Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
Breaking 11 जानेवारी : आमदार अपात्रता आणि सत्तासंघर्षाचा निकाल अखेर जाहीर !
Lonar News.com च्या माध्यमातून विशेष बातम्या . त्यानुषंगाने Breaking 11 जानेवारी 2024 महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी वर थोडक्यात नजर टाकूया.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंनी सांगितला पुढचा मार्ग; विधानसभा अध्यक्षांवर संताप, शिंदेंवरही निशाणा
आमदार अपात्रता आणि सत्तासंघर्षाचा निकाल अखेर जाहीर झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अगोदर खरी शिवसेना कोणाची हे मी सांगेन, कोणाचा पक्ष खरा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून मला असल्याचंही म्हटलं. दरम्यान, शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर, आमदार अपात्रतेसंदर्भातही त्यांनी निर्णय दिला. त्यानुसार, सर्वच आमदारांना पात्र ठरवण्यात आलं आहे. मात्र, ठाकरे गटाचा व्हीप अमान्य केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या निकालावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांवर संताप व्यक्त केला, तर मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आम्हाला घटना प्राप्त न झाल्याने आम्ही ती घटना निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचे नार्वेकर यांनी म्हटले. त्यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभेतील अधिकाऱ्यांचे आभार मानले. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास निकाल वाचनाला सुरुवात झाली. संपूर्ण राज्याच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. निकालाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात होते. हा निकाल मॅच फिक्सिंग असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर, उद्धव ठाकरेंनीही कालच्या विधानाचा संदर्भ देत आरोपीने अगोदरच विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची आठवण करुन दिली. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
अध्यक्ष निकालापूर्वीच आरोपीला भेटले होते. त्यामुळे निकालाबाबत मी कालच भाष्य केलं होतं, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नार्वेकरांनी नीचपणाचा कळस गाठला आहे. आमची घटना अवैध, मग आमचे आमदार पात्र कसे, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करून आपण शिवसेना संपवू, असं त्यांना वाटत होतं. पण शिवसेना काही संपणार नाही. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवणारे नार्वेकर कोण ?. नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे. नार्वेकर कोर्टालाही जुमानत नाहीत, हे या निकालावरुन सिद्ध झालं आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध अवमानयाचिका दाखल करता येते का, ते आम्ही पाहणार आहोत. तसेच, हा निकाल अंतिम नसून आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा
आजही त्यांच्यात हिंमत नाही, ते स्वतःच्या ताकदीवर मतं मागू शकत नाहीत. म्हणून त्यांना माझा पक्ष आणि वडिलांचा चेहरा लागतो. मिंध्यांची, गद्दारांची शिवसेना…. महाराष्ट्रातली आणि देशातली जनता मानणार नाही. मिंध्यांना वाटत असेल त्यांनी घराणेशाही मोडीत काढली, तर त्यांनी लक्षात ठेवावं त्यांची गुलामगिरी सुरु झाली आहे, असे म्हणत शिंदेंच्या प्रतिक्रियेवरही उद्धव ठाकरेंनी पलटवारही केला. दरम्यान, एकनाथ शिदेंनी निकालावर प्रतिक्रिया देताना आम्ही घराणेशाही मोडीत काढली, असे म्हटले होते.
शरद पवारांचाही विधानसभा अध्यक्षांवर निशाणा !
सत्ताधाऱ्यांनी निकालाबाबत आधीच भाष्य केलं होतं, त्यानुसारच हा निर्णय आला आहे. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल, असे शरद पवार यांनी म्हटलं. व्हीप बजावण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं. तर, व्हीप देण्याबाबात पक्ष संघटना महत्त्वाची, असं कोर्टाने म्हटले होतं. त्यामुळे, येथे सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वे डावलण्यात आली आहेत. आता, ठाकरेंना कोर्टात जावं लागेल, असेही शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र, हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यातच विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
काय म्हणाले अध्यक्ष !
शिंदेचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी त्यांनी पक्षप्रमुख म्हणून सर्वस्वी अधिकार कोणालाही देता येणार नाही, असेही म्हटले. अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. आता, आमदार अपात्रतेसंदर्भातही लवकरच निर्णय जाहीर होईल. दरम्यान, निकालाची प्रत सर्वांना दिली जाणार असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
‘राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला’, निकालानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
राज्याच्या राजकारणासाठी 10 जानेवारी 2024 हा दिवस खूप महत्वाचा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. तसेच, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी सांगितले. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा…..
निवडणूक आयोगाचा चुकीचा निकाल, ज्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तो निर्णय यांनी ग्राह्य धरला. म्हणजे निर्णय देताना पायच चुकला. राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला. त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का ते आम्ही बघणार आहोत. राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
ते पुढे म्हणतात, ‘ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांना बसवलं, त्यातून त्यांची मिलिभगत किंवा संगनमत झाल्याचे स्पष्ट होते. त्यांनी जावून आरोपीची दोनवेळा भेट घेतली. मात्र निकालामुळे एक गोष्ट आणखी प्रश्नांकीत झाली आहे की, लोकशाहीची त्यांनी हत्या केली आहेच, पण पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसे करावे अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे निकालातून दाखवून दिले आहे.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
सुप्रीम कोर्टाचे नियम धाब्यावर बसवले !
स्वत: विधानसभा अध्यक्षांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा दूर करुन घेतला असेल. आजपर्यंत आपण मानत आलो की, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च असतात. पण नार्वेकरांनी जो काही निकाल दिला, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते स्पष्टपणे धाब्यावर बसवले, पायदडी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयातही जुमानत नाहीत, हे त्यांच्या निकालातून स्पष्ट दिसून आले. असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
आम्ही पुन्हा कोर्टात जाणार !
ठाकरे पुढे म्हणतात, “महत्त्वाचे म्हणजे, मूळ प्रकरण हे अपात्रतेचं होते, पण त्यांनी कुणालाच अपात्र केले नाही. आमची घटना दुरुस्ती तुम्ही ग्राह्य धरत नसाल तर मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं ? त्याही पलिकडे जावून त्यांनी निकाल दिला की शिवसेना कुणाची ? शिवसेना कुणाची याचे उत्तर महाराष्ट्रातील लहान मुलेही देतील. शिवसेना शिंदेंची होऊच शकत नाही. शिवसेना कोणाची हे ठरवणारे नार्वेकर कोण ? नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झालाय. आम्ही पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
“हा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे”, संजय राऊतांची जोरदार टीका !
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. तसेच, दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले. निकालादरम्यान, राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 1999 सालच्या घटनेचा आधार दिला. तर, सुनिल प्रभूंचा व्हीप अवैध असल्याचे सांगून भरत गोगावलेंचा व्हीप राहुल नार्वेकरांनी मान्य केला आहे. दरम्यान, या निकालावरून ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.(Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
दिल्लीतून जे आदेश मिळाले ते आदेश येथे दिले आहेत. संविधान, कायदा, सत्य काय आहे यावर हे आदेश नाहीत. जमिनीवरचे सत्य या आदेशात नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना 60 वर्षांआधी स्थापना झाली होती. शिवसेनेचे आजचे मालक एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या स्थापनेवेळी किती वय किती होते ? त्यांचा तेव्हा जन्म तरी झाला होता का ? बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना इतिहासजमा झाली. भाजपाचे जुनं स्वप्न होते की बाळसाहेबांची शिवसेना एकदिवस संपवणार. पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. बाळासाहेबांची शिवसेना अशा निर्णयांमुळे, अशा कागदपत्रांमुळे संपणार नाही. तर, शिवसेना जनतेत आहे. महाराष्ट्रातील रक्ता-रक्तात आहे, असे संजय राऊत म्हणाले.(Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
याचबरोबर, हा निर्णय कोणताही न्याय नाही. हे एक षडयंत्र आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालायत नक्की जाणार. न्यायालयात आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. राहुल नार्वेकरांना इतिहास लिहायची संधी दिली होती. त्यांनी ती संधी गमावली आहे. या व्यक्तीनेही महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. संविधानपीठात बसून त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला. इतिहास त्यांना लक्षात ठेवेल. जे फटाके वाजवत आहेत ते महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहे. यांची अवस्था ही इटलीतील मुसोलिनीसारखी होईल, अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
शिवसेना शिंदेंचीच….राहुल नार्वेकरांच्या महानिकालावर उज्ज्वल निकम यांना काय वाटतं ?
21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. सेनेत 2 गट पडल्याचं 22 जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले. यावेळी ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते. हे निकालपत्र 1200 पानांचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले. या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि व्हिप कुणाचा हा मुद्दा होता. घटना, नेतृत्व आण विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते. माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची 2018 ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले.
Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या
राहुल नार्वेकरांच्या निकालावर उज्ज्वल निकम काय म्हणाले ?
राहुल नार्वेकरांच्या आजच्या निकालावर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 22 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. शिवसेनेतील 55 आमदारांपैकी 38 आमदारांचा एकनाथ शिंदेना पाठिंबा होता. सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी प्राथमिक मुद्दा सांगितला की, शिवसेना कोणाची….हा मुद्दा ठरवताना विधानसभा अध्यक्ष यांनी अनेक गोष्टींचा विचार केला. त्यामध्ये पक्षाचे लीडरशीप स्ट्रक्चर काय आहे ? आणि दुसरा मुद्दा शिवसेना पक्षाची घटना काय व बहुमत..पक्षप्रमुख या पदाबद्दल उल्लेख करताना विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्त्वाची आहे. तसेच 2022 ला शिंदे गटाचे प्राबल्य विधी मंडळाच्या रेकॉर्डप्रमाणे होते. त्यामुळे शिवसेना हा अधिकृत पक्ष शिंदे गटाकडे राहिला, असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. (Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)
निकालातील महत्त्वाचे मुद्दे !
- उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या घटनेवर तारीख नाही.
- खरा मुद्दा हा की खरी शिवसेना कुणाची आहे?
- दोन्ही गटाकडून पक्षाच्या घटना मागवण्यात आल्या होत्या. परंतु त्या मिळाल्या नाहीत.
- निवडणूक आयोगाकडून मी पक्षाची घटना मागवली त्याचा आधार मी घेतला आहे.
- 1999 साली दाखल केलेली शिवसेनेची घटना वैध, 2018 साली घटनेत केलेल्या बदलाला आयोगाची मान्यता नाही.
- 2018 मध्ये नियुक्ती करताना कुठलीही पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली नव्हती.
- खरी शिवसेना ही शिवसेनेच्या घटनेनुसार ठरणार आहे. नेते आणि पदांची संख्या कुणाच्या बाजूने यावर निर्णय.
- 2018 मध्ये पक्षात 33 राष्ट्रीय कार्यकारणी पदाची निवड झाली. त्यात 21 निवडणुकीद्वारे केली गेली तर 12 जणांची नियुक्ती करण्यात आली होती.
- पक्षात मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार, पक्षात मतभिन्नता हे लोकशाहीला पुरक, त्यामुळे हकालपट्टीचा निर्णय केवळ पक्षप्रमुखालाच नाही.(Breaking 11 जानेवारी 2024 महत्त्वाच्या बातम्या)