2024 Breaking : लेंडी तलावाचे होणार सुशोभिकरण..
जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहराच्या सौंदर्यात पडणार भर.....
2024 Breaking : जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर सोबतच तालुक्याला जलसंस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
2024 Breaking : छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यात यावा : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी
Written By : सचिन गोलेच्छा, लोणार, जि. बुलढाणा www.lonarnews.com
लोणार : लेंडी तलाव सुशोभिकरणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी देश- विदेशातून पर्यटक येतात. लोणार सरोवर परिसरात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर लोणार शहरात ही पर्यटक फिरतात. मात्र त्यांना शहरात विशेष असे काहीच पाहायला मिळत नाही. पर्यटकांचा भ्रम निरास झाल्याचे अनेकदा सोशल मिडिया आणि चर्चेतून समोर आले आहे. यामुळे लोणार शहराच्या सौंदर्यात भर पडावी यादृष्टीने कामे सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
लोणार शहरातील लोणार – रिसोड मार्गावर असलेल्या लेंडी तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. लेंडी तलाव सुशोभिकरण करतांना लेंडी तलावाच्या मध्यभागी अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य – दिव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी केंद्रिय मंत्री खासदार प्रतापराव जाधव तसेच आ.डॉ. संजय रायमुलकर यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोणार शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आस्थेचा विषय असल्याने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बुलढाणा शहरात उभारण्यात आला आहे त्याधर्तीवर लोणार शहरात लेंडी तलाव सुशोभिकरण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी यांनी केली आहे. 2024 Breaking
जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर सोबतच तालुक्याला जलसंस्कृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ऐतिहासिक वारसा आहेत. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ.प्रा.सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुरावेसह त्यांच्या पुस्तकामधून लेख मांडले आहेत. जलसंस्कृतीवर त्यांनी लिखाण करून स्वतंत्र पुस्तक हि प्रसिद्ध केलेले आहे.