2024 Honored : राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार
डॉ. मिलिंद विठ्ठल गायकवाड यांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान
2024 Honored : लोणार शहरातील डॉ. मिलिंद गायकवाड यांचा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान होणे ही लोणारकरांच्या मानाची बाब आहे. त्यांच्या पुढील उज्वल कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.
2024 Honored : लोणार येथील डॉक्टर मिलिंद विठ्ठल गायकवाड यांची गरुड झेप
डॉ. मिलिंद गायकवाड यांना राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान ..
समर्थ फाऊंडेशन आणि एज्यूरिक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राज्यस्तरीय शिक्षक गौरव” पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 सकाळी 10 वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, मामलेदार कचेरी जवळ, स्टेशन रोड/ प्रभात रोड,ठाणे पश्चिम येथे पार पडला. “राज्यस्तरीय शिक्षक गौरव” पुरस्कार प्रदान सोहळयाचे प्रमुख पाहुणे आमदार ॲड. निरंजन डावखरे सो. महाराष्ट्र विधानपरिषद, सन्माननीय पाहुणे मिलिंद बल्लाळ मालक व संपादक, ठाणे वैभव वर्तमानपत्र, ठाणे, विशेष अतिथी राजेश जाधव उपाध्यक्ष- ठाणे शहर भाजपा तथा संस्थापक – ब्रह्मांड कट्टा, ठाणे हे लाभले.
(2024 Honored)
समर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक साबळे यांनी पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचालन आणि निवेदन ॲड. सुनिता साबळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती वंदन आणि महाराष्ट्र गीताने झाली. आमदार ॲड.निरंजन डावखरे यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांनी टेक्नोसावी होणे कसे गरजेचे आहे हे त्यांनी माकड व टोपीवाला या कथेच्या आधाराने अतिशय मार्मिकपणे शिक्षकांसमोर मांडले.
मिलिंद बल्लाळ यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की, शिक्षक समर्थ असला तर देशाचे फाउंडेशन भक्कम राहील. तसेच शिक्षकांनी कशाप्रकारे अपडेट रहायला हवे हे सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. शिक्षकांसमोर टेक्नॉलॉजी चे खूप मोठे आव्हान आहेत. पूर्वीच्या काळी शिक्षकांनी जे सांगितले ते किंवा शिक्षकांनी जे सांगितले ते विद्यार्थ्यांसाठी पूर्व दिशा होती, परंतु आता तसे राहिलेले नाही. कारण विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वीच त्या विषयाची माहिती युट्युब, गुगल, विकिपीडिया वरून बघून आलेला असतो. त्यामुळे शिक्षकाला खूप जागरूकपणे वर्गात शिकवावे लागते. दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. तसेच 10 वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार ही यावेळी करण्यात आला. ॲड.सुनिता साबळे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
लोणार येथील कै.कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व अमृत सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश क. बनमेरू तसेच महाविद्यालय मधील प्राध्यापक व कर्मचारी यांच्याकडून डॉ.मिलिंद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श घेता येईल असे मत सत्कार करतेवेळी व्यक्त करण्यात आले. (2024 Honored)