1 Breaking : Agricultural Pumps : वीज जोडणी करा
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सोलर ची सक्ती नको : विष्णुपंत भुतेकर

Agricultural Pumps : सरकारने कृषी पंपासाठी सोलरची सक्ती न करता सोलर आणि विदयुत वाहिनी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे : भूमिपुत्र शेतकरी संघटना
Agricultural Pumps : कृषी पंपासाठी सोलर ची सक्ती नको : विष्णुपंत भुतेकर
किशोर मापारी. मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
राज्यामध्ये कृषी पंपाना दिवसा वीज मिळावी म्हणुन कृषी पंप सोलर द्वारा निर्मित विजेवर टाकण्यासाठी सातत्याने सरकार आणि महावितरण चे प्रयत्न चालु आहेत. असे असले तरी सोलर च्या माध्यमातून मिळणारी वीज दिवसभर योग्य दाबाची मिळत नाही. ठिबक, तुषार किंवा उपसा करून लांब टाकलेल्या पाईप लाईनसाठी योग्य दाबाची वीज सोलर द्वारा मिळत नाही. त्यात रोज होणारे हवामानातील बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचन करत असताना अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे सरकारने कृषी पंपासाठी सोलरची सक्ती न करता सोलर आणि विदयुत वाहिनी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे म्हणुन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
मागील काळात (HVDS) छोटया डी.पी. द्वारा ११ के.व्हि. टाकून वीज जोडणी दिली जात होती. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरले होते. त्यांना ही आता महावितरणकडुन सोलर बसवून घेण्याची सक्ती केली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोटेशन भरून वीज जोडणीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोलर मध्ये कनव्हर्ट करण्याचा प्रयत्न महावितरण कडुन केला जात आहे. सोलर व्यतिरिक्त विदयुत वाहिन्या टाकून वीज जोडणीसाठी चालु असलेली संकेत स्थळे महावितरणे बंद केली आहेत.
ही एकप्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये सोलरची सक्ती महावितरण आणि सरकार करित असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सोलर बरोबर विदयुत वाहिनी टाकुन वीज जोडणी देण्यात यावी व दोन्ही पर्याय शेतकऱ्यांसाठी खुले ठेवन्यात यावे. यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना प्रयत्न करणार असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले. (Agricultural Pumps)
सरकारने कृषी पंपासाठी सोलरची सक्ती न करता सोलर आणि विदयुत वाहिनी असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे म्हणुन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.