स्थानिक बातम्या
2024 Breaking : Department of Revenue : फसवणूक
lलोणार : महसूल विभागाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस

Department of Revenue : अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात दंड भरणा चलनच्या माध्यमातून महसूल विभागाची फसवणूक : संबधितावर लोणार पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल.
Department of Revenue : शासकीय चलनात खोडखाड केल्याचे निदर्शनास
आल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल
लोणार : अवैद्य रेती वाहतूक प्रकरणात आकारलेल्या दंडाच्या रक्कम भरलेल्या शासकीय चलनात खोडखाड केल्याचे निर्दशनास आल्याप्रकरणी लोणार तहसिल कार्यालयचे निवासी नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ५ जणांविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला ११ डिसेंबर २०२४ रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


संबंधीत प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत . तसेच वर्षभरात अवैद्य रेती वाहतूक कारवाई प्रकरण दंडाच्या भरणा झालेल्या चलनाची पडताळणी करणे सुरू आहे. यामध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
भूषण पाटील, तहसिलदार, तहसिल कार्यालय, लोणार.
सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून स्वतंत्र समिती नेमून सखोल चौकशी करून लेखा परीक्षण केल्यास खूप मोठे रॅकेट उघडे पडू शकते. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक करणारयामागे कोण सूत्रधार आहे याचा सुद्धा तपास करणे तितकेच गरजेचे आहे.