1 Breaking : Risod APMC : देश पातळीवर नोंद
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हळदीचे उत्कृष्ट खरेदी- विक्रीचे नियोजन : विष्णुपंत भुतेकर

Risod APMC : हळद खरेदी- विक्रीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे रोजगार निर्मितीसह रिसोड व्यापार पेठेला आणि शेतकऱ्यांनाही फायदा होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले.
Risod APMC : रिसोड बाजार समितीकडून चीया व भुईमूग शेंग खरेदीला होणार सुरवात ….
किशोर मापारी, मुख्य संपादक, लोणार न्यूज. Www.LonarNews.Com
रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हळदीच्या उत्कृष्ट खरेदी- विक्रीच्या नियोजनामुळे रिसोड बाजार समितीने नवीन उच्चांक प्रस्थापित केलेले आहेत. हळदीच्या खरेदी-विक्रीमुळे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीची नोंद देश पातळीवर घेतली जात आहे. हळद खरेदी- विक्रीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे रोजगार निर्मितीसह रिसोड व्यापार पेठेला आणि शेतकऱ्यांनाही फायदा होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले.
पर्यायी पीक म्हणून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी रब्बी हंगामामध्ये चिया पिकाकडे वळत आहेत. रिसोड तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी 970 हेक्टर क्षेत्रावर चीया पिकाची लागवड केलेली आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यावर्षीपासून चिया च्या खरेदीचा शुभारंभ केला जाणार आहे. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले.
त्याचबरोबर तालुक्यात उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी भुईमूग पिकाची लागवड करतात. भुईमूग शेंगाची सुद्धा खरेदी करण्याचा संकल्प रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आला असून 7 जानेवारीला झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत दोन्ही पिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले. (Risod APMC)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून फेब्रुवारीमध्ये हळद परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. हळद परिषदेसाठी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विक्रमी हळद उत्पादक शेतकरी जोडप्यांचा सत्कार व तज्ञांद्वारे शेतकऱ्यांना हळद पिकाचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. रिसोड बाजार समितीमध्ये स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेण्यात आला असून लवकरच रिसोड बाजार समिती कडून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले.