2024 Important : Navratri उत्सवाची आतुरता !
सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी : अवघ्या जनजीवनाला उत्सवाची आतुरता
Navratri : लोणार शहरातील बाजारपेठ नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली असून उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल वाढली आहे. उत्सवाच्या माहोलामुळे जनसामान्यांमध्ये आतुरता वाढली आहे.
Navratri : वेध दुर्गोत्सवाचे… मंडप सजू लागले…..!
सार्वजनिक मंडळांची जय्यत तयारी : अवघ्या जनजीवनाला उत्सवाची आतुरता
Reported By : सचिन गोलेच्छा, लोणार, जि. बुलढाणा. www.lonarnews.com
सर्वपित्री अमावस्येने पितृपंधरवड्याची सांगता होत असून गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाची लगबग आता दिसू लागली आहे. सर्वत्र उत्साहात साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जनसामान्यांमध्ये आतुरता वाढली आहे. नवरात्रौत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची मंडप उभारणीची कामे अखेरच्या टप्प्यात आली असून, दुर्गामूर्तीचे आगमन, विसर्जन मिरवणुकांसह उत्सव काळातील कामांच्या नियोजनांसाठी जोरात तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. लोणार शहरात सोमवार असलेला आठवडी बाजारपेठतही दुर्गोत्सवासाठी सज्ज झाली होती.
पक्ष पंधरवडा संपताच अश्विन शुद्ध प्रतिपदेला नऊ दिवसांचा दुर्गोत्सव सुरू होत असून, हा उत्सव सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा होतो. या वर्षी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून, नऊ दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात नवरात्रौत्सवाची जोरात तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या मंडळांची दुर्गोत्सवाच्या तयारीसाठी नियोजनबद्ध तयारी असल्याचे दिसून येत आहे. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी भव्य मंडप उभारणी करण्यात येते.
सध्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळामध्ये मंडप उभारणीची कामे अंतिम टप्प्यात असून दुर्गामूर्तीचे आगमन, विसर्जन मिरवणुकांसह उत्सव काळातील कामांच्या नियोजनांसाठी मंडळाची चर्चा होत असल्याचे सांगण्यात आले. लोणार शहरातील प्रताप चौक, शिक्षक कॉलनी, मापारी गल्ली यासह चौका-चौकात दुर्गोत्सवासाठी सजावटीसाठी मंडपाचे वस्तू दिसू लागले आहेत. परतीच्या पावसामुळे या कामात अडथळा येत असला तरी मंडळातील कार्यकर्ते मात्र मेहनत घेट आहेत. (Navratri)
लोणार शहरातील बाजारपेठही नवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली असून, उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची रेलचेल वाढली आहे. तसेच शहरातील बसस्थानक चौक परिसरात नवरात्रीच्या पूजेसाठी लागणारी शेतातील काळी माती, मातीचे सुघट, नाडापुडी, सप्तधान्य, उदबत्ती, पत्रावळी आदी पूजा साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध झाले आहे. वातावरण व बाजारपेठेतील उत्सवाच्या माहोलामुळे जनसामान्यांमध्ये नवरात्र उत्सवाची आतुरता वाढली आहे
घरोघरी नवरात्र उत्सवाची तयारी…..
सार्वजनिक नवरात्र उत्सवामध्ये मंडळांबरोबरच घरोघरीही उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. महिला वर्गात नऊ दिवस उपवास करून नवरात्रीचे व्रत केले जाते. फलाहार व सात्विक भोजनासह देवीची उपासना केली जाते. त्यामध्ये तन-मनाचे पावित्र्य राखण्याला प्राधान्य दिले जात असल्याने घराच्या स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेवर भर दिला जात आहे. (Navratri) हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्व आहे. नवरात्री म्हणजे नऊ रात्र देवीची पूजा आणि उपवास करण्याला खास महत्व आहे. शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होत आहे, जो १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात.