्याने गजानन सुपेकर हे एकाच जागेवर पडून आहेत. गजानन सुपेकर यांना जागेवरून हलता येत नाही. त्यातच 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी त्यांच्या घरात अचानक आग लागून नुकसान झाल्याची घटना घडली व त्यात मोठे नुकसान झाले. (16 November – Breaking)
गजानन सुपेकर यांच्या पत्नी रुपाली सुपेकर हया सकाळी स्वयंपाक – पाणी करण्यासाठी गॅस शेगडी सुरु करायला गेल्या मात्र लगेच आगीच्या ज्वाळाने घर पेटले. ही बाब लक्षात येताच रुपाली सुपेकर यांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र अचानक लागलेल्या आगीने रुपाली सुपेकर हया होरपळून जखमी झाल्या. या घटने दरम्यान गजानन सुपेकर व मुले घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीने रुद्र रूप धारण केल्याने घरातील नगदी पैसे, साहित्य, कपडे, अन्नधान्य सर्व जळून खाक झाले. गावातील लोकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. या आगीत अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी अजिसपूर येथे तातडीने जात घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी तत्काळ संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिल्याने कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा केला. यावेळी गणेश मुकीर, पंडित वाबळे, तुळशीराम वाकुडकर तसेच ग्रामसेवक, तलाठी व गावकरी उपस्थित होते.