1 Special Attraction Of Dipawali – लक्ष्मीपूजन
शहर व परिसरात फटाक्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी
Dipawali : बच्चे कंपनी छोटा भीम, अॅंग्री बर्ड, बॅनटेन, डोरोमनच्या पाहून आपल्या कपडय़ांची पसंती करत आहे. एकूणच बाजारपेठ दिवाळीमय झाल्याचे चित्र.
Dipawali : शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण..
नेत्रदीपक आकाशकंदिल, आकर्षक पणत्या, फटाक्यांनी सजलेली दुकाने, पूजा साहित्याचे विशेष ‘कीट’, खतावणी व रोजमेळच्या वह्या तसेच दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर नानाविध साहित्याच्या खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर बाजारपेठमध्ये झुंबड उडाल्याचे पहावयास मिळत आहे.
ग्रामीण भागातही उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. काहींनी ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दिपावली कीट उपलब्ध करून दिले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाची निर्माण होऊ पाहणारी मक्तेदारी भारतीय साहित्याने मोडून काढल्याचे दिसत आहे. Dipawali
दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदीलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यंदा चिनी मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून पर्यावरणस्नेही विशेषत: ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाश कंदीलला विशेष मागणी आहे. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा असे प्रकार आहेत. तर प्लास्टिकद्वारे तयार केलेला ‘फायर बॉल’ ही अनेकांचे लक्ष वेधुन घेत आहे. जुन्या चांदणी आकारातील आकाशकंदील, सजावटीसाठी वापरण्यात येणारे लहान आकारातील आकाश दिव्यांच्या माळांची विक्री होत आहे. पणत्यांमध्ये नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्या, कुंदन वर्क, रंगीत टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाऱ्या पणत्या तसेच या शिवाय मेणाच्या जेल पणत्या उपलब्ध आहेत. Dipawali
तसेच, लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्य़ा, बत्तासे हे साहित्य बाजारात उपलब्ध दिसले. अभ्यंग स्नानासाठी आवश्यक उटणे, सुगंधी तेलाची काही खास उत्पादने बाजारात आली आहेत. आजच्या संगणकीय युगात पारंपारिक खतावणी व रोजमेळ, रोजनिशी आपले महत्व अबाधित राखून आहेत. अगदी तळहाताच्या आकारातील खतावण्यांपासून ‘ए – ४’ आकारातील रोजमेळा, खतावण्या बाजारात ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे. सगळीकडे संगणकीकरण झाल्याने खतावणी, रोजमेळीला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद आहे. मात्र दिवाळीच्या तीन ते चार दिवसात विशेष: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किमान पूजेसाठी व्यापाऱ्यांकडून खतावणी वा रोजमेळी खरेदी केली जात असल्याचे दिसून आले.
शहर व परिसरात फटाक्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी दिसूण आली . नभांगण प्रकाशाने व्यापणाऱ्या फटाक्यांना बच्चे कंपनीची विशेष पसंती मिळाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी ग्राहकांनी कमी आवाजाचे म्हणजेच म्युझिकल, केवळ प्रकाशझोत फेकणाऱ्या फटाक्यांना पसंती दिली. त्यात म्युझिकल बटरफ्लाय, रिमझिम प्रकारच्या फटाक्यांनी सर्वाचे लक्ष वेधले.
कपडे खरेदीलाही उधाण आले आहे. विविध मालिकांमधील नायिकांच्या साडय़ांची ‘क्रेझ’ महिला वर्गात दिसुन येते. दुसरीकडे महिलांसाठी सहा वार, तसेच नववार तयार साडय़ उपलब्ध असलेल्या दिसून येत आहे . बच्चे कंपनी छोटा भीम, अॅंग्री बर्ड, बॅनटेन, डोरोमनच्या पाहून आपल्या कपडय़ांची पसंती करत आहे. एकूणच बाजारपेठ दिवाळीमय झाल्याचे चित्र आहे.