2024 Breaking Khaparkhed- बेमुदत आमरण उपोषण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण..
2024 Breaking Khaparkhed : लोणार तालुक्यातील खापरखेड (घुले) येथे सामाजिक कार्यकर्त्याने बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
Khaparkhed : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण..
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. www.lonarnews.com
लोणार : तालुक्यातील खापरखेड (घुले) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्यात यावे करिता सामाजिक कार्यकर्ते सुनिल म्हस्के यांनी 2 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मागील अनेक वर्षांपासून लोणार तालुक्यातील खापरखेड (घुले) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवर अतिक्रमण झालेले असून त्या ठिकाणी सदर जागेवर झाडे लावलेली आहे. तसेच केरकचरा, लाकूड फाटा टाकून सदर जागा बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनिल म्हस्के यांनी ग्रामसेवकास तक्रार अर्ज देऊन कळवले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने सदर अतिक्रमनस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून सदरील जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे व सभामंडपास मंजुरी देण्यात यावी करिता सुनिल म्हस्के यांनी 2 सप्टेंबर 2024 पासून सदर अतिक्रमण स्थळी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, लोणार तहसील कार्यालय, लोणार पंचायत समिती कार्यालय यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.