2024 Election Breaking : काँग्रेसची दावेदारी..
मेहकर विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवार देण्यात यावा काँग्रेसची मागणी
2024 Election Breaking : मेहकर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पकड असल्याने स्थानिक उमेदवार देत हया मतदार संघाची जागा कॉंग्रेसला द्यावी यासाठी लोणार-मेहकर मधील पदाधिकारी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
2024 Election Breaking : मेहकर विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला राहावी : लक्ष्मण घुमरे
17 ऑक्टोबर 2024 रोजी मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या बूथ एजंट व बूथ अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे निरीक्षक दिनेश गुजर यांनी सदर बैठकीला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्याम उमाळरकर होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक अविनाश उमरकर तसेच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे जिल्ह्याचे निरीक्षक प्रा. संतोष आंबेकर, मेहकर विधानसभेचे पक्षनेते लक्ष्मण घुमरे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मेहकर शहर व मेहकर तालुका तसेच लोणार शहर व लोणार तालुका अध्यक्ष देवानंद पवार, पंकज हजारी, राजेश मापारी, शेख समद शेख अहमद यांनी आपले बूथ कमिटीचे अहवाल सादर केले. याप्रसंगी दिनेश गुजर यांनी देशातील बीजेपी सरकार कशा पद्धतीने देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे याबद्दल सांगितले तसेच काँग्रेसच्या इतिहासाची आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये अहोरात्र काम करावे व काँग्रेसला विजय मिळवून द्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. (2024 Election Breaking)
यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्ष नेते लक्ष्मण घुमरे यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा सादर करत असताना या मतदारसंघांमध्ये सध्याचे आमदार यांनी मतदारसंघांमध्ये कोणत्याच प्रकारचा विकास केलेला नाही. सर्वांगिनविकास येथे कुठला झालेला नाही. मेहकर व लोणार या शहर सौंदर्यकरणाचा प्रयत्न येथे झालेला नाही. दोन्ही शहराला व ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. पंधरा- पंधरा- वीस – वीस दिवस पिण्याचे पाणी या शहरांना व ग्रामीण भागामध्ये मिळत नाही अशा प्रकारची दुर्दशा करून ठेवलेली आहे. याची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. (2024 Election Breaking)
त्यामुळे हा मतदारसंघ सर्वांगीण विकासापासून कोसो दूर आहे. या मतदारसंघात काँग्रेसची शक्ती असून येथे काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्यासाठी ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तसेच काँग्रेसचे उमेदवार हे स्थानिक असून या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून स्थानिकच उमेदवार द्यावा असा लोक आग्रह असून या मतदारसंघांमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्यास प्रचंड नाराजी होऊ शकते व हा मतदारसंघ पुन्हा शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात जाऊ शकतो. तेव्हा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विचार करून या मतदारसंघांमध्ये स्थानीकच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना या मतदारसंघात काँग्रेस बळकट असून काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा तसेच देशात व राज्यात भाजपाचे शासन कसे अत्याचार करतात याची उदाहरणे त्यांनी दिली.
यावेळी जिल्हा समन्वयक अविनाश उमरकर व मतदार संघाचे निरीक्षक प्रा.संतोष आंबेकर यांनी सुद्धा अत्यंत चांगलं मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर नंदूभाऊ बोरे, प्रकाश धुमाळ, भूषण मापारी, विलास चनखोरे, वसंतराव देशमुख, शैलेश सावजी, आरती दीक्षित, शांतीलाल गुगलीया, कलीम खान, भास्कर ठाकरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व बूथ कमिट्याचे प्रमुख फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बावस्कर यांनी केले तर आभार माननीय शेख समद शेख अहमद यांनी मानले. तत्पूर्वी पाहुण्यांचे आगमन मेहकर शहरांमध्ये झाले असताना सप्तशृंगी महिला अर्बन मध्ये लक्ष्मण घुमरे, कासम गवळी, देवानंद पवार, अलीम भाई, संतोष खरात, बाळासाहेब ससाणे यांनी त्यांचे स्वागत केले. (2024 Election Breaking)