Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
13 जानेवारी 2023 : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजली !
Lonar News.com च्या माध्यमातून विशेष बातम्या . त्यानुषंगाने Breaking 13 जानेवारी 2024 काही महत्त्वाच्या घडामोडी वर थोडक्यात नजर टाकूया.
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले, अयोध्येत दर्शनाला या !
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील सर्व शाळा व कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. 22 जानेवारी रोजी राज्यातील वाईन शॉपही बंद राहणार आहेत. अवघ्या राज्यभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्सव असून देशभरातून भाविक अयोध्येला येत आहेत. अयोध्येत 22 जानेवारी रोजी 17 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. तर, 22 जानेवारी नंतरही अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम भक्तांना केलं आहे. विशेष म्हणजे हे दर्शन आमदार-खासदारांकडून होईल, असेही ते म्हणाले.
राम मंदिर सोहळा हा भाजपाने आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय बनवला आहे. त्यामुळे, सर्वच देशवासीयांना या सोहळ्यात सहभागी करुन घेतलं जात आहे. यापूर्वीही अयोध्येचं दर्शन घडवणार असल्याचं भाजपाने आवाहन केलं होतं. आता, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर भाषणातून देशभरातील भाविकांना अयोध्येत दर्शनासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. 22 जानेवारी नंतर भक्तांनी नियोजन करुन अयोध्येत यावे. त्यासाठी, आमदार-खासदार खर्च करतील, असेही मुख्यमंत्री योगींनी म्हटलं असल्याचे सूत्रांकडून सांगितली जात आहे. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
एक काळ असा होता की, अयोध्येचा नाव घेताच अनेकांना करंट लागायचा. अयोध्या हे नावही घ्यायला काहींना भीती वाटायची, पण आता जगभरातून भाविकांना अयोध्येला येऊ वाटत असल्याचे दिसत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन करू वाटत आहे. नवीन उत्तर प्रदेशात त्रेतायुगीन बदल दिसून येत आहे. एअर कनेक्टीव्हीटीही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, दूरदूरुन भाविकांना सहजपणे अयोध्येची यात्रा करता येईल. उत्तर प्रदेशात सर्वत्र विकास होत असून आता कर्फ्यू कुठेही लागला जात नाही. कर्फ्यू ऐवजी कावड यात्रांचे आयोजन केले जात आहे.
भाजपच्या काही आमदारांना अयोध्येत लोकांना आणण्यासाठी जनजागृती करण्याचे सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना अयोध्येला नेणं शक्य होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यातील भाजप आमदारांनी पुढील काही महिन्यात त्यांच्या मतदारसंघातून किमान 5 हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात रेल्वे बुकींग करुन ‘राम दर्शन विशेष ट्रेन’ नावाने भाजपा नेत्यांकडून हे अयोध्या दर्शन मतदारसंघातील भाविकांना घडवले जाईल.
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
श्रीराम ध्वज व अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री; 200 कोटींचा व्यवसाय होण्याची शक्यता !
अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या शुभप्रसंगी संपूर्ण देशात वातावरण राममय झाले आहे. नागपुरात श्रीरामाची प्रतिमा असलेले झेंडे, दुपट्टे, तोरण, लायटिंग, बिल्ले, टोपी, टी-शर्ट आदींसह अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री होत आहे. इतवारी येथील 100 हून अधिक दुकानदार विक्री करीत आहे. नागपुरात हा व्यवसाय 200 कोटींहून अधिक होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
धार्मिक साहित्यांचे वितरक व विक्रेते यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘घर घर तिरंगा’ अशा आवाहनानंतर संपूर्ण देशात तिरंगा झेंड्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. यंदा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने श्रीरामाच्या छायाचित्रांर्च्या साहित्यांची दुपटीने विक्री होत आहे. मागणीमुळे किरकोळ दुकानदारांनी ऑर्डर बुक केले आहेत. भिवंडी येथून कपडा येतो तर अहमदाबादला प्रिटिंग होते. कटिंग आणि सिलाई नागपुरात होत आहे. त्यानंतर हे धार्मिक साहित्य संपूर्ण महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठविण्यात येत आहे. दरदिवशी ऑर्डर वाढत असून पुरवठा करणे अशक्य झाले आहे. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
घरोघरी श्रीरामाचे ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार बहुतांश नागरिक घरावर श्रीराम ध्वज लावत आहेत. शिवाय तोरण आणि पताकाची विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय 22 जानेवारीला श्रीरामाचे चित्र असलेले गळ्यातील दुपट्टे आणि वाहनांवर लावण्यासाठी झेंड्याची खरेदी करीत आहे. अनेकांनी श्रीरामाची प्रतिमा असलेले टी-शर्ट खरेदी केले आहेत.
नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना या राज्यांमध्ये साहित्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. निर्मितीही वेगात सुरू असल्याचे इतवारीतील वितरक आणि विक्रेत्यांनी सांगितले. धार्मिक साहित्यांच्या विक्रीचा मकरसंक्रातीच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा मकरसंक्रातीच्या व्यवसायात 30 ते 40 टक्के घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भेटस्वरुपात देण्यात येणाऱ्या भांड्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
साहित्य विक्री दर (रुपये) :
राम, हनुमान दुपट्टे 9 ते 150
तोरण पताका 25 रु. पॅकेट
लायटिंग 45 ते 150 रू. पॅकेट
बॅच व बिल्ले 5 ते 20 नग
टोपी 5 ते 20 नग
टी-शर्ट 80 ते 150 नग
वाहनाचे झेंडे 15 नग
गेल्यावर्षी तिरंगा झेंडा तर यंदा श्रीराम ध्वज व संबंधित साहित्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. मागणीमुळे बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. कपडा आणि प्रिंट बाहेरून झाल्यानंतर नागपुरात कटिंग आणि सिलाई होत आहे. येथून नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना राज्यात पुरवठा होत आहे. नागपुरात 100 हून अधिक विक्रेते विक्री करीत आहेत.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) संपूर्ण देशात श्रीरामाचे ध्वज आणि अन्य साहित्यांचे नि:शुल्क वाटप करीत आहे. या निमित्ताने देशात 50 हजार कोटींचा व्यवसाय होणार आहे. नागपुरात 1 लाखाचे साहित्य रॅलीद्वारे जनजागृती करून वाटप करीत आहे. व्यापाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. 22 जानेवारी हा दिवस दरवर्षी श्रीरामाचा जन्मदिन म्हणून साजरा होणार आहे.
बी.सी. भरतीया, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘कॅट’
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
अयोध्येतील राम मंदिरात आता ट्रेनने मोफत जाता येणार, ‘या’ राज्यातील भाजप सरकारचा मोठा निर्णय !
अयोध्येबाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून, त्याची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. देशातच नाही तर परदेशातही श्रीरामाचा जयघोष होत आहे. अयोध्येतील मंदिरात बसलेले रामलल्ला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान, छत्तीसगड सरकारने अयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत ट्रेनची घोषणा केली आहे.
छत्तीसगडमधील भाजप सरकारने अयोध्या मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वार्षिक मोफत रेल्वे प्रवास योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोफत ट्रेनचा निर्णय म्हणजे पंतप्रधानांच्या आणखी एका हमीची पूर्तता असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रेनच्या मदतीने 20 हजारांहून अधिक भाविक अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतील. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
18 ते 75 वयोगटातील लोक जे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील. पहिल्या टप्प्यात 55 वर्षांवरील व्यक्तींची निवड केली जाणार आहे. यात्रेकरूंच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही योजना छत्तीसगड पर्यटन मंडळाद्वारे चालविली जाणार आहे आणि राज्य पर्यटन विभाग त्याचे आवश्यक बजेट प्रदान करेल. या रेल्वे प्रवासादरम्यान लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी आयआरसीटीसी घेणार आहे. रायपूर, दुर्ग, रायगड आणि अंबिकापूर स्थानकांवरून लोक या ट्रेनमध्ये चढू शकणार आहेत.
छत्तीसगड ते अयोध्या हा प्रवास सुमारे 900 किमीचा असेल, ज्यामध्ये शेवटचे स्टेशन अयोध्या असेल. यात्रेकरू वाराणसीमध्ये रात्रभर विश्रांती घेऊ शकतील, जिथे त्यांना काशी विश्वनाथ मंदिरात नेले जाणार आहे आणि गंगा आरतीमध्ये भागसुद्धा घेता येणार आहे. छत्तीसगड सरकारचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. नुकताच विष्णू सरकारने छत्तीसगडमध्ये 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे.
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
घरबसल्या मिळणार अयोध्या राम मंदिरातील प्रसाद, असं करा ऑनलाईन बुकिंग !
22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापणा सोहळ्याला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. कित्येक लोक इच्छा असूनही या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या मोफत मागवता येणार आहे. एका खासगी कंपनीने ही सोय उपलब्ध केली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच देशभरातील नागरिकांना अशी विनंती केली आहे, की त्यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येत न येता आपल्या घरीच दिवाळी साजरी करावी. अशातच खादी ऑर्गेनिक नावाच्या एका कंपनीने राम मंदिरातील प्रसाद आपण घरोघरी पोहोचवणार असल्याचं घोषित केलं आहे. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती
या कंपनीचे फाऊंडर आणि मालक आशिष सिंह यांनी याबाबत घोषणा केली आहे. ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी त्यांना स्वप्नात श्री हनुमान यांनी दर्शन दिले होते. हनुमानानेच त्यांना हा प्रसाद वाटण्यास सांगितलं. यानंतर आशिष यांनी हा निर्णय घेतला. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
कंपनीचे लोक सर्व प्रसाद घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्याठिकाणी विधिवत पूजा पार पाडल्यानंतर देशभरातील लोकांना हा प्रसाद पाठवण्यात येईल. यासाठी शिपरॉकेट किंवा अन्य डिलिव्हरी पार्टनर्सची मदत घेण्यात येणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला हा प्रसाद घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो. कंपनी मंदिरातील प्रसादाचे कोणतेही शुल्क आकारणार नाही. मात्र, तुम्हाला डिलिव्हरीसाठी काही शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी केवळ 51 रुपये डिलिव्हरी चार्जेस ठेवण्यात आले आहेत.
असा बुक करा प्रसाद
आपला प्रसाद ऑनलाईन बुक करण्यासाठी तुम्हाला आधी खादी ऑर्गेनिक कंपनीच्या वेबसाईटला (khadiorganic.com) भेट द्यावी लागेल.
याठिकाणी मुख्य स्क्रीनवरच फ्री प्रसाद हा पर्याय उपलब्ध आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला मोबाईल नंबर द्यावा लागेल.
डोअरस्टेप डिलिव्हरी हवी असेल, तर त्या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी पिकअप फ्रॉम डिस्ट्रिब्युशन सेंटर हा पर्यायही उपलब्ध आहे. हा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रसाद वाटप केंद्रावर स्वतःच जावं लागेल.
यानंतर आपला पत्ता, नाव आणि इतर गरजेची माहिती एंटर करा.
डिलिव्हरी चार्जेस पे केल्यानंतर तुमची ऑर्डर नोंदवली जाईल.
22 जानेवारी नंतर यूजर्स आपली ऑर्डर ट्रॅक करू शकतील.
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचे भाडे लाख रुपये ?
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यात रामललाची प्रतिष्ठापणा 22 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी प्रशासन अनेक दिवसांपासून जय्यत तयारीला लागले आहे. मंदिर उद्घाटनाच्या दिवशी लाखो भाविक अयोध्येत येणार आहेत. अशातच अयोध्येतील हॉटेलमधील रुम चे भाडे गगनाला भिडले असल्याचे चित्र आहे.
राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येतील हॉटेल रुमचे बुकिंग 80 टक्क्यांनी वाढले असल्याचे माहिती समोर येत आहे. त्यामुळेय येथील काही हॉटेलचे दर पाच-सात पटीने वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही आलिशान हॉटेलमधील रुमचे एका दिवसाचे भाडे एक लाख रुपयांवर गेले असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे रुमच्या भाड्यात एवढी मोठी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील बहुतांश हॉटेल आधीच बुक झाल्याची माहिती मिळत आहे आणि ज्या हॉटेलमध्ये या तारखांसाठी खोल्या उपलब्ध आहेत, त्यांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 जानेवारी रोजी सिग्नेट कलेक्शन हॉटेलमधील खोलीचे भाडे 70,240 रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत येथील भाडे 16,800 रुपये होते. रामायण हॉटेलमध्येही एका खोलीचे भाडे 40,000 रुपये झाले आहे. जानेवारी 2023 मध्ये येथील भाडे 14,900 रुपये होते. हॉटेल अयोध्या पॅलेसमधील भाडेही 18,000 रुपयांवर गेले आहे.
नुकत्याच उघडलेल्या पार्क इन रॅडिसनमधील सर्वात आलिशान खोलीचे भाडे एक लाख रुपये झाले आहे. रिपोर्टनुसार, रामायण हॉटेलमध्ये 20 ते 23 जानेवारीपर्यंत हॉटेल्स बुक झाले आहे. शिवाय, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही 80 टक्के बुकिंग झाले आहे
Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या
राम मंदिरात सोन्याचे 13 दरवाजे बसवले जाणार !
श्रीराम जन्मभूमी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा उद्घाटन आणि रामललाची प्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिरामध्येही कामाचा वेग वाढलाय. अशातच मंदिराबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.
राम मंदिरात सोन्याचे दरवाजे बसवले जाणार आहेत. यासाठी मंदिरात जोरदार काम सुरू आहे. या सोनेरी दरवाजाचे पहिले फोटो समोर आले असून, हा दरवाजा राम लालाच्या गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. असे आणखी 13 दरवाजे येत्या चार दिवसांत बसविण्यात येणार आहेत. हा पहिला दरवाजा सागवानाचा असून, त्यावर कोरीव काम केलेला सोन्याचा मुलामा लावण्यात येईल. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)
मंदिराच्या बांधकामाशी संबंधित समितीने दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात 13 दरवाजे बसवले जाणार आहेत. ते बनवण्याचे काम हैदराबादच्या 100 वर्षे जुन्या फर्म अनुराधा टिंबरला देण्यात आले आहे. या फर्मने अयोध्येत तात्पुरती कार्यशाळा तयार केली असून, त्यात हे दरवाजे नागर शैलीत तयार केले जात आहेत. दरवाजांच्या डिझाइनमध्ये संस्कृती आणि भव्यतेकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. तामिळनाडूतील कारागीर हे दरवाजे कोरण्याचे काम करत आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 22 जानेवारी रोजी सुट्टीचे आदेश दिले आहेत. यामुळे मुलांना त्यांच्या घरात बसून टीव्हीवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहता येईल. यासोबतच 22 जानेवारीला राज्यातील दारुची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (Breaking 13 जानेवारी 2023 महत्त्वाच्या बातम्या)