9 Years Fulfill , काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
भारताचा विकास घडविण्यासाठी कठोर परिश्रम करत राहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी
9 Years Fulfill , काय म्हणाले पंतप्रधान मोदी ? भारतीय जनता पक्षाची २०१४ मध्ये केंद्रात सत्ता आली. त्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला. अशाप्रकारे भाजपचे केंद्रात सरकार स्थापन करून नऊ वर्ष वर्ष पूर्ण झाली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले कि, विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू. सरकारची नऊ वर्ष पूर्ण झाली तसेच देश सेवेचेही नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सोशल मिडीयावर व्यक्त केलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आज आपण देशसेवेत नऊ वर्ष पूर्ण करत असतांना, मी नम्रतेने आणि कृतज्ञतेने ओतप्रोत आहे. निर्णायक पणे घेतलेले प्रत्येक पाऊल हे भारतीय लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने मार्गदर्शित होते. भारताचा विकास घडविण्यासाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू.
सरकारची 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले- ‘विकसित भारत घडवण्यासाठी आणखी मेहनत करत राहू’
सरकारचे देशाप्रती अतूट समर्पण ! देशाच्या विकासासाठी सरकारचे हे अतूट समर्पण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी वेबसाइटवर सरकारच्या विकास प्रवासाची झलक पाहण्यासाठी देशवासियांना आमंत्रित केले आहे. भाजपचे केंद्रात सरकार स्थापन करून 9 वर्ष वर्ष पूर्ण झाली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले कि, विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची स्थापना झाली. भारतीय जनता पक्षाची 2014 मध्ये केंद्रात सत्ता आली. तेव्हापासून भाजपा नऊ वर्ष सतत सत्तेत आहे. या उपलब्धीमुळे पुढील एक महिना पक्षातर्फे विशेष जनसंपर्क मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला जाणार आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, आज आपण देशसेवेत नऊ वर्ष पूर्ण करत असतांना, मी नम्रतेने आणि कृतज्ञतेने ओतप्रोत आहे. निर्णायक पणे घेतलेले प्रत्येक पाऊल हे भारतीय लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने मार्गदर्शित होते.”
भारत देशाने नऊ वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या नऊ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. 30 वर्षांनंतर जेव्हा जनतेने पूर्ण बहुमताने भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापन झाले. तेव्हाच हे शक्य झाले. भारत देशाचा वेगाने विकास झाला, अर्थव्यवस्था मजबूत झाली आणि सुशासन प्रस्थापित झाले. भारत देशातील 140 कोटी नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने कोणताही भेदभाव न करता नऊ वर्ष सतत काम केले आहे.
भारत देशातील बदल आणि विकासकामांबद्दल बोलायचे झाले तर आज भारत देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, हे विशेष आहे. कोविड काळात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारत देशात राबविण्यात आली होती. तसेच 12 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
नऊ कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत आणि गरिबांना आतापर्यंत साडेतीन कोटी पक्की घरे देण्यात आली आहेत. नऊ वर्षाच्या कालावधीत देशात रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क सुनिश्चित आणि मजबूत करण्याच्या दिशेने ऐतिहासिक कार्य देखील केले गेले आहे. म्हणजेच नऊ वर्षात देशात जे काही घडले त्याची कल्पनाही केली गेली नव्हती.
भाजपा सरकारने गेल्या 9 वर्षात देशात केलेल्या कामांबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आम्हाला पक्के घर मिळेल, कधी वाटले नव्हते की आम्हाला शौचालय मिळेल. गॅसच्या शेगडीवर जेवायला मिळेल आणि नळाला पाणी मिळेल असे वाटले नव्हते. बँक खाते उघडेल असे कधी वाटले नव्हते आणि 5 लाखांचे मोफत उपचार होतील असे कधी वाटले नव्हते. ज्यावर अख्या भारत देशाची नजर होती ते कलम 370 हटवेल असे कधीही वाटले नव्हते. विमानाने प्रवास करता असे कधी वाटले नव्हते. भव्य राम मंदिर बांधले जावे, अशी रामभक्तांची इच्छा होती, तेही पूर्ण झाले आहे.
भाजपाच्या सत्तेत देशात झालेली कामे...
- उज्ज्वला योजनेचा 9.58 कोटी लोकांना लाभ मिळाला
- 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य टक्के कर
- 2017-23 मध्ये MSME क्षेत्रातून 6.76 कोटी तरुणांना रोजगार मिळाला
- 220 कोटींहून अधिक कोविड-19 लस चे मोफत वितरण करण्यात आले.
- कलम 370 हटवल्यानंतर जम्मू – काश्मीर आणि लडाखचा चेहरामोहरा बदलला.
- 2014 पासून आज पर्यंत खूप राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले, राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये 54,000 किलोमीटर अधिक जोडले गेले.
- 2016 पासून 309 लाख कोटी रुपयांचा UPI व्यवहार झाला.
- राम मंदिर स्थापित.
- सौर क्षमता 64 GW पेक्षा जास्त.
- कल्याणकारी योजनेसाठी थेट लाभ हस्तांतरणाचा 23.36 लाख कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला.
- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4 कोटी घरे.
- 12 कोटी नळ कनेक्शन देण्यात आले.
- 11 कोटी शेतकरी आणि शेतकरी कुटुंबांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला आहे.