Breaking 1 New Crop Loan गरीब शेतकरी अडचणीत !
डॉ.भास्कर मापारी : शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा !
New Crop Loan : नवीन पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी बी-बियाणे व खते घेण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत.
New Crop Loan शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा !
New Crop Loan डॉ.भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !
लोणार : सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे.
सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदीसाठी पैशांची आवश्यकता आहे तर काही शेतकरी आपल्याकडील पीक कर्जाचा भरणा करून लगेच नवीन पीक कर्ज उचलत असतात तसेच काही नवीन शेतकरी सुद्धा शेती उपयोगासाठी पीक कर्ज घेण्यासाठी खरीप हंगामाच्या तोंडावर प्रयत्न करताना दिसत असतात. परंतु आपल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेमार्फत मात्र नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात अध्याप कुठलेही पाऊल उचलले गेलेले नाही.
आपल्या देशाच्या वेशी जवळ आलेला असताना सुद्धा अद्यापही केंद्रीय सहकारी बँकेकडून नवीन पीक कर्ज वाटपाविषयी उदासीनता दिसून येत आहे. यामुळे जिल्हासह लोणार तालुक्यातील ग्रामसेवा सोसायट्याना सुद्धा सभासद शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात खाजगी कर्ज काढून जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्ज भरणा केला. त्यांना सुद्धा बँकेकडून पुन्हा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
एकंदरीतच जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यासह शेतकऱ्यांचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे. नवीन पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी बी-बियाणे व खते घेण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेले आहेत.
गणेश विविध कार्यकारी सहकारी संस्था चे संचालक डॉ.भास्कर मापारी यांनी हा गंभीर प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मांडला आहे तसेच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या प्रशासकांना त्वरित शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याविषयी आदेशित करावे अशी आग्रही मागणीही डॉ.भास्कर मापारी यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. New Crop Loan
New Crop Loan पिक कर्ज म्हणजे ?
सध्या काही शेतकऱ्यांकडून पिक कर्जाची मागणी होत आहे. शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, याविषयी माहिती घेऊया. ऋतूमान मध्ये बदल होत असले तरी जवळपास जून महिन्यापासून पावसाला सुरूवात होते. शेतीच्या अर्थकारणात सर्वात महत्वाचा हा महिना असतो. यापूर्वीच बियाणे, खते, मजुरी, जमिनीची मशागत यासाठी शेतकऱ्याच्या हातात पैसे असणे महत्वाचे असते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेतकरी नवीन वर्षाच्या अर्थव्यवस्थेसाठी जणू बीज रोवत असतो. अशावेळी शेतकऱ्याला राष्ट्रीयकृत बँका तसेच सहकारी सोसायट्यांकडून पिककर्ज वाटप केला जातो . सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँका पत पुरवठा करतात. हे पिककर्ज कसं असतं हे समजून घेऊ. New Crop Loan
शेतकऱ्यांसाठी पिककर्ज हे सर्वात कमी दिवसात परतफेड करण्यासाठी दिलेलं कर्ज असतं. किमान 12 महिन्यांच्या आत पिककर्जाची परतफेड करावी लागते. शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी ही परतफेड केली, तरच सरकारकडून व्याजात दिली जाणारी सूट लागू होते. वेळेवर कर्ज भरल्यानंतर सरकारने दिलेली व्याजातली सूट लगेच मिळत नाही. मिळालेली सूट ही काही दिवसांनी कर्जदाराच्या बँक खात्याला जमा होते.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिलेलं पिककर्ज वेळेवर न भरल्यास पिककर्ज दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त होवू शकतं. मात्र गावातील विकास सोसायटीमार्फत एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं आणि थकवलं आणि थकल्यानंतर व्याज हे रकमेएवढं झालं तर हा आकडा तिथल्या तिथे थांबतो. विकास सोसायटीतून घेतलेलं कर्ज थकलं तर ते घेतलेल्या रकमेच्या दुप्पटी एवढंच वसूल करता येतं. एका शेतकऱ्यांला एकाच वेळेस विकास सोसायटी किंवा राष्ट्रीयीकृत बँक या दोन्ही ठिकाणी कर्ज घेता येत नाही, ते फक्त एकाच ठिकाणी दिलं जातं.
1 हेक्टर जमीन असेल आणि 3 लाख रूपये पिककर्ज घ्यायचं असेल तर असं शक्य होत नाही. कर्ज हेक्टरावर ठरवलं जातं. त्यातही त्या जमिनीवर काय पेरलं आहे यावर ते अवलंबून असतं. कापूस असेल तर हेक्टरी 30 ते 35 हजार रूपये पिककर्ज दिलं जातं. फळबागांवरचा खर्च हा तुलनेने दुप्पट असल्याने फळबागांना हेक्टरावर 60 ते 80 हजारांपर्यंत पिककर्ज दिलं जातं. त्यातही ते कर्ज 3 लाखांच्या वर घेतल्यावर व्याजदरात कोणतीही सूट दिली जात नाही. ठिबक सिंचन, पाईपलाईन, विहिर खोदणे अशा कामांसाठी घेतलेलं कर्ज हे पिककर्ज म्हणून गणले जात नाही. या कर्जाचा व्याजदर प्रचलित नियमानुसार असतो, होमलोन एवढा, येथे कर्जाच्या व्याजदरात शेतकऱ्यांना सूट नसते. हे दीर्घ मुदतीचं कृषी कर्ज असतं.
वरील माहितीत काही प्रमाणात तफावत असू शकते. ढोबळमानाने देण्यात आलेली ही माहिती आहे.
पीक कर्ज कसे घ्यावे !
संबंधित शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पीककर्ज मिळवताना आपल्या गावातील दत्तक बँक किंवा तालुक्याला असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अर्ज भरावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्र संबंधित बँकेमध्ये जमा करावी लागतील. New Crop Loan