Breaking 15 January मकर संक्रांत विशेष
मकर संक्रांत संदेश : 'माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा'
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 15 January 2024 . महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण तीन दिवस साजरा करतात. याविषयी माहिती घेऊया.
मकर संक्रांत संदेश : ‘माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा’
‘तिळगूळ घ्या – गोड बोला’
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिण दिशेहून उत्तर दिशेत जातो त्यानंतर खरमास सप्ताह असतो. खरमास संप्ताहात कुठलीही चांगली कामं करू नये, पण खरमास सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो. शास्त्रानुसार, उत्तरायणच्या दिवसाला देवांचा दिवस व दक्षिणायनच्या दिवसाला देवांची रात्र म्हंटलं जातं. अशा प्रकारे मकर संक्रांतीला एकाप्रकारे देवतांची सकाळ मानली जाते.
महाराष्ट्रात मकर संक्रांत सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी 13 जानेवारी , संक्रांती 14 जानेवारी व किंक्रांती 15 जानेवारी अशी नावे आहेत. संक्रांत म्हणजे काय ? आणि या संक्रांतीला ‘मकर संक्रांत’ असं का म्हणतात.
संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. (15 January 2024)
संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रीत पाण्याने स्नान करायचे. तीळाची भाकरी, वांग्याचे भरीत अन् मिश्र भाजी करण्याची प्रथा आहे. तिळाची गरम गरम भाकरी, भरीत, चविष्ट भाजी, सोबत लोणी, असा विशेष बेत असतो.
संक्रांतीचा आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ज्याप्रमाणे आपण दसर्याला मोठ्या लोकांना आपट्याची पाने देऊन त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तिळगूळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढवा, यासाठी ‘तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला’ असा संदेश थोरामोठ्यांना दिला जातो. ‘माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा’ हाच संदेश हा सणाच्या माध्यमातून दिला जातो. (15 January 2024)
सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व ‘तिळगूळ घ्या – गोड बोला’ असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते जणू. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
संक्रांतीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच असं बोललं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. प्रत्येक राशीनुसार दान असल्याचं बोललं जातं. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने प्रत्येक राशीवर त्याचा वेगळा परिणाम होतो, म्हणून राशीनुसार दान करावं, असं तज्ज्ञ सांगतात. (15 January 2024)
काळ्या वस्त्रांचे महत्त्व
संक्रांतीच्या दिवशी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली, अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनवलेला हलवा देतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात. (15 January 2024)
लहान मुलांचे ‘बोर न्हाण’
संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे ‘बोर न्हाण’ केले जाते. यावेळी लहान मुलांना भोवताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात. त्याला काळं झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, मुरली या अन् अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांची बाळाला सजवतात. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्या पदार्थांचा अभिषेक केला जातो.
पतंगोत्सव
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागे एक विशिष्ट अर्थ आहे. सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानात जावे लागते. यामुळे सहजच आपण कोवळ्या उन्हाचाही आनंद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी ज्या प्रकारे आकाशात लाल, पिवळ्या, निळ्या रंगांची पतंग उडताना दिसतात. (15 January 2024)
मकर संक्रात म्हटले की आपल्याला वेध लागतात ते तिळगुळाचे आणि पतंगांचे. विविध प्रकारचे पतंग आज लोणार शहर परिसरात विक्रीला आले आहेत. पतंग बाजीसाठी नागरीक सज्ज झाले आहेत पण पतंगाच्या खेळाला एक रंजक इतिहास आहे.
प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ टरेन्टमचा आर्काईटस याने इ. स. पू. पाचव्या-चौथ्या शतकांत पतंगाचा शोध लावला असे मानले जात असले, तरी आशिया खंडात तो त्यापूर्वी अनेक वर्षे ज्ञात असावा, असे दिसते. एक चिनी सेनानी हान सिन याने इ. स. पू. 206 मध्ये युद्धात पतंगाचा वापर केला होता. कोरियन, चिनी, जपानी व मलायी लोकांचा पतंग हा राष्ट्रीय खेळ आहे. पतंगाशी काही धार्मिक समजुतीही निगिडत आहेत. (15 January 2024)
विमानांचा शोध लागेपर्यंत पतंगाचा सैनिकी व इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग करीत असत. एका कोरियन सेनापतीने आपल्या सैनिकांना स्फूर्तिदायक इशारे देण्यासाठी दिवा जोडलेला पतंग उडविला, अशी समजूत आहे. हेस्टिंग्जच्या लढाईत इशारे देण्याकरिता पतंग वापरण्यात आले. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. त्याचप्रमाणे उंचीवरून छायाचित्रे घेण्यासाठी पतंगांचा उपयोग करीत असत. पतंगाचा उपयोग करून केलेले छायाचित्रण (काइट फोटोग्राफी) हाही एक लोकिप्रय छंद ठरला आहे. (15 January 2024)
बेंजामिन फ्रँकलिन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने 1752 साली पतंगाला बांधलेल्या किल्लीवर वादळी वीज आकर्षित करून त्याचा अभ्यास व प्रयोग केला होता. वातयानाचा (बलून) शोध लागण्यापूर्वी पतंगाच्या साहित्याने जास्तीत जास्त उंचीवरील वातावरणाचा अभ्यास करीत असत. 1894 मध्ये कॅ. बेडन पोएल याने 10.97 मी. उंचीचा पतंग तयार करून त्याच्या साहाय्याने एक मनुष्य हवेत 30.48 मी. उंच उचलून दाखिवला. माकोर्नी यानेही आपल्या बिनतारी संदेशवाहकाचे प्रयोग करण्यासाठी मोठ्या पतंगांचा उपयोग केला होता.
1910 मध्ये माउंट वेदर वा येथे पियानोच्या तारेची दोरी करून, एकाला एक पतंग जोडीत 7265 मी. (23835 फूट) या कमाल उंचीपर्यंत पतंग नेण्यात आला होता. नायगारा धबधब्याच्या टांगत्या पुलाची पिहली तार टाकण्यासाठीही प्रथम पतंगाचाच उपयोग केलेला होता. दुस-या महायुद्धात पाणबुड्यांच्या टेहेळणीच्या टप्प्यात वाढ व्हावी, म्हणून हेलिकॉप्टरसारख्या दिसणाऱ्या तीन पात्यांच्या पतंगाचा उपयोग नाझी करीत असल्याचे उल्लेख सापडतात. गोलंदाजांना विमानांवर नेम घेण्याचा सराव व्हावा, म्हणूनही अमेरिकेत पतंगाचा उपयोग करीत. (15 January 2024)
पतंगांचे विविध प्रकार
करकोचाच्या आकाराचा चिनी पतंग, स्त्रीप्रतिमेचा अलंकृत चिनी पतंग, इका-बाटा : जपानी पतंगाचा नमूना, पेटी-पतंग, साध्या पतंगाची आकृती, कोरियन पतंग, त्सुरू कामे : करकोचा व कासव यांच्या आकृत्यांनी युक्त जपानी पतंग, सयामी पतंग.
मकर संक्रांत साजरी करण्यासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि प्रथा आहेत. हा सण पंजाबमध्ये लोहरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी खिचडी उत्सव अशा नावांनी ओळखला जातो. या सणाला अनेक नावे असू शकतात, पण तो साजरा करण्यामागचा उद्देश एकमेकांमध्ये आनंद वाटून घेणे हा आहे. यंदा मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी 2024 म्हणजेच आज आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा आणि दान करण्याचे विशेष महत्त्व धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया
हिंदू धर्मात रंगांवर विशेष लक्ष
हिंदू धर्मात धार्मिक विधी आणि पूजेमध्ये रंगांवर विशेष लक्ष दिले जाते. शास्त्रानुसार सणासुदीच्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगांचे कपडे परिधान केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा होते आणि शनिदेवाचीही कृपा होते.
यंदा काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही?
मकर संक्रांती जवळ आली की देवीचं वाहन आणि देवीच वस्त्र कोणत्या रंगाचं आहे यावर विशेष चर्चा होत असते. कारण देवी ज्या रंगाची साडी परिधान करून आली असते, तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य मानला जातो. यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घोड्यावर येणार असल्याने यंदाच्या मकर संक्रांती सणाला काळ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाहीत. (15 January 2024)
लाल
लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते. महिलांनी या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे. यामुळे घरात सुख-समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील.
पिवळा
पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे, म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील. असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्री हरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्त होते. (15 January 2024)
केशरी
भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो. हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग परिधान करू शकता. भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे, म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे.
गुलाबी
गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि सौभाग्याचा निदर्शक मानला जातो. हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात. असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते. (15 January 2024)
हिरवा
हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धी-सिद्धीचे आगमन होईल, असे मानले जाते.
काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ ?
मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी पवित्र स्नान केल्याने हजारपट शुभ फळ मिळते. हिंदू धर्मात कोणत्याही सण किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते परंतु या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा पाहायला मिळते. (15 January 2024)
(टीप : वरील सर्व बाबी लोणार न्यूज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून लोणार न्यूज कोणताही दावा करत नाही.)