Rice भात खाण्याचे फायदे आहेत तसे तोटे हि आहेत. भात कोण, कसा, कधी आणि केव्हा खातो त्यावर अवलंबून आहे. त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयन्त करू.
Rice तांदूळ हा जगभरातील अनेक देशांमध्ये आहाराचा एक प्रमुख भाग आहे. मुख्यतः आशियाई घरांमध्ये तर लोक जेवणात किमान एकदा भाताचा समावेश आवर्जून करतात. भात शरीराला आवश्यक कार्ब्स पुरवण्याचे काम करतो हे जरी खरे असले तरी निरोगी राहण्यासाठी पूर्णपणे भातावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. भातात, स्टार्चचे प्रमाण देखील जास्त असते, त्यामुळे अन्य काही पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. त्याचप्रमाणे पांढर्या तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि वजन वाढण्याचा सुद्धा धोका असतो.
भात Rice हा अन्नातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. अनेकांना तर भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. भाताचे अनेक प्रकारही आहेत. जसे की, राजमा-भात, छोले-भात, डाळ-भात, मासे-भात यांसारखे घरगुती अन्न आपल्या शरीराची नाही तर आपल्या आत्म्याची भूक भागवतात. मात्र, याच भाताच अतिरेक केला तर शरीराला नुकसान पोहोचू शकते. हे आपल्याला माहीत आहे का? नसेल तर ही माहिती नक्की वाचा. भात खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत हे लक्षात घ्या.
बरेच लोक ज्यांना वजन कमी करायचे आहे ते रात्री फक्त प्रोटीन आहार घेतात. ते रात्री मसूरसह भात खाऊ शकतात. डाळींचे प्रमाण जास्त आणि तांदळाचे प्रमाण कमी ठेवा. मसूर आणि तांदूळ हे परिपूर्ण अन्न मानले जाते कारण ते प्रथिने आणि कर्बोदकांमधे एक चवदार संयोजन आहे. रात्री भाकरी, चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण मल्टीग्रेन किंवा कोंडा पीठ भाकरी व चपातीमध्ये फायबर असते. फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. जर तुमचे वजन कमी होत असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणात भाकरी देखील खाऊ शकता. हे आपल्याला प्रथिने आणि कार्बोहायड्रेट दोन्ही देईल.
रात्री भात Rice खाण्यासही मनाई केली जाते कारण ते सहज पचते. त्यामुळे रात्री जाग येते तेव्हा तुम्हाला जास्त भूक लागेल. त्याच वेळी, काही आहारतज्ञांचा असं म्हणण आहे की, तांदळामध्ये इनोसिटॉल आढळते. इनोसिटॉल चरबी बर्न करते आणि अस्वस्थता देखील कमी करते. म्हणून, मसूर आणि भात रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम मानले जातात.
हे सर्व मुद्दे एक गोष्ट सिद्ध करतात की रात्री भात खाल्ल्याने वजन वाढत नाही. जर वजन कमी करत असाल, तर तुम्ही अधिक डाळींसह थोडा भात किंवा खिचडी खाऊ शकता. दुसरीकडे, जर अधूनमधून उपवास करत असाल किंवा फायबर घेऊ इच्छित असाल तर रात्रीच्या जेवणासाठी भाकरी, चपाती हा सर्वोत्तम पर्याय आहे.
जवळपास प्रत्येकाच्या ताटात डाळ, भात, चपाती आणि भाजी हे कायमच असतं. अनेकजन फक्त चपातीच खाणं पसंत करतात. तर काही ठिकाणी फक्त आणि फक्त तांदूळ Rice आवडीने खाल्ला जातो. तांदळाचा विचार केला तर अनेक घरात फक्त सफेद तांदूळ खाल्ला जातो. म्हणजे वेट लॉस आणि डाएटच्या नावाखाली ब्राऊन राइसचा समावेश ताटाक झाला आहे. पण आजही लोकांची आवड ही शुभ्र सफेद तांदूळ आहे.
सफेद तांदळातील स्टार्चमुळे हा भात Rice न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे भात खाण्याचे काही जबरदस्त फायदे आहेत. तर जाणून घेऊया सफेद तांदळामुळे शरीराला कोणते महत्वाचे पोषणतत्व मिळतात .
शरीराला काम करण्यासाठी एनर्जीची गरज असते. सफेद तांदळात कार्ब्स मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी कार्ब्सची गरज असते आणि हे तांदळातून मिळते. पण याचा परिणाम शरीरावर थोडा उशीरा होतो.
कधीही पोट खराब होते तेव्हा हलका आहार घेतला जातो. यामध्ये सर्वात अगोदर भाताचा समावेश असतो. तांदूळ खिचडी, पेज या स्वरुपात घेतले जाते. कारण तांदळासारखा हलका पदार्थ नाही. तसेच अनेकदा प्रवासातून घरी आल्यावर खिचडी खाल्ली जाते, कारण ती पचणे सोप्पी असते.
सफेद तांदळात स्टार्चचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मात्र तांदूळ इतर अनेक पौष्टिक गुणांनी समृद्ध असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. सफेद तांदळात Rice मॅग्नीज, लोह आणि व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते.
तांदूळ खाण्यास जरी मनाई असेल तरी यामध्ये अनेक गुण खच्चून भरलेली आहे. सफेद तांदळात आढळणारा मॅग्नेशियम हाडे, नसा आणि स्नायूंना योग्य प्रकारे काम करण्यास मदत करते. या तीनमध्ये काही अडचण आली तर तांदळामुळे ती झिज भरून निघते.
अनेकदा भात Rice कुकरमध्ये शिजवला जातो. पण या पद्धतीने कधीच सफेद तांदूळ खाऊ नये. यामुळे तांदळातील स्टार्च निघून जात नाही. त्यामुळे तांदूळ कायमच टोपात शिजवावा. टोपात शिजवल्यामुळे तांदळातील स्टार्च वाफेद्वारे निघून जातो. त्यानंतर तो भात खाण्यासाठी शरीराला फायदेशीर असतो. तज्ञांचे मते अशा प्रकारे भात शिजवून काही रुग्ण देखील खाऊ शकतात.
वजन कमी करण्यासाठी सफेद तांदूळच आतापर्यंत बेस्ट असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असते. ज्यामुळे वेट लॉस करण्यास मदत होते. बेली फॅट कमी करण्यासाठी भात उपयोगी ठरतो.
भातामुळे खाल्याने काही समस्या निर्माण होतात. त्या कशा आणि कोणत्या आहेत. याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊ.
भाताबरोबरच त्यापासून बनविलेले पदार्थही खूप चांगले लागतात. देशातील विविध राज्यांमध्ये भातापासून विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. ते पदार्थ खाण्यात काही नुकसान नाही. पण हे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. पोट भरण्यासाठी खाल्ले तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
भारतात तांदूळ, गहू मोठया प्रमाणात खाल्ले जातात. अनेक राज्यात भात हा आहारात कायम असतो तर काही राज्यातील नागरिकांच्या जेवनात एक वेळा तरी भात असतो. तर काही ठिकाणी अनेकजण दिवसभरातून फक्त एकदाच भात खातात. भात खाण्याचे फायदे तोटे काय आहेत याची माहिती घेऊ.
भातात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटामीन आणि खनिज अशी पोषक तत्व भरपूर असतात जी शरीरासाठीही फायदेशीर ठरतात. पण बाकीच्या प्रोटीन्स, व्हिटामीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश न करता फक्त भात Rice खाल्ला तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
भात खाल्ल्याने शरीराल ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. भात खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार दूर होण्यास मदत होते. तांदूळ शरीराला उर्जा देतो आणि पोटभर जेवल्याचा फिलही येतो. तांदूळ एलर्जीचे कारणही ठरू शकतो.
जर शिळा भात किंवा 3 ते 4 दिवसांचा उरलेला भात खात असाल तर ही सवय महागात पडू शकते. शिळा भात खाण्याची सवय गंभीर आजारी बनवू शकते.
शिळा भात खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत. तज्ञांचे मते वारंवार शिळा भात खाणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण शिळा भात खाल्ल्याने पोट आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. शिळा भाताच्या सेवनाने बॅक्टेरियाज वाढतात. ज्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. डायरिया, जुलाब, उलटी यांसारख्या समस्या उद्भवतात. शिळा भात हृदयाच्या आजारांचे कारण ठरू शकतो.
उरलेला शिळा भात Rice खाल्ल्याने शरीराला अनेक दुष्परिणांना सामोरे जावे लागू शकते. तज्ञांच्या रिपोर्टनुसार शिळा भात आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते. कच्च्या तांदळात स्पोर्स असतात. जे शिजवतानाही शिल्लक असतात. जेव्हा भात बराचवेळ रूम टेम्परेचरवर ठेवला जातो , तेव्हा स्पोर्स बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतो. म्हणून असा भात खाल्ल्याने बॅक्टेरिया शरीरात पोहोचल्याने तुम्हाला गंभीर विकार होऊ शकतात.
बराचवेळ भात रुम टेम्परेचरवर असले तर असा भात कंटॅमिनेटेड होऊ शकतो. पोटाच्या विकाराव्यतिरिक्त कार्डिओवॅस्कल डिसिज होऊ शकतात. अनेक तज्ज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार, ज्या ठिकाणी भाताची शेती केली जाते. त्या मातीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
आर्सेनिक दुसऱ्या टॉक्सिन्सबरोबर शरीरात गेल्याने कार्डिओवॅस्क्युलर आजार वाढण्याचा धोका असतो. म्हणून शिळा भात Rice खाऊ नये. आपण शिळा भात गरम करून खाल्ला तर तब्येतीचं नुकसान होऊ शकतं, हे बऱ्याच लोकांना समजत नाही. त्यातून टॉक्सिन्स प्रोड्यूस होतात जे हिट रेसिस्टंट असतात. म्हणजेच शिळे तांदूळ गरम केल्यानं त्यातील बॅक्टेरिया कमी करणं कठीण होतं.
आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतांना भात Rice न खाण्याचा सल्ला अनेकजण देत असल्याचा आपल्याला अनुभव येतो. याच कारणामुळे भात कितीही आवडत असेल तरीही लोक भात खाणं टाळतात. भारतात दक्षिणेला सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो. साऊथ इंडियाचे फेमस पदार्थ जसं की इडली, डोसा, अप्पम, खीर, अप्पे या सगळ्यात पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य घटक आहे. तिथल्या जास्तीत जास्त पदार्थांत तांदूळ असतो. पण इतका भात खाऊनही त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. एक्सपर्ट्सच्या मते भात खाताना पोर्शन कंट्रोल म्हणजेच तुम्ही किती भात खाताय हे सुद्धा महत्वाचे असते.
डॉ. भास्कर मापारी यांनी लोणार न्यूज शी बोलताना भात खाण्याबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करत भात कसा खावा, कसा शिजवावा याबाबत सांगितले आहे. डॉ. भास्कर मापारी सांगतात, ”रोजच्या स्वंयपाकात भात शिजवताना काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसं की वापरत असलेला तांदूळ हा जुना असावा. किमान वर्षभर जुना असलेला तांदूळच वापरावा. जर तांदूळ जुना नसेल तर तांदूळ Rice शिजवण्या आधी कोरडे तांदूळ परतून घ्या. यामुळे तांदळातील एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होईल. भात शिजवताना कुकर ऐवजी ओपन वेसल्सचा वापर करा ज्यामुळे भात जास्त पौष्टीक होईल.”
पांढरा तांदूळ : 100 ग्रॅम तांदळात 123 कॅलरीज आणि 0.4 ग्रॅम फॅट असते. तर 2.9 ग्रॅम प्रथिने आणि 30 ग्रॅम कर्बोदके असतात. जर दिवसाच्या तिन्ही जेवणात जास्त वेळ भात खाल्लात तर त्याचा वाईट परिणाम शरीरावर दिसू लागतो.
जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीराला होणारे नुकसान
पोट फुगण्याची समस्या
जे लोक जास्त वेळ भात Rice खातात त्यांना काही वेळाने पोटात जळजळ, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या सुरू होतात. हे तांदळात आढळणाऱ्या स्टार्चमुळे होते. त्यामुळे कमी प्रमाणात भात खा.
वजन वाढण्याची समस्या
जास्त भात Rice खाल्ल्याने वजन लवकर वाढू शकते. अनेकजण भात खाल्ल्याबरोबर लगेच झोपतात. त्यामुळे ही समस्या आणखी वाढू लागते. याऊलट, जे लोक संतुलित प्रमाणात भात खातात आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय देखील असतात, त्यांच्या शरीरावर त्याचा असा प्रभाव क्वचितच होतो.
वरण–भात, तूप,लिंबू बेस्ट कॉम्बिनेशन
डॉ. मापारी यांच्या मते महाराष्ट्रीयन जेवणाची पद्धत वरण भात तूप-लिंबू हे बेस्ट कॉम्बिनेशन आहारात असेल तर कोणताही त्रास उद्भवणार नाही. कारण यातील घटक-तूपातील फॅटी एसिड, लिंबातील एसिटीक एसिड यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि भाताचे पोषण मूल्य अधिक वाढते.
भात आणि पोट सुटण्याचा काही संबंध आहे का ?
भारतात 90 टक्के लोकांचे स्टेपल डाएट हे भात आहे. पूर्वीपासून भात खाणाऱ्या सगळ्या लोकांची पोटं सुटलेली होती असं नाही. पूर्वी अंग मेहनत खूप व्हायची, आता ती होताना दिसत नाही म्हणून पोट सुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही व्यायाम करणार नाही आणि फक्त भात बंद कराल, यामुळे पोटं सपाटीला जातील असं अजिबात होणार नाही. भात योग्य पद्धतीने शिजवल्यास भात खाण्याचा कोणताही त्रास होणार नाही आणि पोटही सुटणार नाही. यासाठी नियमित व्यायामाची सवय ठेवा.
टीप : वरील सर्व बाबी लोणार न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोणार न्यूज कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.