तंत्रज्ञानाच्या जगात Google Chrome गुगल क्रोम आणि गुगल ब्राउझर या ॲपच्या सर्च बारमध्ये क्लिक करून विविध विषयांचे ज्ञान, माहिती, प्रकल्प अशी विविध बऱ्याच काही गोष्टींची माहिती सहज मिळवता येते.
पण, अनेकदा असे होते की, आपण Google Chrome गुगल क्रोमवर एकाच वेळी अनेक टॅब चालू करतो. त्यामुळे लॅपटॉप, संगणक हँग होण्याची आणि हे ॲप स्लो चालण्याची शक्यता जास्त असते. तर त्यासाठी गुगल क्रोमच्या सेटिंगमध्ये ‘Hardware Acceleration’ नावाचे फीचर आहे, ज्याच्या मदतीने आपण गुगल क्रोमचा वेग वाढवू शकता.
गुगल क्रोम सध्या उपलब्ध असलेल्या सर्वांत वेगवान आणि लोकप्रिय इंटरनेट ॲप्सपैकी एक आहे. तर ‘हार्डवेअर ॲक्सेलरेशन’ (Hardware Acceleration) नावाचे फीचर क्रोमला आणखी वेगवान बनवू शकते. वेबपेज आणि कन्टेन्ट रेंडर करण्यासाठी गुगल क्रोम मशीनच्या सीपीयू आणि सॉफ्टवेअरचा वापर करते. तसेच हार्डवेअर ॲक्सेलरेशन हे फीचर सक्षम केल्यास ब्राउझरचा परफॉर्मन्स आणि प्रतिसाद सुधारेल. अनेकदा बऱ्याच वेब पेजला भेट देत असल्यास किंवा ब्राउझरवर अनेक व्हिडीओ पाहत असाल, तर हे फीचर खूप उपयुक्त आहे.
गुगल क्रोममध्ये ‘Hardware Acceleration’ नावाचे फीचर enable कसे कराल ?
1. क्रोम लाँच करा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणार्या उभ्या थ्री-डॉट बटणावर क्लिक करा.
2. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा आणि डाव्या पॅनेलवर दिसणार्या ‘सिस्टीम’ टॅबवर जा.
3. पेजवर ‘Use hardware acceleration when available’ नावाचा पर्याय दिसेल; तो ऑन करा आणि क्रोम पुन्हा री-लाँच करा.
ब्राउझर पुन्हा लाँच केल्यानंतर त्याच पृष्ठावर जाऊन हार्डवेअर प्रवेग सक्षम केला आहे का, याची याची खात्री करू शकता. वापरकर्ते क्रोमच्या ॲड्रेस बारमध्ये ‘chrome://gpu’ टाइप करून एंटर दाबू शकतात. फीचर सक्षम असल्यास, ‘ग्राफिक फीचर स्टेटस’ सेक्शनमध्ये हिरव्या रंगाच्या मजकुरात ‘हार्डवेअर ॲक्सेलरेशन’ (hardware acceleration) दिसेल.
(टीप:हार्डवेअर ॲक्सेलरेशन ऑन केल्यानंतर जर क्वचित कोणाला विचित्र समस्या येत असल्याचे जाणवले किंवा ब्राउझर क्रॅश किंवा फ्रीझ होत असल्यास फीचर लगेच Disable करा . )
Google Chrome हे सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राउजर असून, याच्या मदतीने कोणतीही माहिती सहज सर्च करणे शक्य होते. आता गुगल क्रोममध्ये एक खास फीचर उपलब्ध झाले असून, याच्या मदतीने यूजरला शॉपिंग करण्यास मदत होणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर जाण्याआधीच प्रोडक्ट्सची किंमत कमी झाल्याचे माहिती मिळेल.
गुगल क्रोमने एक नवीन फीचर लाँच केले असून, याद्वारे यूजर्सला सहज शॉपिंग करता येईल. अनेकदा जे प्रोडक्ट्स खरेदी करायचे असतात त्यांची किंमत अधिक असते. किंमत कमी झाल्यानंतर मात्र खरेदी करण्याची संधी निघून जाते. आता गुगल क्रोमचे नवीन फीचर शॉपिंग वेबसाइट्सच्या आधीच या प्रोडक्ट्सची किंमती कमी झाल्याची माहिती देईल.
Google Chrome गुगल क्रोमचे नवीन फीचर ट्रॅक प्राइसेजद्वारे टॅब सेक्शनमध्ये प्रत्येक प्रोडक्ट्सच्या अपडेटेड किंमतीची माहिती मिळेल. आपण सर्च केलेले सर्व प्रोडक्ट्स येथे दिसतील. या फीचरमुळे फ्लिपकार्ट व अॅमेझॉन सारख्या वेबसाइट्स उघडण्याची गरज पडणार नाही.
सध्या गुगल क्रोमचे हे नवीन फीचर अमेरिकेतील अँड्राइड यूजर्सला मिळाले आहे. लवकरच iOS यूजर्ससाठी देखील हे फीचर रोलआउट केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुगल इतर देशांमध्ये हे फीचर कधी जारी करणार हे पाहावे लागेल. या फीचरच्या मदतीने यूजर्स ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सच्या अकाउंट्सचे पासवर्ड देखील सेव्ह करू शकतील. जेणेकरून, वारंवार लॉग इन करावे लागणार नाही.
Google Chrome Secret Features:
गुगल क्रोम हे एक असं ब्राऊजर आहे, जिथे अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला हवी ती, हवी तशी आणि हव्या त्या पद्धतीतील माहिती मिळते. संपूर्ण जगात या ब्राऊजरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रश्न कोणताही असो, त्याचं जवळपास किंवा अचूक उत्तर गुगलकडे मिळतंच मिळतं (Google search).
इतकी वर्षे (Google) गुगल वापरणाऱ्यांना जणू या ब्राऊजरचे असंख्य बारकावे माहित आहेत. पण त्याचे काही असेही फिचर्स आहेत, ज्याची फार कमी जणांना कल्पना आहे. असंच एक फिचर म्हणजे क्रोम रिडींग लिस्ट(Reading List).
विद्यार्थ्यांसाठी हे फिचर प्रचंड मदतीचं (Google Feature helpful for students)
गुगलच्या Reading List Feature मध्ये आपण लगेचच कोणताही लेख सेव्ह (Save) करु शकता. पुढे गरज पडल्यास आपण ते लेख हवं तेव्हा वाचूही शकता. परिणामी आपल्या आवडीचा लेख कधीच Miss होणार नाही.
Reading List Feature आणि Bookmarks Bar फिचर जवळपास सारखे आहेत. या फिचर्सचा फायदा आपल्याला करून घ्यायचा असेल, तर खालील मुद्दे नक्की वाचा.
- सर्वप्रथम डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम सुरु करा.
- यानंतर उजव्या कोपऱ्यात वरच्या दिशेला प्रोफाईल फोटोसोबत दिलेल्या Side Panel Button वर क्लिक करा.
- स्क्रीनवर एक पॅनल सुरु होईल, ज्यामध्ये 2 विभाग असतील. एक म्हणजे reading list आणि दुसरं म्हणजे Bookmarks .
- Reading List टॅबवर क्लिक करा जिथे सेव्ह केलेले लेख, माहिती वाचू शकता.
जगभरात Google Chrome गुगल क्रोम ब्राउझरचा यूजरबेस हा 63 टक्के इतका मोठा आहे. यावरुन लक्षात येते की जगभरात मोबाईल फोन आणि कंप्यूटर या दोन्हीसाठी हे ब्राउजर सर्रास वापरले जाते. अनेकांना कदाचीत माहिती नसेल पण क्रोम हे ब्राउझर फक्त ब्राउझिंगसाठीच वापरतात असे नाही. तर या ब्राउझरमद्ये इतरही अनेक उपयोगी फिचर्स देण्यात आले आहेत. जसे की हे ब्राउझर वापरत असताना यामध्ये याचा कॅलक्यूलेटर आणि पीडीएफ रीडर म्हणून देखील वापर करता येतो. इतकेच नाही तर यामध्ये डाटा सेव्हर मोड देखील देण्यात येतो.
डाटा सेवर मोड काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊ !
Google Chrome Browser मधील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे त्यात इंटरनेट डाटा सेव्ह करता येतो. बर्याचदा आपल्याला फोनचा इंटरनेट डाटा वाचवायचा असतो, जेणेकरुन दुसरीकडे इतर कामांसाठी वापरला जाऊ शकेल. अशा स्थितीत अँड्रॉइड फोनवर क्रोम ब्राउझर अॅप उघडा. यानंतर, उजवीकडील तीन डॉट्स वर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्ज वर जा आणि तेथील लाईट या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर, जर लाईट मोडचा पर्याय बंद असेल तर तो चालू करा. यामुळे इंटरनेट डाटा वाचेल इतकेच नाही तर आलेखाच्या मदतीने सेव्ह केलेला डाटाही किती आहे ते देखील पाहू शकता.
पीडीएफ रीडरची गरज नाही हे कसे शक्य आहे तर नक्की वाचा !
पीडीएफ फाइल किंवा ई-बुकला लॅपटॉप, संगणक किंवा फोनमध्ये वाचण्यासाठी त्यामध्ये पीडीएफ रीडर असणे आवश्यक आहे. पण क्रोम वापरत असाल तर त्यामध्येच पीडीएफ फाइल उघडू शकता. यासाठी पीडीएफ फाइल अॅड्रेस बारवर ड्रॅग करा आणि ती सोडा. यानंतर ब्राउझरमध्येच पीडीएफ फाईल उघडेल.
क्रोमच कॅल्क्यूलटरचे काम करेल !
Google Chrome ब्राउझरमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार या गणिती क्रिया करणे अत्यंत सोपं आहे. कॅल्क्युलेटर किंवा कन्व्हर्टर वापरण्यासाठी आपल्याला आपल्याला अंक थेट सर्चबारमध्ये टाइप करावे लागतील. उदाहरणार्थ आपल्याला 4 आणि 9 यांची बेरीज करायची असेल तर सर्च बारवर जा आणि 4 + 9 थेट टाइप करा त्यांनंतर तुम्हाला अंकाची बेरीज मिळून जाईल. जर तुम्हाला किलोमीटरचे मीटरमध्ये रूपांतरित करायचे असल्यास, 4 km to m टाइप करा, आपल्याला उत्तर मिळेल.
Google Chrome Browser मध्ये फाइल शोधा !
कंप्यूटरमध्ये सेव्ह केलेली कोणतीही फाइल शोधण्यासाठी आपल्याला माय कॉम्प्यूटरवर जावे लागेल. यानंतर, शोध घेऊन किंवा एकामागून एक ड्राइव्ह तपासावी लागेल. पण आपण फाईल फाइंडर म्हणून देखील Chrome ब्राउझर वापरू शकता. यासाठी अॅड्रेस बारमध्ये file:///C:/ टाईप करावे लागेल. आपण सी ड्राइव्हच्या जागी कोणतीही दुसरी विशेष ड्राइव्ह देखील ठेवू शकता. नंतर एंटर क्लिक करा, त्यानंतर ती ड्राइव्ह उघडेल.
सध्याच्या माहिती- तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर (Internet) अवलंबून राहू लागलो आहोत. विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते. इंटरनेटवर कुठलीही माहिती शोधण्यासाठी एखाद्या वेब ब्राउझरची (Web Browser) आवश्यकता भासते. बहुतेक इंटरनेट युजर माहिती शोधण्यासाठी ‘गुगल क्रोम’ (Google Chrome) या ब्राउझरचा वापर करतात.
गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की तेच सर्वोत्तम आहे, या वेब ब्राउझरमध्येही काही दोष आहेत. युजर्सच्या प्रायव्हसीला धोका – ‘आम्ही युजरच्या प्रायव्हसीची (User Privacy) काळजी घेण्यास कटिबद्ध आहोत,’ असा दावा गुगलनं अनेकदा केलेला आहे. मात्र, गुगल क्रोम वेब ब्राउझरची काम करण्याची पद्धत पाहून हे सिद्ध होतं की हा दावा काहीवेळा फोल झालेला आहे , याची करणेही अनेक आहेत . गुगल क्रोम युजरच्या प्रायव्हसीची काळजी घेत नाही. तसं पाहिलं तर गुगल क्रोममध्ये अनेक प्रायव्हसी फोकस्ड फीचर्स (Privacy focused features) आहेत. पण, सध्याच्या काळात ते पुरेसे नाहीत किंवा त्या संदर्भातील ज्ञान, माहिती युजर्स ला माहिती नाहीत .
गुगलला जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणात रिव्हेन्यू (Revenue) मिळतो. या जाहिरातदारांना देण्यासाठी गुगलकडे डेटा असणं आवश्यक आहे. यासाठी गुगल आपल्या वेब ब्राउझरचा वापर करतं. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, क्रोम आपला डेटा (Data) कलेक्ट करून गुगलला पुरवतं. जेव्हा आपण गुगल क्रोम वापरून एखाद्या वेबसाइटवर ॲक्टिव्हिटी (website activity) करता तेव्हा आपली ॲक्टिव्हिटी त्या वेबसाइटवर रेकॉर्ड होते. परिणामी आपला डेटा आरामात गुगलकडे स्टोअर होतो.
गुगल अनेक प्रकारे युजरला ट्रॅक करतं ही गोष्ट एव्हाना सर्वांना माहिती झालेली आहे. मात्र, यामध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण जरी गुगल सर्च वापरत नसाल किंवा गुगलची इतर कोणतीही सेवा वापरत नसाल, तरीही गुगल क्रोममुळे आपल्या डिव्हाइसचा आयपी गुगलला माहिती होतो. परिणामी, आपण VPN वापरत असलात तरीही आपली सर्च ॲक्टिव्हिटी आपोआप गुगलकडे स्टोअर होते.
Google Chrome गुगल क्रोम ब्राउझर आपल्या डिव्हाईसची रॅम (RAM) आणि बॅटरी (Battery) मोठ्या प्रमाणात वापरतो. जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की, गुगल क्रोममुळे कॉम्प्युटर किंवा मोबाईलची बरीचशी बॅटरी ड्रेन होते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये (Windows operating system) टास्क मॅनेजर ओपन करून आपण ही गोष्ट पाहू शकता. याशिवाय, गुगल क्रोम किती रॅम वापरत आहे, याचीसुद्धा कल्पना येईल. ही बाब स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर दोन्हीमध्ये सारख्या प्रमाणात घडते.
Google Chrome गुगल क्रोमला प्रतिस्पर्धी नसल्यानं युजरर्सची संख्या जास्त – गुगल क्रोमच्या (Google Chrome) प्रसिद्धी मागे ‘गुगल’ आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेटवर सर्वत्र गुगलची सत्ता आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्च इंजिन, ब्राउझरपासून ते मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमपर्यंत टेक मार्केटमध्ये गुगलचा सर्वांत मोठा वाटा आहे. या शर्यतीत इतर कंपन्या अजिबात प्रभावी नाहीत. याचा अर्थ असा नाही की, इतर कुठले ब्राउझर चांगले नाहीत. असे अनेक वेब ब्राउझर सापडतील ज्यामध्ये चांगले प्रायव्हसी फोकस्ड फीचर्स उपलब्ध आहेत.
मात्र, हे माहिती होण्यासाठी अशा ब्राउझर्सचा वापर होणं गरजेचं आहे. मात्र, Google गुगल आपल्या कॉम्पिटिशनमध्ये सहजासहजी कुणाला उतरू देत नाही. गुगल कंपनी तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरवर झालेली सर्व ॲक्टिव्हिटी तुमच्या गुगल अकाउंटशी (Google Account) लिंक करून टाकतो. अशा परिस्थितीत, गुगलला आपल्या लोकेशनसह प्रत्येक ॲक्टिव्हिटी ट्रॅक करता येते. आपला हाच डेटा वापरून कंपन्या आपल्याला जाहिराती दाखवतात. कधीकधी या जाहिराती पाहून आपल्याला गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करण्याची इच्छा होते.
आपली सर्च ॲक्टिव्हिटी ट्रॅक होणार नाही या अपेक्षेनं बरेच लोक Google Chrome गुगल क्रोममधील इनकॉग्निटो मोड (Incognito Mode) वापरतात. मात्र, इनकॉग्निटो मोडमधील सर्च ॲक्टिव्हिटी सुद्धा ट्रॅक होते. इनकॉग्निटो मोडवरील डेटा गुगलकडं स्टोअर होतो. इनकॉग्निटोचा एकमेव फायदा म्हणजे ब्राऊझरवर ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह होत नाही. पण, गुगलवर तर ही ब्राउझिंग हिस्ट्री आपोआप सेव्ह केली जाते. त्यामुळे इनकॉग्निटो मोड पूर्णपणे सुरक्षित आहे, हा गैरसमज आहे असं म्हटलं तरी चालेल.
गुगल क्रोमचे एक्स्टेंशन्ससुद्धा ठरू शकतात डोकेदुखी हे कसे याची माहिती घेऊ. गुगल क्रोम ब्राउझरचे एक्स्टेंशन्स नुकसान करू शकतात. ज्या प्रकारे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये गुगल प्ले स्टोअरवरून फोनमध्ये मालवेअर अटॅक होऊ शकतो तेच या ठिकाणीही शक्य आहे. गुगल क्रोमच्या एक्स्टेंशन्समध्ये (Google Chrome extensions) एखादा बग आढळून डेटाची चोरी झाल्याच्या बातम्या आपल्या कानावर पडतातच. गुगल क्रोम एक्स्टेंशन्समुळे फायदा होतोच पण नुकसानही होतं. इंटरनेटवर गुगलचा कंट्रोल – संपूर्ण इंटरनेटवर गुगलचं वर्चस्व असल्याची स्थिती आहे.
साधी एखादी वेबसाइट जरी तयार करायची असेल तर तुम्हाला Google गुगलच्या गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. असं केल्याशिवाय वेबसाइट गुगल सर्चमध्ये किंवा क्रोम वेब ब्राउझरवर दिसणारच नाही. वेबसाइट गाईडलाईन्स फॉलो करत नाही हे लक्षात आल्यास ती क्रोमवरून ब्लॉक केली जाते.
इतर ब्राउझर्सला संधी देण्याची गरज आहे का नाही हेही माहिती करून घेऊ. जर लोकांनी Google Chrome गुगल क्रोम व्यतिरिक्त दुसरे ब्राउझर वापरायला सुरुवात केली तर गुगलची ही मक्तेदारी चालणार नाही आणि इतर प्लेयर्सलाही संधी मिळेल. आपला डेटा कलेक्ट न करणारे काही ब्राउझर उपलब्ध आहेत. हे ब्राउझर्स सिक्युरिटी एस्कपर्ट्स आणि प्रायव्हसी ॲडव्होकेट्सकडून टेस्टेड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. या ब्राउझरच्याही स्वतःच्या काही मर्यादा आहेत. हे ब्राउझर्स आपली ॲक्टिव्हिटी ट्रॅक करत नाहीत. त्यामुळे, आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी वर आधारित जाहिराती दिसणार नाहीत. सर्च प्रेडिक्शनसुद्धा मिळणार नाहीत. पण, जर आपल्याला प्रायव्हसी जास्त प्रिय असेल तर या उणीवांकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं.
गुगल (Google) ही कंपनी सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एक मानली जाते. तर दोन वर्षांपासून गुगल या कंपनीत काम करणारी एक महिला कर्मचारी आहे. जिने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या तुम्हाला एखादे ध्येय गाठण्यासाठी अगदीच उपयोगी आहेत. गुगलची कर्मचारी कॅनडामध्ये राहते. गुगल कर्मचारी यांनी त्यांच्या अनुभवातून पाच सोपे मार्ग शेअर केले आहेत, जे वय वर्ष २० पर्यंत सगळ्यांना माहीत असणे महत्त्वाचे आहे आणि यापैकी एक करिअरचा सोपा मार्ग म्हणजे ऑफिसबाहेरची ओळख किंवा छंद. तर उत्तम भविष्यासाठी ‘पाच’ सोपे मार्ग कोणते चला पाहूयात.
1. निगोशिएशन करणे. हे एक कौशल्य आहे, जे शिकताही येते आणि सुधारताही येते. महिला कर्मचारीला असे वाटायचे की, एक तर हे कौशल्य आपल्याकडे असते किंवा नसते. पण, कर्मचारी यांना काम करताना समजले की, कोणीही प्रभावीपणे निगोशिएशन करण्यास शिकू शकतो. निगोशिएशन शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव.
2. दुसरी गोष्ट म्हणजे विशिष्ट ट्यूशन किंवा क्लास लावणे. ज्यांना करियर सुधारायचे आहे, त्यांच्यासाठी क्लास ही एक मौल्यवान गुंतवणूक आहे. महिला कर्मचारी हिला सुरुवातीला वाटायचे की, श्रीमंत लोकांसाठी किंवा क्लासेस घेणं या क्षेत्रात करियर करणाऱ्या लोकांसाठीच फक्त हे उपयोगी आहे, पण त्यांना आता या गोष्टीची जाणीव झाली की, क्लासेस करियरसाठी एक महत्वाचा टप्पा आहे. कारण एक चांगला प्रशिक्षक तुम्हाला तुमची उद्दिष्टे ओळखण्यात, ती साध्य करण्यासाठी, तसेच योजना आखण्यात आणि तुमच्या प्रत्येक आव्हानांना मात देण्यास मदत करू शकतो.
3. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक वागणे. स्वतःशी प्रामाणिकपणाने वागणे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी काम करत असाल, तेव्हा तुमच्याकडून चुका होणे, तुम्ही सगळ्याच गोष्टी करण्यात पारंगत नाही आहात ही गोष्ट स्वीकारणे. तसेच तुम्ही मिळवलेले यश कितीही लहान असले तरीही ते साजरे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एखादे ध्येय साध्य करता, तेव्हा तुमच्या मेहनतीची प्रशंसा करण्यासाठी वेळ काढा; असे कर्मचारी यांनी सांगितले.
4. चौथी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणे थांबवा. कारण प्रत्येकजण त्याच्या अनोख्या प्रवासावर आहे. त्यामुळे इतरांसोबत तुलना करणे योग्य नाही.
5. पाचवी गोष्ट म्हणजे कामाव्यतिरिक्त बाहेर ओळख, छंद किंवा कौशल्य असणे. हे तुम्हाला अधिक संतुलित जीवन जगण्यास मदत करेल आणि ते तुम्हाला अधिक मनोरंजक व्यक्तीसुद्धा बनवेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असाल आणि तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्ही म्युझिक प्रोडक्शन सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी छोटासा प्रयत्न करू शकता असे महिला कर्मचारी हिने सांगितले आहे.सोशल मीडिया ॲप LinkedIn वर गुगल कर्मचारी यांनी हे पाच सोपे मार्ग त्यांच्या पोस्टमध्ये लिहून शेअर केले आहेत.