Breaking 14 जानेवारी 2024 मोबाईल च्या दुनियेत
14 जानेवारी 2024 : या’ उत्पादनांवर मिळणार भरघोस सूट !
Lonar News.com च्या माध्यमातून विशेष बातम्या . त्यानुषंगाने Breaking 14 जानेवारी 2024 रोजी मोबाईल च्या दुनियेतील काही घडामोडी वर थोडक्यात नजर टाकूया.
Breaking 14 जानेवारी 2024
ऐकावे ते नवल : स्मार्टफोन रंग बदलणार, हवेत चार्ज होणार !
सीईएस २०२4 मध्ये सर्वच कंपन्यांनी आपली उत्पादने बाजारपेठेत लाँच करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ईन्फनिक्स देखील आहे. कंपनीने कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये E-Color Shift टेक्नॉलॉजी दाखविली आहे. याद्वारे स्मार्टफोनच्या मागच्या पॅनलचा रंग बदलता येऊ शकतो.
विशेष म्हणजे यासाठी कोणताही खर्च येत नाही. याचबरोबर कंपनीने एअर चार्ज आणि एक्सट्रीम टेम्प बॅटरी कॉन्सेप्ट डिव्हाईस देखील दाखविले आहेत. हे तंत्रज्ञान मोबाईलची संकल्पनाच बदलून टाकणार आहे.
आजवर लोकांमध्ये वायरलेस चार्जिंगची क्रेझ होती. बऱ्याच लोकांकडे हे तंत्रज्ञान आजही नाहीय, अशातच इन्फिनिक्सने हवेत चार्जिंग करणारी टेक्नॉलॉजी आणल्याने भल्या भल्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. (Breaking 14 जानेवारी 2024)
रंग बदलण्यासाठी कंपनीने E Ink Prism 3 चा वापर केला आहे. याद्वारे युजर त्याचा फोन आरामात कस्टमाईज करू शकतो. यामध्ये बॅटरी देखील वापरली जात नाही. यात मायक्रोस्ट्रक्टरचा वापर केला जातो. ज्यामध्ये कलर पार्टिकल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज भारित असतात. यावर वेगवेगळे व्होल्टेज वापरल्याने इलेक्ट्रीक फिल्ड बदलत राहते. यामुळे कलर पार्टिकल पुढे सरकतात आणि वेगवेगळे रंग दिसू लागतात.
कंपनीने एअर चार्ज आणि एक्स्ट्रीम टेम्परेचर बॅटरी देखील सादर केली आहे. एअरचार्ज कोणतेही उपकरण वायरलेसपणे चार्ज करण्यासाठी मल्टी-कॉइल मॅग्नेटायझिंग रेझोनान्स आणि एडॉप्टिव अल्गोरिदम वापरते. हे उत्पादन 20cm पर्यंत आणि 60 अंशांच्या कोनात उपकरणे चार्ज करू शकते.
एक्स्ट्रीम-टेम्प बॅटरी सादर करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने, प्रचंड थंडी किंवा अतिउष्णतेमुळे बॅटरी निकामी होण्याची समस्या दूर होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बॅटरी -40 अंश सेल्सिअस तापमानात काम करू शकते.
Breaking 14 जानेवारी 2024
फ्लिपकार्टचा ‘या’ तारखेपासून होणार सुरू सेल, ‘या’ उत्पादनांवर मिळणार भरघोस सूट !
दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार त्याची तारीखदेखील घोषित झाली आहे. फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी ग्राहकांसाठी सेलमध्ये नवनवीन उपकरणांवर, साधनांवर अत्यंत आकर्षक ऑफर्स आणि डील्स देत असते. स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, इयरफोन, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या असंख्य गोष्टींचा यामध्ये समावेश होत असतो.
यंदाचा रिपब्लिक डे सेल हा सलग सहा दिवसांसाठी सुरू असणार आहे. फ्लिपकार्टच्या ऑफर्ससह निवडक बँकांच्या कार्ड्सचा वापर केल्यास अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. या सेल दरम्यान ॲपल, रियलमी, सॅमसंग, गूगल यांचे स्मार्टफोन्स सवलतीच्या दरात मिळणार असल्याचेही गॅजेट्स 360 च्या एका लेखावरून समजते.
फ्लिपकार्टचा हा सेल जानेवारी 14 या तारखेपासून जानेवारी 19 पर्यंत सुरू असणार आहे. तसेच जे फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य असतील, त्यांच्यासाठी मात्र हा सेल खास एक दिवस आधी म्हणजेच, 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या सेलमध्ये फॅशन ॲक्सेसरीज, बूट-चप्पल इत्यादींवर 50 ते 80 टक्के सूट मिळणार आहे.
लॅपटॉप, टॅब्लेट्स, टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक्सवर 50 ते 80 टक्के सवलत मिळणार आहे.
पलंग, सोफा, गाद्या यांवर 80 टक्यांचे डिस्काउंट उपलब्ध होणार आहे.
त्यासोबत, मायक्रोवेव्ह, मिक्सर, फ्रिज यांवर 75 टक्के तर, सौंदर्यप्रसाधने, खेळणी यांसारख्या वस्तूंवर 85 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.
ॲपल, सॅमसंग, मोटोरोला, रियलमी यांसारख्या उत्तोमोत्तम स्मार्टफोनवर ऑफर्स देण्यात येणार आहे. मात्र, त्यावर नेमकी किती टक्क्यांची किंवा किती रुपयांची सवलत असेल हे अजून उघड झालेले नाही. असे असले तरीही, ॲपल आयफोन 14, Pixel 7a यांवर भारी सूट असल्याचे म्हटले जात आहे. फ्लिपकार्टच्या बॅनरवरून Samsung Galaxy S21 FE, Motorola Edge 40 Neo, Samsung F14 5G, Realme C53, Realme 11X 5G, Moto G54 5G अशा स्मार्टफोनवर सवलत असू शकते, असा अंदाज बांधता येतो.
या रिपब्लिक डे सेलमध्ये ग्राहकांना नवीन आलेल्या Vivo X100 सीरिज, Oppo Reno 11 सीरिज, Infinix Smart 8, Redmi Note 13 Pro सीरिज आणि Poco X6 सीरिज वर देखील भरघोस ऑफर्स मिळणार आहे, असे समजते. इतकेच नव्हे तर कॅशबॅक, एक्स्चेंज, नो-कॉस्ट ईएमआय इत्यादींसारख्या सवलती उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती गॅजेट्स 360 च्या लेखावरून समजते.
फ्लिपकार्टच्या प्रतिस्पर्धी कंपनीने म्हणजेच ॲमेझॉन ने देखील आपला ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 15 जानेवारीपासून सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.
Breaking 14 जानेवारी 2024
पाठवलेला मेल समोरच्याने वाचला की नाही, कशी मिळेल माहिती?
सोशल मीडिया ॲप जसे की व्हाट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक वर जेव्हा मेसेज सेंड केला जातो. तेव्हा येणाऱ्या ब्लू टिक मार्फत किंवा मेसेज खाली दिसणार्या सीन (seen) शब्द मार्फत मेसेज समोरच्याने वाचला की नाही हे समजते. मात्र ईमेलच्या बाबतीत असे घडताना दिसून येत नाही.
आपण केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही याबाबतीत आपण कधी कधी भरपूर टेन्शन घेतो. कधी कधी तो ईमेल त्यांनी वाचला की नाही यावरून सुद्धा आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण याच अडचणीचे समाधान जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया ती पद्धत नेमकी कोणती आहे आणि नेमके कशा पद्धतीने समजू शकते की सेंड केलेला मेल समोरच्या माणसाने वाचला आहे की नाही.
पहिल्यांदा लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये गुगल क्रोम मधील राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या तीन डॉट्स वर क्लिक करा. यानंतर तिथे असणाऱ्या More Tools या ऑप्शन वर क्लिक करा. आता Extension हे ऑप्शन येईल. त्याच Extension ऑप्शन वर क्लिक करा. (Breaking 14 जानेवारी 2024)
समोर एक विंडो ओपन होईल. त्या विंडोच्या एकदम खालच्या भागाकडे जा. तिथे जाऊन Get More Extensions वरती क्लिक करा. यानंतर सर्च बारमध्ये जाऊन Mailtrack for Gmail & Inbox :Email tracking लिहुन ते सर्च करा.
नंतर ते डाऊनलोड करा आणि क्रोम मध्ये इन्स्टॉल करा. त्यानंतर तिथे Gmail Login मागितले जाईल. लॉगिन केल्यानंतर ऍक्टिव्हेट मेलट्रॅक वर क्लिक करा. यानंतर ऍक्टिव्हेट झाला की तिथे येणाऱ्या Allow च्या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर Gmail च्या टॅब मध्ये जा आणि कोणालाही ई-मेल पाठवा. यानंतर जेव्हा कधी पाठवलेला मेल समोरचा माणूस वाचेल तेव्हा नोटिफिकेशन येईल की मेल समोरच्याने कधी वाचला. सोबतच मेल इनबॉक्स मध्ये व्हाट्सअप सारखे दोन ब्लू टिक सुद्धा दिसतील.
अशा पद्धतीने मेल मध्ये येणारा हा अडथळा दूर होवू शकतो. आता याच्यापुढे कोणालाही ई-मेल पाठवला तर पाठवलेला ईमेल वाचला आहे की नाही याचे उत्तर मिळू शकते.
Breaking 14 जानेवारी 2024
फोनची विक्री सुरु, मिळवा भरघोस सूट !
Redmi Note 13 सीरिजची विक्री (Redmi) सुरू झालेली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने रेडमी नोट 13, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो प्लस लाँच केले आहेत. फ्लिपकार्ट, एमआयच्या अधिकृत वेबसाईटवरून तिन्ही फोन खरेदी करू शकाल. कंपनी मोबाइल फोनवर सूट देत आहे. डिस्काऊंटचा फायदा घेत लाँच प्राइसमधून हे फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
रेडमी नोट 13 5 जी ची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. या फोनवर कंपनी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देत आहे. याशिवाय 1,500 रुपयांचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. त्याचप्रमाणे प्रो आणि प्लस मॉडेलवर 2,000 रुपयांचा कार्ड डिस्काउंट आणि 2,500 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. ऑफर्सचा फायदा घेत स्वस्तात नवीन फोन खरेदी करू शकता. रेडमी नोट 13 5 G सोबत कंपनी 2,999 रुपयांचे स्मार्टवॉच केवळ 1,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. वेबसाईटला भेट देऊन या विषयाची अधिक माहिती मिळवू शकता. (Breaking 14 जानेवारी 2024)
रेडमी नोट 13 प्रो प्लसमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा 1.5 के ओएलईडी डिस्प्ले आहे. स्क्रीन ब्राइटनेस जास्तीत जास्त 1,800 निट्सपर्यंत वाढवता किंवा कमी केली जाऊ शकते. कर्व्ह्ड पॅन डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देण्यात आला आहे. रेडमी नोट 13 प्रो प्लस मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7200 अल्ट्रा चिपसेट असेल. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असणार आहे. चार्ज करण्यासाठी 120 वॉट फास्ट चार्जिंग (वायर्ड) सपोर्ट मिळेल.फोटोग्राफीच्या दृष्टीने रेडमी नोट 13 प्रो प्लस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये तंत्रज्ञानावर आधारित 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
रेडमी नोट 13 प्रो आगामी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 2 चिपसेट मिळेल. यात 5100 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. फोनमध्ये IP68 रेटिंग फीचर मिळणार नाही. फोनची स्क्रीन फ्लॅट असेल.
रेडमी नोट 13 फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले साइज आहे. अमोलेड डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 पी, रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. 1000 निट्स वजा करून स्क्रीनची ब्राइटनेस वाढवता येते. त्याच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आहे. रेडमी नोट 13 मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर आहे. यात 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 13 मध्ये 100 मेगापिक्सलप्रायमरी सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ज्यात चार्ज करण्यासाठी 33 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी याला केवळ IP54 रेटिंग आहे.चिनी बाजारात उपलब्ध रेडमी नोट 13 सीरिजचे सर्व फोन अँड्रॉइड 13-आधारित MIUI 1414 सॉफ्टवेअरवर काम करतात. भारतात येणारे हँडसेटही याच सॉफ्टवेअरवर चालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.