स्थानिक बातम्या

2024 Breaking Vidhansabha :आरक्षण‌ बचाव यात्रा

समस्या जाणणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा : वंचित बहुजन आघाडी

Vidhansabha : वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याच्या वतीने मेहकर-लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण‌ बचाव यात्रा काढण्यात आली.

Vidhansabha : समस्या जाणणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा : वंचित बहुजन आघाडी

Vidhansabhaमेहकर विधानसभा विशेष : आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक उमेदवार पूर्ण ताकदीने तयारीला लागल्याचे दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचे उमेदवार जनसंपर्क वाढवत आपली विचारधारा, ध्येय, निवडून दिल्यास काय विकासकामे करणार हे मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते नागवंशी संघपाल पनाड निवडणूक लढविणार असल्याचे लोणार तालुक्यात निघालेल्या आरक्षण बचाव यात्रा मधून स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.

सविस्तर वृत्त असे की, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, महासचिव प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. के.बी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार तालुक्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी  आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली. यावेळी लोणार तालुका महासचिव बळी मोरे, युवा जिल्हा सचिव आदित्य घेवंदे, ज्येष्ठ नेते सुभाष मोरे, शहराध्यक्ष दीपक अंभोरे, युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अनिल पवार, तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरक्षण बचाव यात्रा सुलतानपूर ते बोरखेडी, वेणी, गुंधा, हिरडव, गायखेड, पळसखेड मार्गे लोणार येथे पोहचून हिरडव चौक ते बस स्थानक चौकामध्ये मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. बसस्थानक समोर आरक्षण बचाव यात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान  मान्यवरांनी ओबीसी आरक्षण, स्कॉलरशिप, पदोन्नती आरक्षण या विषयावर हात घालून ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला हात न लावता गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

Vidhansabhaदरम्यान मेहकर विधानसभा मतदारसंघातील विविध रखडलेल्या कामांच्या संदर्भात जनजागृती करण्यात आली व ओबीसी बांधवांना आव्हान करण्यात आले की, ड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवाराला मताधिक्याने विधानसभेमध्ये पाठवावे जेणेकरून आरक्षण टिकवण्यासाठी बाजू मांडता येईल आणि लढा देता येईल. विधानसभेमध्ये बहुजन बांधवांचा आवाज त्या ठिकाणी उठवता येईल. ड. बाळासाहेब आंबेडकराचे हात मजबूत करून आपल्या समस्या जाणणारा आपला प्रतिनिधी जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करत विधानसभेत पाठवावा, असेही यावेळी जनतेला आव्हान करण्यात आले. (Vidhansabha)

Vidhansabhaयावेळी लोणार तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीचे श्रीराम पनाड, दादाराव पनाड, किरण पनाड, राजहंस जावळे, सुबोध घेवंदे, महेंद्र मधुकर पनाड, मंगेश पनाड, महेश मोरे, मनोहर पनाड, प्रसेंजीत पनाड, शिवाजी खोलगडे, संजय शेजुळ, रतन‌ कटारे, जावळे, ग्रा.प.सदस्या सुमन पनाड, कमल शेजुळ यांच्यासह शेकडो महिला व पुरुष, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. (Vidhansabha)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button