2024 Breaking : Digital Media : संपादक-पत्रकार
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे - पवार

Digital Media : समाजात चुकीचे कृत्य करणारया प्रवृत्ती विरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर पत्रकारांवर हल्ले होतात. अशावेळी चांगल्या पत्रकारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे.
Digital Media : डिजिटल मिडीया पत्रकार संघाच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल राऊत यांची निवड
किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
जालना : मंठा तालुक्यातील तळणी येथील पत्रकार अमोल राऊत यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार महाराष्ट्र संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 4 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले व राज्य समन्वयक इकबाल शेख (अहमदनगर) यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील डिजीटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मदत होण्याबरोबरच या माध्यमाला सामाजिक मूल्य तसेच सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत राहुन संघटनेची ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. (Digital Media)
अमोल राऊत हे मागील अनेक वर्षापासून पत्रकारिताक्षेत्रात कार्यरत असून एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. त्यांची ही निवड 31 डिसेंबर 25 पर्यंत असणार आहे. या निवडीबद्दल हॉटेल इंद्रायणी, ग्रामपंचायत तळणी, पत्रकार संघ तळणी, मंठा ग्रामीण बँक, यांच्यासह माजी जि. प. सदस्य उद्धव पवार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे, आराध्या कंट्रक्शन चे शरद पाटील यांच्यासह अनेकांची सत्कार करुन अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलतांना उध्दव पवार म्हणाले की , ग्रामीण भागातील पत्रकार तळागाळातील प्रश्न व अन्यायाविरुद्ध आवाज उठवुन लेखणी झिजवतात. समाजात चुकीचे कृत्य करणारया प्रवृत्ती विरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर पत्रकारांवर हल्ले होतात. अशावेळी चांगल्या पत्रकारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे. तर हॉटेल इंद्रायणीचे अशोक राठोड बोलताना म्हणाले की , समाजातील चुकीच्या प्रवृत्तीविरुद्ध निर्भीडपणे लिखाण करणारे पत्रकार म्हणून तळणीतील पत्रकारांना ओळखले जाते. त्यामुळे तळणीतील पत्रकारांचे कार्य चित्रपटातील हिरो पेक्षा कमी नाहीत . असेही राठोड म्हणाले. (Digital Media)
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश सरकटे तर आभार सत्संग राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला नानासाहेब खंदारे , कृष्णा खंदारे, कैलास राऊत , गोविंद भावसार , प्रशांत सरकटे , शिवा खरात, ज्ञानेश्वर राठोड , चाणक्य इंग्लिश स्कूलचे राम सानप , किशोर कुडकण , सचिन खवणे , पप्पू कुरेशी , पांडुरंग चंदेल , पांडुरंग वराडे , सचिन पवार , प्रा. गौतम सदावर्ते , सुनिल राठोड , अनिल राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
आराध्या कंट्रक्शनचे शरद पाटील यांनीही डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार अमोल राऊत यांचा सत्कार केला. यावेळी तळणीतील पत्रकारांचा डायरी पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मा. अण्णासाहेब खंदारे , सेक्रेटरी गंगाधर मोरे व केशव खंदारे यांचीही उपस्थिती होती.