2024 Exclusive Festive , पितृ पंधरवडा…..
कावळ्याची काव-काव हरपली, पितृ पक्षात नैवद्य दाखवायचा कोणाला ?
2024 Exclusive Festive : हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक सणावाराला निसर्गाला देखील प्राधान्य दिले जाते.
2024 Exclusive Festive : कावळ्याची काव-काव हरपली
पितृ पक्षात नैवद्य दाखवायचा कोणाला ?
सचिन गोलेच्छा, पत्रकार, लोणार. www.lonarnews.com
गणेश विसर्जनानंतर येणाऱ्या पितृ पंधरवड्यात आप्तेष्ट मृतात्म्यास मोक्षप्राप्ती मिळावी यासाठी दरवर्षी पुण्यतिथी, पितरे तर कोणी श्राद्ध घालतात. या विधीत पिंडदान करण्यात येते. त्याकरिता ‘काकस्पर्श’ (कावळा) महत्त्वाचा असतो. परंतु वाढते शहरीकरण व मानवी हस्तक्षेपामुळे शहरच नव्हे तर ग्रामीण भागातही कावळ्यांची काव काव हरपली असल्याचे दिसतय. या परिस्थितीत नैवद्य कोणाला दाखवायचा असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे चर्चेतून समोर आलं आहे.
पितरांचे श्राद्ध हे भाद्रपद पौर्णिमे पासून तर आश्विन महिन्याच्या अमावास्यापर्यत या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक सणावाराला निसर्गाला देखील प्राधान्य दिले जाते . या वर्षीचा पितृ पंधरवडा पंधरा दिवसांचाच असल्याचा सांगण्यात आले आहे. 17 सप्टेंबर पासून ते 02 ऑक्टोबर पर्यंत तो आहे. (2024 Exclusive Festive)
पितृ पंधरवड्यात पोळी, खीर,भात, दोन भजी, दोन भाज्या, पापडी तसेच पिंडीला खाण्यासाठी कावळे आवश्यक असतात. परंतु अलीकडच्या काळात शहरच नव्हे तर ग्रामीण भागात देखील कावळ्याची संख्या कमी झाली आहे. दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. यामुळे पिंडदान करणाऱ्यांना तासनतास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चर्चेतून समोर आलं आहे. एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. पिंडदानाचा नैवद्य ठेवताच कावळे तो उचलून न्यायचे. सध्या मात्र कावळे दुर्मीळ झाले आहेत. परिणामी अगदी सहजासहजी ऐकू येणारी कावळ्यांची काव काव आता दुर्मीळ झाली आहे. यामुळे पितृ पंधरवड्यात पिंडदान करणाऱ्यांना काकस्पर्श विना पित्रांना नैवद्य दाखवावा लागत असल्याचे खंत अनेकांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. (2024 Exclusive Festive)
जून महिन्यात पेरणी होते, पेरणी करताना कीटक मातीतून वर येतात. कावळ्यांचे ते अन्न असते. सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान पीक हाती येते. यावेळी देखील त्यांना खाद्य उपलब्ध होते. अलीकडच्या काळात प्रचंड क्षमतेची कीटकनाशके पिकांवर व जमिनीवर फवारली जातात. यामुळे कावळ्यांना कीटक खाद्याला मिळत नाहीत. तसेच विषबाधित किटके सेवन केल्यामुळे कावळ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
बेसुमार कीटकनाशकांचा वापर होत असल्याने कावळेच नव्हे तर मधमाशांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात घटली असल्याचे दिसते.
संजय शेटे, शेतकरी
कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला असून सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत हे मन्वन्तर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल, असे म्हणतात.
कावळा पिंडाला शिवला की त्या काकस्पर्शाने मृत व्यक्तीच्या सा-या इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. श्राद्धाच्या दिवशी त्याला जेवण वाढतो. कारण आपल्या पूर्वजांशी नाते जोडणारा तो एकमात्र दुवा असतो. त्याने घास खाल्ल्यावर आपले मन शांतवते. असा हा कावळा बालपणापासून ते बाराव्यापर्यंत आपला सोबती असतो.