45 Years Strong Player Ramesh Chavan !
पत्रकार रमेश चव्हाण यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !
Ramesh Chavan : 45 वर्षे वयोगट असलेला म्हातारा जर स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले नामांकन प्राप्त करू शकतो तर निश्चितच युवकांनी याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे.
पत्रकार रमेश चव्हाण यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ! Ramesh Chavan
हैद्राबाद : मास्टर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सिल्वर मेडल ! Ramesh Chavan
पत्रकारिता क्षेत्रात लीडर निर्मल ख्याती प्राप्त करणारे दैनिक खोजमास्टरचे मुख्य संपादक महाराष्ट्राचे मुख्य संपादक रमेश चव्हाण यांनी नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या 22 मे २०२४ टे 24 मे २०२४ तीन दिवसीय मास्टर फेडरेशन कप नॅशनल चॅम्पियनशिप 2024 मध्ये लॉंग जंप 100 मीटर रनिंग पाच किलोमीटर रनिंग यामध्ये अनुक्रमे ब्रांझ ,सिल्वर ब्रांझ मेडल पटकावले. 45 वर्षे वयोगटाच्या या स्पर्धेत देशासह विदेशातील स्पर्धकांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. (45 Years Strong Player Ramesh Chavan)
हैदराबाद फेडरेशन कडून प्राप्त माहितीनुसार, 22 मे २०२४ रोजी सायंकाळी लॉंग जंप स्पर्धेमध्ये 45 वयोगटात कर्नाटक, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, श्रीलंका, आसाम येथील एकूण 18 स्पर्धकांनी सहभाग नोंदवा. या स्पर्धेत रमेश चव्हाण यांनी 4.10, 4.68, 4.83 अशाप्रकारे जाम करत ब्रांझ मेडल प्राप्त केले.
23 मे रोजी सकाळी सहा वाजता सुरू झालेल्या पाच किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये गच्ची बोली स्टेडियमवर एकूण 25 स्पर्धकांनी या वयोगटात सहभाग नोंदवला. श्रीलंकाचे धावपटू ने 15.08 मिनिटांत तर हरयाणा येथील खेळाडूनी 16.5 मिनिटांत तर रमेश चव्हाण यांनी 17.8 मिनिटात ही स्पर्धा पुर्ण करत ब्रांझ मेडल मिळवून आपली विजयी वाटचाल सुरू ठेवली. सायंकाळी 7 वाजता संपन्न झालेल्या शंभर मीटर स्प्रिंट स्पर्धेमध्ये 12.08 सेकंदात ही शर्यत संपवत सिल्वर मेडल प्राप्त केले.
100 मीटर रनिंग मध्ये अठरा युवकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये एक स्पर्धकाला तीन स्प्रिंट मारावी लागली. हैदराबाद येथील उन्हाळ्याच्या अति उष्ण वातावरणामध्ये खेळाडूंना प्रचंड त्रास सहन करावा लागला.अनेक खेळाडूंना उष्माघाताचा फटका बसला तर काही खेळाडू धावत असताना मैदानावरच कोसळले होते. बॉडी डीहायड्रेट झाल्यामुळे अपेक्षेप्रमाणे खेळाडूंना आपले कौशल्य सादर करता आले नाही. (45 Years Strong Player Ramesh Chavan)
फेडरेशन असोसिएशनच्या वतीने हैदराबाद येथे घेण्यात आलेल्या तीन स्पर्धेमध्ये दोन ब्रांझ, एक सिल्वर मेडल प्राप्त करत रमेश चव्हाण यांनी पत्रकार सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध करून दाखवले.45 वर्ष वयोगटात देशासह श्रीलंका, बांगलादेश येथील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सतरा राज्य तसेच आणि विदेशी स्पर्धकासह हैदराबादी येथील या स्पर्धेचा अनुभव अतिशय विलक्षण आणि प्रशासनीय होता असे रमेश चव्हाण यांनी सांगितले.
रमेश चव्हाण यांनी यापूर्वी दहा फुल मॅरेथॉन 14 हात मॅरेथॉन तसेच कोल्हापूर येथील हाफ आयर्न मॅन (बर्गमन) अशा अनेक स्पर्धेत भाग घेऊन त्या वेळेत पूर्ण केल्या आहेत. मागील चार वर्षापासून रमेश चव्हाण सतत मैदानी स्पर्धेची तयारी करीत आहे. धावपळीच्या जीवनात पत्रकारांनी सुद्धा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशा प्रकारचे आवाहन यावे रमेश चव्हाण यांनी केले आहे. (45 Years Strong Player Ramesh Chavan)
ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी खेळाडू रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता कसून सराव करण्यात येत असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे रमेश चव्हाण यांनी सांगितले. (45 Years Strong Player Ramesh Chavan)
ग्रामीण भागातील खेळाडूंनी परिस्थितीचे भांडवल न करता आपली शरीर ही संपत्ती हे लक्षात ठेवत कठीण परिश्रम करा तुम्हाला यश निश्चित मिळेल. स्पर्धेचा सराव करत असताना स्पर्धाही वेळेसोबत ठेवा. प्रॅक्टिस करत असताना डाइट्स, ग्राउंड, कोच या गोष्टीचे भांडवल करू नका मनात जिद्द, चिकाटी आणि प्रचंड सराव केला तर कोणत्याही स्पर्धेत यश मिळवणं कठीण नसते. कोणत्याही स्पर्धेत आपले प्रदर्शन करावे म्हणजेच यश अपयश याला महत्त्व राहत नाही तर आपण आपल्या प्रति सकारात्मक ऊर्जा घेऊन मैदानात उतरल्याचा आभास होतो, अशा भावना रमेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
युवकांनी खेळाकडे वळल्यास व्यसनाधीनता, नैराश्य कमी होते. त्यामुळे सोशल मीडिया मोबाईलवर व्यसनाधीन न होता मैदानी खेळ खेळावे, सुदृढ शरीर प्राप्त करत आपल्या देशासाठी ऑलम्पिक खेळण्याची तयारी सुद्धा युवकांनी ठेवावी. 45 वर्षे वयोगट असलेला म्हातारा जर अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपले नामांकन प्राप्त करू शकतो तर निश्चितच युवकांनी याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे. पुढील काळात यापेक्षा कठीण परिश्रम करणार असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करावयाचे स्वप्न उराशी ओळखले आहे. असे रमेश चव्हाण यांनी लोणार न्यूज शी बोलताना सांगितले.
खेळांचा इतिहास प्राचीन मानवी भूतकाळाचा आहे. सर्व संस्कृतींचा अविभाज्य भाग आहेत आणि मानवी सामाजिक परस्परसंवादाचे सर्वात जुने प्रकार आहेत. खेळ हे खेळाचे औपचारिक अभिव्यक्ती आहेत जे लोकांना तात्काळ कल्पनेच्या पलीकडे जाण्याची परवानगी देतात आणि थेट शारीरिक क्रियाकलाप करतात. खेळांच्या सामान्य वैशिष्ट्यांमध्ये निकालाची अनिश्चितता, नियमांवर सहमती, स्पर्धा, स्वतंत्र ठिकाण आणि वेळ, काल्पनिक घटक, संधीचे घटक, निर्धारित लक्ष्ये आणि वैयक्तिक आनंद यांचा समावेश होतो. ………..रमेश चव्हाण, संपादक, खोज मास्टर मिडिया समूह.