2024 Breaking : Titavi Talav : शेतीसाठी पाणी..
आदिवासी बहुल गावात शेती हेच प्रमुख उदरनिर्वाह करण्याचे साधन
Titavi Talav : आदिवासी बहुल गावात शेती हेच प्रमुख उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध व्हावे म्हणून टिटवी तलावातून पाणी सोडण्यात आले.
किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज. WWW.LONARNEWS.COM
Titavi Talav : शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत शेती सुजलाम सुफलाम करावी : भगवानराव कोकाटे
लोणार : शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत शेती सुजलाम सुफलाम करावी असे आवाहन मुंगसाजी माऊली पाणी वापर संस्था टिटवीचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी ७ डिसेंबर २०२४ रोजी टिटवी येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
रब्बी हंगाम सुरु झालेला असून गहू व हरभरा या पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता असते. यामुळे लोणार तालुक्यातील मुंगसाजी माऊली पाणी वापर संस्था टिटवी यांच्या अंतर्गत असलेल्या टिटवी तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सोडण्यात आले. यावर्षी टिटवी तलावात मुबलक पाणीही असल्याने येथील तलावातील पाणी टिटवी, गोत्रा, नांद्रा शेतकऱ्यांसाठी कॅनालच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कमर्चारी व संस्थाचे अध्यक्ष, सदस्य यांच्यासह शेतकऱ्यांच्या उपस्थित सोडण्यात आले.
टिटवी, गोत्रा, नांद्रा या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गहू, हरबरा, शाळू अशा रव्बी पिकांना कॅनालच्या गेटद्वारे पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. टिटवीच्या तलावावर अंदाजे ४०० हेक्टर सिंचन होत असते. यावर्षी तलावात मुबलक पाणी असल्याने आदिवासी बहुल टिटवी, नांद्रा, गोत्रा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो. पाणी उपलब्ध असले तरी पाण्याचा काटकसरीने तसेच नियोजनबद्ध वापर करून शेती सुजलाम सुफलाम करावी असे आवाहन भगवानराव कोकाटे यांनी यादरम्यान केले.
बुलढाना पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सु.शा.सोळंके यांचे हस्ते पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभाग मेहकर उपविभागीय अधिकारी एन.पि.महाजन, लोणार शाखा अधिकारी गावित, मुंगसाजी माऊली पाणी वापर संस्था टिटवीचे अध्यक्ष भगवानराव कोकाटे, सर्व संचालक, सदस्य बबन कोकाटे, मुरलीधर कूटे, भगवान नामदेव कोकाटे, संतोष राऊत, प्रभु तनपुरे, रतन कोकाटे, सुरेश राऊत, रामा माघाडे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (Titavi Talav)