राजकीय

2024 Breaking – Sindkhed Raja – मतदारांचा कौल..

लोणार तालुक्यात असलेल्या या गावातील मतदारांचा सिंहाचा वाटा..

Sindkhed Raja : सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या लोणार तालुक्यातील अनेक गावात मतदारांमध्ये विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात नाराजीचा सूर !

Sindkhed Raja : घड्याळ्याचे काटे वेगाने फिरणार की धनुष्यबाण चालणार ?

किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com

Sindkhed Rajaसिंदखेड राजा विधानसभा मतदार संघामध्ये लोणार तालुक्यातील जवळपास 22 गावे येतात. विधानसभेच्या निवडणूकीत महत्वपूर्ण व विजयी निकालाची कलाटणी देणाऱ्या या गावातील मतदारांचा सिंहाचा वाटा असतो. मात्र याच गावातील मतदारांमध्ये विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात नाराजीचा सूर असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच आता बदल निश्चित चा नारा देत घड्याळ्याचे काटे वेगवान करत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते मनोज कायंदे यांच्या घड्याळीला बळ देत घड्याळाचे काटे वेगवान फिरणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांचा धनुष्यबाण चालणार याचीच चर्चा जोर धरत आहे. (Sindkhed Raja)

विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे अनेक वर्ष आमदार, मंत्रीपदावर राहिले. मात्र तरी सुद्धा सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या लोणार तालुक्यातील किनगाव जटटू, खापरखेड लाड, भुमराळा, सावरगाव तेली, बिबी, देवा नगर तांडा, हत्ता, हिवराखंड, पिंप्री खंदारे, वझर आघाव, कासारी, बिबखेड, वसंत नगर, महारचिकना, खंडाळा, खळेगाव, शिंदी, सोमठाना, खापरखेड घुले, मांडवा, चोरपांग्रा, गोवर्धन नगर, ब्राम्हण चिकना ही गावे विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

Sindkhed Rajaसदर गावामध्ये मुलभूत सुविधांचा वाणवा असून त्याच बरोबर आरोग्य सेवा, चांगले रस्ते रस्ते, सुरुळीत एस.टी. वाहतूक, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतीसाठी वीज आणि जलसिंचन असे अनेक प्रश्न अजून कायम असल्याचे दिसून येते. त्याच बरोबर फक्त सत्तेसाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या घेणारे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर कार्यकर्ते व मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. सदर गावातील नेते, कार्यकर्ते व मतदारांनी यावेळी विकासाचा वादा मनोज दादा असा नारा देत घड्याळ्याचे काटे वेगवान करत अजित पवार यांचे नेतृत्व बळकट करत विधानसभेत मनोज कायंदे यांना पाठवण्याचा मतदारांनी निर्धार केल्याचे प्रचारात जमत असलेल्या गर्दीतून दिसत आहे. (Sindkhed Raja)

माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या कारकिर्दीत सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात अनेक विकासात्मक कामे झाली असल्याने सद्याच्या महायुतीच्या सरकार मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदार संघाचा चेहरामोहरा बदल्यान्याचे काम केल्याने त्यांना सुद्धा जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे

Sindkhed Rajaमाजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेना पक्षावर निवडणूक लढवीत आहेत. आमदार असतांना खेडेकर यांनी अनेक विकासकामे केलीत. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभव स्विकारत पुन्हा सामाजिक कार्य करत राजकारण करत लोकांमध्ये असलेली आपली प्रतिमा डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कायम ठेवली. त्याचीच पावती म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली. सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात नाराजीचा सूर कायम राहिल्यास मनोज कायंदे व डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कोण विजयी होणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. (Sindkhed Raja)

गायत्री शिंगणेंचा काकाविरुद्ध एल्गार

या पार्श्वभूमीवर गायत्री गणेश शिंगणे या उच्चशिक्षित (एमबीए) तरुणीने आपल्या राजकीय आकांक्षेसाठी शरद पवार गटालाच पसंती दिली. महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष असलेल्या गायत्री आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले त्यांचे बंधू गौरव शिंगणे यांच्या मदतीने मागील दीड दोन वर्षांपासून सिंदखेडराजा मतदारसंघ पालथा घातला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविले. अलीकडे त्यांनी काढलेला मोर्चा गर्दी खेचनारा ठरला. काकांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा विकास खुंटल्याच्या मुद्यावरून त्यांनी सिंदखेड मध्ये रान उठविलेले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या भेटी घेऊन उमेदवारीची मागणी केली. मुलाखत दिली. मात्र काकानी तुतारी हाती घेतल्याने अडचण झाली. (Sindkhed Raja)

सिंदखेड राजात काका विरुद्ध पुतणी संघर्षाची चिन्हे! निवडणूक पूर्वीच लढत ठरली लक्षवेधी!!

Sindkhed Rajaसुसंस्कृत राजकारणाची दीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात काका पुतण्या असा राजकीय -निवडणुकीय संघर्ष देखील नवा नाही. बारामतीकर ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजितदादा असा संघर्ष लोकसभेत रंगला आणि गाजला. यामुळे नणंद भावजय एकमेकांविरुद्ध लढल्या. त्यापूर्वी बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे, मातब्बर क्षीरसागर घराण्यात देखील हा संघर्ष पाहवयास मिळाला.

मात्र काका पुतणी हा राजकीय संघर्ष सुदैवाने अजूनतरी दुर्मिळ म्हणावा!  राजमाता जिजाऊंच्या माहेर असलेल्या सिंदखेड राजा (मतदारसंघ) मध्ये काका विरुद्ध पुतणी असा राजकीय-निवडणुकीय संघर्ष होऊ घातलेल्या विधानसभा लढतीत रंगण्याची चिन्हे आहेत. यासाठी राज्यातील दिग्गज पवार घराणे अप्रत्यक्षपणे का होईना कारणीभूत आहे. गायत्री शिंगणे यांचे वडील हयात असेपर्यंतचा हा कौटुंबिक संघर्ष मागील दोनेक वर्षांत राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. यंदाच्या विधानसभेत काका पुतणी मधील निवडणुकीय संघर्ष लढती पूर्वीच जिल्हाच नव्हे राज्यासाठी लक्षवेधी ठरला आहे. (Sindkhed Raja)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button