राष्ट्रीय

2024- Kolkata Doctor Murder “त्या” घटनेचा निषेध

“त्या” घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना लोणार येथील डॉक्टरांचे निवेदन!

Kolkata Doctor Murder : महिला डॉक्टरचा अमानुष बलात्कार करून हत्या करण्यात आली. घटनेचा निषेध करत देशभरातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

Kolkata Doctor Murder “त्या” घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना डॉक्टरांचे निवेदन!

शहरातील वैद्यकीय सेवा काही काळ ठेवण्यात आली बंद..

किशोर मापारी, एडिटर, लोणार न्यूज www.lonarnews.com

लोणार : कोलकता येथील कर वैद्यकीय महाविद्यालयातील परीक्षार्थी डॉ. मोमिता देबनाथ यांच्या हत्येच्या निषेधार्थ लोणार डॉ. असोसिएशन च्या वतीने लोणार तहसीलदार भूषण पाटील यांना निवेदन देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शासनाकडे 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली.

Kolkata Doctor Murderकोलकाता येथील हत्येची घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या  घटनेमुळे देशातील तमाम डॉक्टर दहशतीच्या छायेत आले असून या नृशंश हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून दोषींना फासावर लटकवावे, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली. सदर निवेदन देतेवेळी शहरातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मृती बोरा, डॉ.अनुपमा झोरे,  वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता मापारी, डॉ.उज्ज्वला काटोले, डॉ.ऋतू आडे, डॉ.वर्षा मापारी, डॉ.स्नेहल गवई, डॉ.राजलक्षमी बगडिया यांच्यासह लोणार आय.एम.ए., लोणार होमिओपॅथीक असोसिएशन, लोणार निमा असोसिएशन, लोणार डेंटल असोसिएशन चे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kolkata Doctor Murder)

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दुसऱ्या बाजूला या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसतशी नवीन व धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो या घटनेचा तपास करत आहे) सांगितलं की, रुग्णालयातील काही इंटर्न व डॉक्टर या गुन्ह्यात सहभागी असू शकतात. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. यासह मृत तरुणीच्या आई-वडिलांचा ज्या-ज्या लोकांवर संशय़ आहे त्यांच्या नावांची यादी त्यांनी सीबीआयला दिली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंततर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. (Kolkata Doctor Murder)

एका सीबीआय अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, पीडितेच्या आई-वडिलांनी आम्हाला सांगितली की त्यांच्या मुलीवरील बलात्कार व हत्येमागे अनेक जण असू शकतात. त्यांनी त्यांच्या मुलीबरोबर रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर व इंटर्न्सवर (प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी) संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आम्हाला काही नावं दिली आहेत

सीबीआय सध्या सुरुवातीच्या काळात या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांकडे चौकशी करत आहे. सीबीआयचे अधिकारी म्हणाले, “आम्ही आतापर्यंत 30 संशयितांची यादी बनवली आहे, आम्ही त्यांची व इतर संबंधिताची चौकशी करत आहोत”. (Kolkata Doctor Murder)

माजी प्राचार्यांची चौकशी

सीबीआयने शुक्रवारी (16 ऑगस्ट) रुग्णालयातील काही डॉक्टरांची, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची चौकशी केली जे घटनेच्या दिवशी रुग्णालयात हजर होते. यासह सीबीआयने रुग्णालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चौकशीसाठी नेलं आहे. बलात्कार व खूनाच्या घटनेनंतर डॉ. घोष यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना घोष यांनी भिती व्यक्त केली होती की त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना एकल पीठाकडे जाण्यास सांगितलं आहे. (Kolkata Doctor Murder)

Kolkata Doctor Murder3 डी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएट करणार

कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज व इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. दरम्यान, सीबआयने संजय रॉय याला बोलवलं आहे. सीबीआय 3 डी तंत्रज्ञानाच्या मदतीने क्राईम सीन रिक्रिएट करत आहे. तसेच याच इतर डॉक्टरांची मदत घेत आहे.

महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा

बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा दावा केला जातोय. मृत डॉक्टरशी अनेकवेळा बळजबरीने शरीससंबंध टेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. सकाळी 3 ते 5 वाजेदरम्यान महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. या डॉक्टरच्या डोक्यालाही मार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार पीडित डॉक्टरचे तोंड बंद करण्यात आले होते. (Kolkata Doctor Murder)

अनेकवेळा करण्यात आला बलात्कार- डॉक्टर

मिळालेल्या माहितीनुसार आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुवर्मा गोस्वामी यांनी बलात्कार पीडित महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार पीडित महिलेवर अनेकवेळा अत्याचार करण्यात आला. पीडित महिलेवर क्रुरपणे अत्याचार करण्यात आला. तेथे एकापेक्षा अधिक लोक होते. पीडित डॉक्टरवर अनेकवेळा लैंगिक अत्याचार करण्यात आला. दुष्कर्म केल्यानंतर या डॉक्टरचा गळा दाबून खून करण्यात आला.

बलात्कार प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

Kolkata Doctor Murderदरम्यान, या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सध्या कोलकाता शहरात तणावाची स्थिती आहे. आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. एक ज्युनियर डॉक्टर जी तिच्या दीर्घ शिफ्टनंतर थकल्याने जरा आराम करायला गेली होती, तिच्यावर संतापजनक घटना घडली. हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. (Kolkata Doctor Murder)

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, घटनेनंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात या प्रकरणात अनेक लोक सामील असल्याचा दावा केला जात आहे. एका रुग्णालयातील इंटर्न आणि दुसऱ्या रुग्णालयातील पीजीटी डॉक्टर यांच्यातील संभाषणाची ही व्हायरल ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. संभाषणादरम्यान, इंटर्नने सांगितले की खरी कथा वेगळीच आहे. हे संपूर्ण प्रकरण नाटकी असल्याचे इंटर्न सांगताना दिसत आहे. ज्यांनी ही घटना घडवली ते खरे गुन्हेगार अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत, असंही ती यात म्हणते. (Kolkata Doctor Murder)

संजय रॉयला बळीचा बकरा बनवलं

या ऑडिओमध्ये इंटर्न पुढे म्हणतो की, ‘आमच्यावर अवलंबून राहून बाहेरचे लोक खूप काही करु शकतात, हे पाहून बरे वाटते. पण, आपण एकटे टिकू शकत नाही. संजय रॉयला बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही हे सर्व विसरुन जावं, पण तसं करणं शक्य नाही, हे त्यांना माहीत नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरवर एकाने नव्हे तर दोन-तीन जणांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. यावर पीजीटी डॉक्टर विचारतात की, ‘हे कोण असू शकतात?’ तुला कोणावर संशय आहे?’

दुसऱ्या इंटर्नवर संशय व्यक्त करत हा इंटर्न म्हणतो की, ‘त्याचे कुटुंब खूप मोठ्या पदावर आहे. मी नाव घेऊ शकत नाही, नाहीतर मी अडचणीत येईल. माझ्याच बॅचमेटने हे कृत्य केले आहे याचा विचार करून मला दु:ख होतं. आता त्याला वाचवण्यासाठी अनेक खेळ खेळले जात आहेत. ऑडिओमध्ये, इंटर्न पीजीटी डॉक्टरांकडून बाहेरील मदतीची मागणी करतानाही दिसत आहे. तो म्हणतो की, ‘कृपया कॉलेजकडून काही अपेक्षा ठेवू नका, आरोपीला लपवले जात आहे. येथे जनरल मिटिंगमध्ये काहीच सांगितले जात नाहीये. प्रिन्सिपल येऊन म्हणतात की ती रात्री तिथे का झोपली?, या व्हायरल ऑडिओनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Kolkata Doctor Murder)

ज्याप्रकारे तिचा गळा आवळण्यात आला ते एकाचं काम नाही

मात्र, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओला दुजोरा देत नाही. कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या असून या प्रकरणात फक्त एकच व्यक्ती सहभागी असल्याचे सांगितले आहे. पण, एकटा माणूस अशी भीषण घटना घडवून आणू शकतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. फॉरेन्सिक तपासात ज्या पद्धतीने महिला डॉक्टरचा गळा दाबला गेला त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोलकाता हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. शुक्रवारी सीबीआयने आर.जी.कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी केली. (Kolkata Doctor Murder)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button