राजकीय

Breaking 1 February 2024, शिवसेनेचे अभियान !

मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला जनतेचा प्रतिसाद!

Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 1 February 2024. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरु केलेल्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा विषयी थोडक्यात माहिती घेऊया.

मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला जनतेचा प्रतिसाद!

संघटना बांधणी आणि जनतेची संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा काढण्यात येत आहे. 30 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मस्थळापासून या यात्रेला  सुरुवात झाली. शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करत मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा सुरु केली. (Breaking 1 February 2024)

राजवाडा परिसरातच त्यांची पहिली जाहीर सभा झाली. त्यानंतर पुढील प्रवासासाठी सुषमा अंधारे जनतेच्या सोबत पायी मार्गस्थ झाल्या. ही यात्रा 35 दिवसाची असून अकरा लोकसभा मतदारसंघ आणि 35 विधानसभा मतदारसंघातुन जाणार आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे झाला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या ठिकठिकाणी जाहीर सभा घेऊन लोकांशी संवाद साधला. दरम्यान अनेक प्रश्नांवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ सांगतात, पण ‘जन की बात’ समजून घेत नाही. अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सुरू असलेली स्टंटबाजी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी असल्याचे त्या म्हणाल्या. (Breaking 1 February 2024)

1शिवसेना ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रेला  मंगळवारी 30 जानेवारी रोजी  दुपारी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून प्रारंभ झाला. जिजाऊंच्या जन्मस्थानी नतमस्तक झाल्यावर अंधारे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संवाद यात्रेची माहिती देतानाच विरोधकांवर टीकास्त्र सोडले. मातृतीर्थ यात्रा सिंदखेडराजा ते शिवतीर्थ दादर अशी मुक्त संवाद पदयात्रा 13 लोकसभा, 27 विधानसभा मतदारसंघ तर 18 जिल्ह्यांतून जाणार आहे. 35 दिवसांच्या या पदयात्रेत 70 लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, शेतकरी, मजूर, कामगार, महिला, विद्यार्थी ते बुद्धिजीवी अशा सर्व समाजघटकांसोबत आम्ही संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न समजून घेतल्या जातील.  राज्यकर्त्यांचा मनमानी कारभार,  ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर आणि घातक निर्णय यांची माहिती  जनतेला देऊन जनजागृती केली जाणार आहे. यात्रेद्वारे ‘जन की बात’ समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

यावेळी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, पंतप्रधान केवळ ‘मन की बात’ सांगतात ते ‘ जन की बात’ ऐकून वा समजून घेत नाहीत. जनतेच्या मनात काय आहे, हे समजून घेण्यात त्यांना स्वारस्यच नसल्याची मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मराठा आरक्षण, राज्य सरकारने जारी केलेली अधिसूचना यावर मंत्री नारायण राणे यांनी केलेली वक्तव्ये निरर्थक आहे. मुळात ही राज्यसभेच्या उमेदवारीसाठीची ‘स्टंटबाजी’ आहे. त्यांची राज्यसभेची मुदत संपत आल्याने, भाजपवर राजकीय दबाव आणण्याचे त्यांचे डावपेच असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, छगन मेहेत्रे, लखन गाडेकर आदी हजर होते. (Breaking 1 February 2024)

1मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद  यात्रा 1 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी लोणार शहरात पोहचली. यावेळी जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भागवत चित्र मंदिराजवळ सभा घेण्यात आली. या सभेत शिवसेना(ऊबाठा) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

कुणी जर सरकार च्या  विरोधात बोलल तर लगेच इडी ची पिडा लावायची.  ज्यांनी घबाड कमवले असेल  ते घाबरतील. आमची पाटी कोरी आहे. आमचे कडे महामानव डॉ.बाबासाहेब यांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तळपती तलवार आहे.  आम्ही जिजाऊ – सावित्री च्या लेकी आहोत. आमच्याकडे जपण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. त्याम्हणजे  एक इमान आणि  दुसरी अब्रू आहे. इडी, सिबिआय, इलेक्शन कमिशन च्या जोरावर आम्हाला घाबवरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही घाबरणारे नाहीत.

सरकार नी मोफत द्यायचे असेल तर शिक्षण मोफत द्यावे . कारण  खाजगी शाळेत लाखो रुपयांची फी भरावी लागते.  आपल्या सारख्या गोरगरीबाला हि फी भरणे  शक्य आहे का. जर सरकारी जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या तर गरिबांची लेकर शिक्षणापासून वंचित राहतील.  यामुळे द्यायचे असेल शिक्षण मोफत द्या.  लोणार शहरातील पाणी प्रश्न हि  उचलत  शिवसेना(ऊबाठा) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Breaking 1 February 2024)

अंधारे म्हणाल्या की, शिवसेना ठाकरे गटाचे जनता न्यायालय पार पडल्यानंतर नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया सुरू झाल्या आहेत. रविंद्र वायकर, किशोरी पेडणेकर व सुरज चव्हाण यांना ईडीने त्रास द्यायला सुरूवात केली आहे. तर वायकर व पेडणेकर यांनी शिंदे गटात जायचं ठरवलं असतं तर कारवाई बंद झाली असती. मात्र सध्या त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला.

1आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात 800 किलोमीटरची यात्रा काढण्यात आली आहे. 30 जानेवारी पासून सुरु झालेली हि मुक्त संवाद यात्रा 3 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.  म्हणजे 35 दिवस हे अभियान सुरू राहणार असून या अभियाना अंतर्गत 830 किलोमीटरचे  अंतर पार केले जाणार आहे. या अंतर्गत 13 लोकसभा तसेच 27 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले जातील. याला मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान असे नाव देण्यात आले आहे.

यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. लोणार तालुका प्रमुख दिपक मापारी,  शहर प्रमुख गजानन जाधव, उपतालुका प्रमुख परमेश्वर दहातोंडे, श्रीकांत नागरे, तालुका संघटक कैलास अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, तालुका सहसंघटक राजेश मोरे, सुभाष पुरी, वसंता ढाकणे, विभाग प्रमुख विजय मोरे, राजेश बुधवत, विठ्ठल दमधडे, भागवत पडघान, युवा तालुका अधिकारी जिवन घायाळ, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, किसान सेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, किसान शहर प्रमुख अजीम चौधरी, महिला आघाडी तालुका प्रमुख संजिवनी वाघ, मेहकर तालुका प्रमुख किशोर गारोळे, शहर प्रमुख निंबाजी पांडव,आकाश घोडे यांच्यासह शिवसेना, युवासेना, किसानसेना,पदाधिकारी व समस्त शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

1मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद माध्यमातून 70 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच यासंपूर्ण अभियानात नेते व पदाधिकारी हॉटेल वगैरे सुविधा न घेता टेंटमध्ये राहणार आहेत. जेवण स्वतः बनवून खाणार आहेत. मुंबईत या अभियानाच्या समारोप कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असेल. या अभियानात संजय राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आदि नेत्यांच्या सभाही ठिकठिकाणी घेण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Lonar News YouTube Channel

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया !

सुषमा अंधारे या मुळच्या लातूर जिल्ह्यातील मुरूडच्या. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. लातूर येथील ‘रुरल एज्यूकेशन फाऊंडेशन’च्या शाळेत त्यांचं बारावीपर्यंतच शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयातून एमएची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी बीएड केलं. पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झाल्यानंतर घरातल्यांनी त्यांना 51 रुपयांचं बक्षिस दिलं होतं. ही रक्कम घेऊन आपण लातूरला पुढील शिक्षणासाठी पळून गेलो असंही सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

तसंच उच्च शिक्षण घेत असताना राज्य पातळीवरील अनेक प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या असून त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमधून शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत झाली असंही त्या सांगतात. शिवसेनेत येण्यापूर्वी सुषमा अंधारे गणराज्य संघात काम करत होत्या. राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्या काम करत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button