1 Breaking – Jalna – वाळू चोरीला जबाबदार कोण?
नदीपात्रातील अवैध उत्खनानाचे पंचनामे कोण व कधी होणार ? : नदीत जाणारे शेतरस्ते अद्यापही मोकाट ?

Jalna : मराठवाड्यातील पुर्णा नदीकाठच्या वाळू चोरीमुळे भरधाव वेगाने चालणाऱ्या टिप्पर मुळे मराठवाडा व विदर्भातील नागरिक त्रस्त..
Jalna : पुर्णा नदीपात्रातुन अंदाजे 5 हजार ब्रास वाळू चोरीला जबाबदार कोण ?
Edited By : बाळासाहेब राऊत, जालना, टीम लोणार न्यूज. www.lonarnews.com
जालना : मंठा तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातून शेकडो ब्रास वाळू उत्खनन करून विक्री सुरू आहे. ऑक्टोंबरनंतर पुर्णा नदीपात्रात कोरडे पडल्यानंतर अंदाजे 5 हजार ब्रास वाळूची चोरी झाल्याची बाब एका पाहणीतून समोर आली. विषेश म्हणजे , या वाळू चोरीकडे मंठा महसूल व पोलीस, परतुर एसडीएम व डीवायएसपी, जालना एलसीबी व आरटीओ यांच्यासह जिल्हा गौण खनिज अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मराठवाड्यातील पुर्णा नदीकाठच्या वाळू चोरीमुळे भरधाव वेगाने चालणाऱ्या टिप्पर मुळे मराठवाडा व विदर्भातील नागरिक त्रस्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. (Jalna)
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात येत असलेल्या तळणी सर्कल मधील पुर्णा नदीकाठच्या लिंबखेडा, किर्ला, वाघाळा, टाकळखोपा, लिंबखेडा, उस्वद, देवठाणा, खोरवड, पोखरी केंधळे व भुवन या गावांच्या हद्दीतून रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गावांतील रस्त्यांवरील नागरिकांना रात्री झोपने कठीण झाल्याची चर्चा समोर येत आहे. मात्र रेती माफियांच्या दादागिरीने कळस गाठलेला असल्याने त्यांच्या विरोधात कोणीही तक्रार देण्यास धजावत नाहीत.
पुर्णा नदीकाठच्या गावांमध्ये नदीकाठचे काही शेतकरी व नदीपात्रात वाहणे उतरविण्यासाठी शेतरस्ते देणारे काही शेतकरी, वाळू भरणारे शेकडो मजूर व खबरी यांच्यासह स्थानिक जेसीबी, ट्रॅक्टर व टिप्पर धारक यांची साखळी पद्धतीने राजरोसपणे वाळू चोरी सुरू आहे. नदीपात्रात उत्खननासाठी वेगवेगळे स्वतंत्र ठिय्या व गावात वेगवेगळे स्वतंत्र वाळू साठे तयार केले आहेत. या वाळू चोरीत नेमका कोणाचा सहभाग आहे ? ज्यामुळे सर्वसामान्यांना उघड्या डोळ्याने पाहूनही गप्प बसण्याची वेळ आली आहे.
याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता रेती माफियांची खूप मोठी दहशत असल्यामुळे काही कारवाई होत नाही, बोलून किंवा निवदेन देऊन काहीही कारवाई होत नसल्याचे त्रस्त नागरिकांनी सांगितले. (Jalna)
कारवाई करून पायबंद होतांना दिसत नाही….
तलाठी, तळणी मंडळ अधिकारी, मंठा नायब तहसीलदार व तहसीलदार, परतुर एसडीएम, जालना जिल्हा गौण खनिज अधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनातील स्थानिक पोलीस, तालुका ठाणे, डीवायएसपी, एलसीबी, आरटीओ व जिल्हा स्तरावरीय पथक यांच्या नियुक्त कर्मचाऱ्याकडून वाळू चोरी विरुद्ध ठोस कारवाई करून पायबंद घातलेला दिसत नाही. (Jalna)
जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेती माफियांवर अंकुश बसवण्यासाठी पुढाकार घ्यावा. रेती माफियांची वाढत चाललेली दहशत संपवावी. सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुकर करावे अशी मागणी होत आहे.
या संदर्भात तळणी मंडळ अधिकारी अनिल उफाड यांना विचारले असता त्यांनी सागितले की, पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूकीविरूध्द कारवाई केली जाईल, वाळू चोरीचे रस्ते बंद करणात येईल. वाळू चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा वर बोजा टाकण्यात येणार आहे. लवकरच उत्खननाचे पंचनामे करून स्थानिक ट्रॅक्टर टिप्पर चालकांना दंडात्मक नोटीस देण्यात येणार आहे.