Breaking 16 January अयोध्येचं अर्थकारण बदलणार
अयोध्येत पर्यटन आणि इतर क्षेत्रासाठी ही मोठी संधी !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 16 January 2024 . अयोध्या सध्या देश आणि जगात चर्चेचा विषय आहे. याविषयी माहिती घेऊया.
Breaking 16 January 2024
महेंद्रसिंह धोनी ला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं पोहचलं आमंत्रण !
भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण पोहचलं आहे. हा सोहळा अयोध्येत 22 जानेवारीला होणार आहे. धोनीबरोबरच सचिन तेंडुलकर, विराट कोहली, हरभजन सिंग यांना देखील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. महेंद्रसिंह धोनीला त्याच्या घरी रांचीमध्ये हे आमंत्रण मिळालं आहे.
एमएस धोनीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-प्रांत सचिव धनंजय सिंह यांच्याकडून निमंत्रण मिळाले. अयोध्येत 22 जानेवारीला होणार्या राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी धोनीला औपचारिक निमंत्रण देण्यात आले. तेव्हा भाजपचे राज्य संघटनेचे सरचिटणीस कर्मवीर सिंग देखील उपस्थित होते.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देशातील 6000 हून अधिक लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (Breaking 16 January 2024)
अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजकारणापासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांना आमंत्रणे पाठवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असून हा कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. आता निमंत्रितांपैकी या सोहळ्याला कोण कोण उपस्थिती राहतं ते पाहणं उत्सुकतेचं असेल.
Breaking 16 January 2024
अयोध्येचं अर्थकारण बदलणार : पर्यटन आणि इतर क्षेत्रासाठी ही मोठी संधी !
संपूर्ण देशाचे लक्ष सध्या येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाकडे लागले आहे. या सोहळ्याची जवळपास सर्वच तयारी पूर्ण होत आली आहे. अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने भक्तांमध्ये आनंद आणि उत्साह आहे
एकीकडे धर्माच्या दृष्टीकोनातून पाहिले तर आस्था, भक्तीचा सागर इथं पाहायला मिळेल परंतु अर्थव्यवस्थेच्या चष्म्यातून पाहायला गेले तर प्रभू श्रीरामाच्या आगमनानंतर अयोध्येतील विकासाचे चित्र बदलणार आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे या शहराला नवी धार्मिक ओळख मिळणार आहे. त्याचसोबत व्यवसायाला मोठी चालनादेखील मिळेल असे बोलले जात आहे. (Breaking 16 January 2024)
भारतासारख्या देशात सरासरी एक भारतीय एका दिवसात 2 हजार 717 रुपये धार्मिक विधींवर खर्च करतो. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि जीडीपी यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. राम मंदिरापासून अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांचा विकासाला बूस्टर डोस मिळेल.
पर्यटन आणि इतर क्षेत्रासाठी ही मोठी संधी असेल. हॉटेल इंडस्ट्री, छोटे-मोठे व्यावसायिक, लोकल उद्योगाला चालना मिळेल. अयोध्या हे मुख्य केंद्र असेल त्यामुळे मोठमोठ्या कंपन्याही इथं गुंतवणूक करण्याची संधी सोडणार नाहीत. सध्या हॉटेल इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. (Breaking 16 January 2024)
अयोध्या सध्या देश आणि जगात चर्चेचा विषय आहे. देशाची धार्मिक राजधानी म्हणून अयोध्येकडे पाहिले जात आहे. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेतही अयोध्येचे योगदान वाढेल. पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. हॉटेल, रिसोर्टसह अनेक क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, गेल्या काही दिवसांत अयोध्येत गुंतवणुकीसाठी 102 करार झाले आहेत. जागतिक गुंतवणूक समिटमध्ये अयोध्येतील पर्यटन क्षेत्रासाठी 18 हजार कोटी रुपयांचे 102 करार झालेत. त्यानंतरही अजून काही कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहेत.
अयोध्येत सध्या 126 प्रकल्प सुरू आहेत. 46 प्रकल्प विचाराधीन आहेत. तर 80 प्रकल्पावर स्वाक्षरी बाकी आहे. या 126 प्रकल्पांचा खर्च 4 हजार कोटीहून अधिक आहे. पर्यटकांची संख्या पाहता अयोध्येत 50 नवीन हॉटेल आणि रिसोर्ट तयार होत आहेत. ताज, मॅरियेट, जिंजर, ओबेरॉय, ट्रायडेंट, रेडिसनसारख्या बड्या कंपन्या अयोध्येत गुंतवणूक करत आहेत.
अयोध्येत हॉटेल इंडस्ट्रीतील 4 मोठ्या प्रकल्पावर 420 कोटी गुंतवणूक झाली आहे. पंचे ड्रीमवर्ल्ड एवएलपी 140 कोटी गुंतवणूक झाली आहे. इतकेच नाही तर अयोध्येत बाटलीबंद पाणी बनवणाऱ्या बिसलेरी कंपनीनेही ग्रीनफिल्ड प्लांटची घोषणा केली आहे. अयोध्येच्या विकासासाठी जवळपास 85 हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. पुढील 10 वर्षाचा आराखडा त्यासाठी आखण्यात आला आहे.
श्रीराम मंदिर बनल्यानंतर अयोध्येतील रिअल इस्टेटला मोठा बूस्ट मिळाला आहे. अयोध्येतील जागेच्या किंमती 4 पटीने वाढल्या आहेत. एविएशन सेक्टरने अयोध्येला ताकद दिली. इंडिगो, स्पाईसजेट सारख्या विमान सेवांनी इथं फ्लाईट सुरू केल्यात. नवनवीन राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बनलेत. राम मंदिर उद्घाटनानंतर याठिकाणी दरवर्षी 20-25 कोटी भाविक येतील अशी अपेक्षा आहे.
अयोध्येत प्रभू श्रीराम एकटेच नाही तर त्यांच्यासोबत स्थानिकांच्या आयुष्यात लक्ष्मीही विराजमान होणार आहे. अयोध्येतील अर्थव्यवस्थेमुळे देशातील अर्थव्यवस्थेलाही ताकद मिळेल. व्यापारी संघटना कॅटनुसार, जानेवारीत राम मंदिराच्या भव्य सोहळ्याच्या आयोजनामुळे देशात 50 हजार कोटींची व्यावसायिक उलाढाल झाली आहे.
Breaking 16 January 2024
प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं घरोघरी अक्षता देऊन निमंत्रण !
अयोध्येत उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. मात्र अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं करायचं काय? याबाबत सर्वसामान्य लोक संभ्रमाचं वातावरण आहेत.
भारतामध्ये प्राचीन काळापासून अक्षता देऊन निमंत्रण देण्याची परंपरा आहे. निमंत्रण देण्यासाठी हळदीमध्ये भिजवलेल्या पिवळ्या तांदळांचा वापर केला जातो. हिंदू धर्मामध्ये अक्षतांना विशेष महत्त्व आहे. तसेच कुठलीही पूजा, अनुष्ठान, धार्मिक कार्य या अक्षतांशिवाय पूर्ण होत नाही. आता अयोध्येतून आलेल्या या अक्षतांचं काय करायचं, याबाबत जाणकारांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे. (Breaking 16 January 2024)
तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे शुक्र ग्रहापासून धनवैभव लक्ष्मी समस्त भौतिक सुखं सुविधा प्राप्त होतात. त्याचा लाभ घेण्यासाठी तांदूळ लाल रेशमी वस्रात बांधून आपल्या तिजोरीत ठेवले पाहिजेत. असं केल्याने मंगल आणि चंद्र दोन्ही सक्रिय होऊन लक्ष्मी योग निर्माण करतात.
ज्योतिषाचार्यांच्या मते, राम मंदिरातून आलेल्या तांदळांचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी या तांदळांची खीर बनवता येईल. त्यानंतर ही खीर कुटुंबासह प्रसाद म्हणून ग्रहण करता येईल.
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण म्हणून आलेल्या तांदळांचं विशेष महत्त्व आहे. ते शुभाची निशाणी आहे. त्यामुळे शुभकार्यासाठी घरातून बाहेर पडताना या अक्षता टिळा म्हणून डोक्यावर लावता येऊ शकतात. असं केल्याने ठरवलेलं काम सहजपणे पूर्ण होईल. (Breaking 16 January 2024)
ज्या कुटुंबामध्ये नव्याने विवाह सोहळा झाला असेल, त्या कुटुंबातील वधू घरात पहिल्यांदा जेवण बनवताना या तांदळांचा वापर करू शकते. असं केल्याने घरात सुखसमृद्धी येईल.
Breaking 16 January 2024
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेबाबत मुस्लिम समाजाच्या मनात….!
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचं आणि आनंदाचा वातावरण आहे. अशा कार्यक्रमात कोणत्याही पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरताही मोठे प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या कित्येक दशकांपासून प्रतिक्षित असलेल्या या राम मंदिरात अखेर रामलल्ला विराजमान होणार असल्याने भारतातील सर्वधर्मीय नागरिकांच्या मनात आनंदाचं वातावरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याबद्दल मुस्लिम समाजाच्या मनात कोणतीही नकारत्मक भावना नाही, असं इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अथर हुसेन शनिवारी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. (Breaking 16 January 2024)
मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुस्लिम समाजाने स्वीकारला आहे. अभिषेक सोहळा आणि मंदिराबाबत मुस्लिम समुदायात कोणतीही नकारात्मक भावना नाही, असं ते म्हणाले. अयोध्येपासून सुरुवात करून देशातील एकता जगासमोर दाखवली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.
अथर हुसेन म्हणाले, आम्ही आमची एकता आणि जातीय सलोखा जगाला सांगू आणि त्याची सुरुवात अयोध्येपासूनच करू. आमची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असा आमचा विश्वास आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालापूर्वीही आम्ही सांगितले होते की न्यायालयाकडून जो निर्णय येईल, तो स्वीकारला जाईल. अभिषेक समारंभाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर कोणत्याही भारतीयने प्रश्न उपस्थित करू नये. (Breaking 16 January 2024)
दरम्यान, राम मंदिर सोहळ्यासाठी भारतातील अनेक प्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे देण्यात आली आहेत. तसंच, देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या, देशाला अभिमान वाटणाऱ्या सामान्य कुटुंबातील लोकांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येसह देशभर दिवाळी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी अयोध्येत गर्दी न करता आपल्या घरातूनच भगवान रामासठी दीप प्रज्वलित करा, असं आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.