महाराष्ट्र

Aashadi Wari Astounding 54, श्रींचा पालखी सोहळा

श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान !

Aashadi Wari : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी २६ मे २०२३ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाली.

 

Aashadi Wari आषाढी वारीसाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे २६ मे २०२३ रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. “श्रीं” च्या दर्शनासाठी संतनगरी शेगाव येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर सह शेगाव शहर दणाणून गेले होते. जवळपास ७५० किलोमीटरचा प्रवास ३० ते ३१ दिवसांमध्ये वारकरी ‘गण गण गणात बोते’ नामाचा जप करत पूर्ण करणार आहेत. Aashadi Wari आषाढी एकादशीनंतर पुन्हा एकदा ही पालखी पंढरपुरातून शेगावकडे प्रस्थान करणार आहे.

Aashadi WariAashadi Wari लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी म्हणून ओळख पावलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी  Aashadi Wari आषाढी वारीसाठी २६ मे २०२३ रोजी संतनगरी शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार यंदाही ज्येष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाच्या निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले.

Aashadi Wari सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात “श्रीं” च्या रजत मुखवट्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेशात, शिस्तीत टाळ मृदंगाच्या निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान करण्यात आले. पाच जिल्हे आणि तब्बल ७५० किलोमीटरचा प्रवास करून एक महिन्यांची मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले.

टाळ मृदुंगांच्या जयघोषात, हजारो भाविकांच्या साक्षीनं शेगाव फुलून गेले होते. सातशे वारकऱ्यांसह संत गजानन महाराजांच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल ठेवलं. आता पुढचा एक महिना पंढरीच्या दिशेने पालखी प्रवास करेल.

Aashadi Wariकपाळी अबीर आणि चंदनाचा टिळा, हाती वैष्णव धर्माची पताका, टाळ आणि मृदुंग घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन, पांढरी टोपी आणि सदरे आणि मुखी विठ्ठलाचं नाम आणि ‘गण गण गणात बोते’ चा गजर असं एकंदरीत वातावरण एखादा उत्सवच पार पडत आहे, असंही चित्र भाविकांना पाहायला मिळालं.

शेगाव येथून प्रस्थान झालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आला आहे. पालखी मार्गावर होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. एखाद्या वेळेस गर्दीने खोळंबा झाल्यास पालखी बाबत योग्य निर्णय घेण्याचा अधिकार पालखी प्रमुखांना राहाणार आहे.

कसं असेल नियोजन ?

श्री संत गजानन महाराजांची पालखी २७ जून २०२३ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच २७ जून ते २ जुलै २०२३ पर्यंत मुक्काम राहणार आहे. ३ जुलै २०२३ रोजी परतीच्या मार्गावर “श्रीं” ची पालखी निघणार आहे. २३ जुलै २०२३ रोजी खामगाव येथे मुक्कामी राहिल्यानंतर २४ जुलै २०२३ रोजी सोमवारी ही पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे.

Aashadi Wari दरम्यान, ही दिंडी पाच जिल्ह्यांतून जाणार असून तब्बल ७५० किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे.

Aashadi WariAashadi Wari संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी, या उद्देशाने श्री संत गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे.

Aashadi Wari आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते.

दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण आहे. संस्थानचे पायी वारीकरीता श्री संत गजानन महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतलेली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात.

दरवर्षी महाराष्ट्रातून ४३ पालख्या पंढरपुरात Aashadi Wari आषाढी वारीसाठी दाखल होतात. या पालख्यांमध्ये माऊलींची पालखी, तुकोबारायांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी, गजानन महाराजांची पालखी या पालख्या आकर्षणाचं केंद्र ठरतात.

ज्ञानोबारायांची पालखी ११ जून रोजी ठेवणार प्रस्थान !

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत अनेक दिंड्यातून दाखल होतात. १२ जूनला “श्रीं” ची पालखी गांधी वाड्यात दाखल होणार आहे. त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल.

तुकोबारायांची पालखी १० जून रोजी ठेवणार प्रस्थान !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी यावर्षी देहूतून १० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून २८ जून रोजी संत तुकोबारायांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.

Aashadi Wari विदर्भाची पुरातन राजधानी म्हणून कौडण्यपूरची ओळख आहे. कौंडण्यपूर या  स्थानाला माता रुक्मिणीचं माहेर म्हणूनही ओळख प्राप्त झाली आहे. २६ मे २०२३ रोजी माता रुक्मिणीच्या पालखीने प्रस्थान ठेवले. यंदा या वारीचं ४२९ वे वर्ष आहे. गेली ४२८ वर्ष ही वारी अव्याहतपणे पंढरपूरला रवाना होत आली आहे.

Aashadi Wari अमरावतीचं कौंडण्यपूर आज एखाद्या उत्सवाप्रमाणे सजलेलं भाविकांना पाहायला मिळाले. २६ मे २०२३ च्या दुपारी ०३.०० वाजता माता रुक्मिणीची पालखी आपलं प्रस्थान केले. वाशिष्ठा नदीच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राहून संत सदाराम महाराजांनी १५९४ साली वारीला प्रारंभ केला होता. माता रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील पहिली पालखी मानली जाते. अमरावती जिल्ह्यातल्या बियाणी चौक इथं या पालखीचं भव्य स्वागत झाल. गेली कित्येक वर्ष ही परंपरा कायम आहे. अमरावती शहराची कुलदेवी अंबादेवी मंदिर आणि एकवीरा मंदिर इथं ही पालखी मुक्कमी असते. त्यानंतर २७ मे रोजी सकाळी राजापेठ बस स्थानकाजवळही या पालखीची पूजा केली जाते आणि मग ही पालखी पुढे पंढरपूर इथं रवाना होते. ही पालखी ४० दिवसांचा आणि जवळपास साडेसहाशे किलोमीटर चा प्रवास करून पंढरपूर इथं पोहोचते.

“श्रीं” च्या पालखीचा प्रवास

“श्रीं” च्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत ७५० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगांव पर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे.

“श्रीं” ची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना खालील तीर्थक्षेत्रावरून जाते

“श्री” क्षेत्र नागझरी – श्री क्षेत्र डव्हा – श्री क्षेत्र शिरपूर जैन – श्री क्षेत्र नरसी नामदेव – श्री क्षेत्र औंढा नागनाथ – श्री क्षेत्र त्रीधारा – श्री क्षेत्र गंगाखेड – श्री क्षेत्र परळी वैजनाथ – श्री क्षेत्र अंबाजोगाई – श्री क्षेत्र तेर – श्री क्षेत्र तुळजापूर – श्री क्षेत्र सोलापूर – श्री क्षेत्र माचनुर – श्री क्षेत्र मंगळवेढा – श्री क्षेत्र पंढरपूर.

“श्रीं” च्या पालखीचा परतीचा मार्ग

श्री क्षेत्र अरण मार्गे कुर्मदास – श्री क्षेत्र बार्शी (भगवान) – श्री क्षेत्र कुंथलगिरी – श्री क्षेत्र कपीलधारा- शहागड – जालना – न्हावा – सिंदखेड राजा – लोणार – मेहकर –खामगांव – शेगांव.

स्वागत

“श्रीं” चे पालखीचे स्वागताकरिता गावांतील भजनी मंडळी, बँड पथक, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह येतात. मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. तसेच पुष्प वर्षाव केल्या जातो.
“श्रीं” चे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच “श्रीं” च्या पालखीचे गावांतील नागरीकांकडून श्री संत गजानन महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.

प्रवासात असणाऱ्या सोई

“श्रीं” चे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा “श्रीं” च्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगल कार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरिता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परिने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात.

वाटेत भेटणाया वारकरी दिंड्यांची सेवा !

Aashadi Wari श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी इतरही भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाया दिंड्यातील पुरुष-महिला, मुले-मुली इत्यादी वारकऱ्याना संस्थानकडून कपडे वितरित करण्यात येतात. तसेच प्रत्येक दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात येतो. पंढरपुरच्या मार्गावर भेटणाया दिंडीतील वारकरी मंडळीना आवश्यकतेनुसार औषध-इंजेक्शन, सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याच प्रमाणे पिण्याच्या पाण्याकरिता टँकरची व्यवस्था केलेली असते.

Lonar News Youtube Channel

Shri Gajanan Maharaj Sansthan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button