Breaking 2 February 2024 भाविकांसाठी खुशखबर !
थेट अयोध्यासाठी ‘लालपरी’ व 'विमान सेवा' सुरु होणार !
Lonar News.com च्या माध्यमातून Breaking 2 February 2024. थेट अयोध्यासाठी ‘लालपरी’ व ‘विमान सेवा’ सुरु होणार या विषयी थोडक्यात माहिती घेऊया.
Breaking 2 February 2024
थेट अयोध्यासाठी ‘लालपरी’ची सेवा सुरू होणार !
22 जानेवारी 2024 या दिवशी भारतात एक ऐतिहासिक घटना घडली. तब्बल 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या दिवशी श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिरात प्रभू श्री रामरायांचे आगमन झाले.
22 जानेवारीला भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच 23 जानेवारीपासून हे भव्य राम मंदिर रामभक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे प्रभू श्री रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आता देशासहित संपूर्ण जगातील रामभक्त श्रीक्षेत्र अयोध्या नगरीत दाखल होत आहेत. आपल्या महाराष्ट्रातूनही विविध भागांमधून रामभक्त श्रीक्षेत्र अयोध्या नगरीत पोहोचत आहेत.
भक्तांचे गेल्या अनेक शतकांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असल्याने राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता धुळ्यातील रामभक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता धुळे येथून थेट लालपरीने अयोध्याची वारी करता येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून अयोध्यासाठी स्पेशल बस सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Breaking 2 February 2024)
10 फेब्रुवारी 2024 पासून धुळे ते अयोध्या यादरम्यान धुळे आगारातून पहिली बस सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रभू रामरायांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना याच बसणे पुढे वाराणसी आणि प्रयागराज येथे जाऊनही दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. एकंदरीत या बससेवेमुळे धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील आणि खानदेशातील राम भक्तांना मोठा दिलासा मिळणार असून बस सेवेला चांगला उदंड प्रतिसाद मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार धुळे ते अयोध्या या दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंदाजे 4,545 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. अर्थातच साडेचार हजार रुपयात आता धुळ्यातील भाविकांना श्रीक्षेत्र आयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामरायाचे दर्शन घेता येणार आहे. तिकीट दरात काही बदल असू शकतात. खान्देशातील रामभक्तांमध्ये कमालीचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Breaking 2 February 2024
वेगवेगळ्या 8 शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा सेवा सुरू होणार !
श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशभरातून आणि जगभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तर प्रदेशातील अयोध्येला पोहोचत आहेत. भाविकांच्या आणि व्यावसायिकांच्या सेवेसाठी केंद्रीय नागरीक उड्डाण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून आठ शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उड्डाण सेवांचे उद्घाटन होणार आहे. स्पाइस जेट या कंपनीची विमाने नवीन मार्गावर उड्डाण करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच एअर इंडिया एक्सप्रेसने अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकत्ता या नवीन मार्गांची घोषणा केली होती, त्यानुसार 17 जानेवारीपासून नवीन मार्ग सुरू करण्यात आले होते. या मार्गांवर विमान कंपनी थेट उड्डाणे चालवत आहे. (Breaking 2 February 2024)
अयोध्येसाठी 1 फेब्रुवारी 2024 पासून आठ नवीन उड्डाण मार्ग सुरू करण्याची तयारी आहे. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांमधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई ते अयोध्या या दरम्यान दररोज विमानसेवा असणार आहे. मुंबईहून सकाळी 8.20 वाजता अयोध्येसाठी विमान उड्डाण करेल ते सकाळी 10.40 वाजता पोहचेल. तर, अयोध्येहून मुंबईसाठी सकाळी 11.15 वाजता विमान उड्डाण करेल ते दुपारी 1.20 वाजता मुंबईत दाखल होईल.
30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत नव्याने बांधलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले होते. भविष्यात या धार्मिक नगरीत होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन अयोध्येतील विमानतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. हा विमानतळ 350 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. (Breaking 2 February 2024)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला जगातील सर्वात भव्य तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जात असल्याचे अनेकदा सांगितले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर अयोध्या जगाच्या पर्यटन नकाशावर सर्वात विकसित आणि भव्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला होता.
Breaking 2 February 2024
पभू श्रीराम मंदिराचे काम 15 फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार !
22 जानेवारी रोजी नव्या राम मंदिरात रामलल्लाची मुर्ती प्रतिष्ठापना पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत भक्तांची वर्दळ वाढली आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसातच कोट्यवधींचे दान भक्तांकडून अर्पण करण्यात आले आहे. या भव्य अभिषेक सोहळ्यानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी संकुलातील अपूर्ण काम आता पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. 15 फेब्रुवारीपासून हे काम सुरु करण्यात येणार आहे.
मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनामुळे मंदिरातील बांधकाम काहीकाळासाठी बंद करण्यात आले आहे. आता हे काम पूर्ण पूर्ववत होणार आहे. मंदिराच्या पश्चिमेला पुन्हा दोन टॉवर क्रेन उभारण्यात येत असून कामगारही 15 फेब्रुवारीला येथे पोहोचतील अशी माहिती आहे.
राम मंदिराचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा हे याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही दिवस बांधकामात गुंतलेली मशिन काढून टाकण्यात आली होती. आता ती पुन्हा स्थापित केले जाणार आहेत. एल अँड टी चे कामगारही आठवडाभरात परततील. त्यानंतरच कामाला वेग येईल असे मिश्रा म्हणाले.
Breaking 2 February 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार !
लोकसभा निवडणुका तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहे. पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
लोकसभा निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसरकारकडुन विकास कामांचे उदघाटन आणि भुमिपूजनाचा धडका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूर नंतर पुण्यातला चौथा दौरा आहे.
मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील ‘न्हावा-शेवा अटल सेतू’चा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. (Breaking 2 February 2024)
यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहे. पुण्यातील विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि मेट्रो मार्गिकेचेही उद्घाटन ही मोदीच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी विविध प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले होते. (Breaking 2 February 2024)
“देव दैवतांच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन केले जात आहे, ही बाब कौतुकास्पदच आहे. मात्र ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून देव, देश आणि धर्माचे रक्षण केले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडासाठी तरी किमान पुरातत्व खात्याचे नियम अपवाद करावेत, जेणेकरून शिवभक्तांना शिवकालीन रायगड अनुभवता येईल व संपूर्ण जगाला आपल्या इतिहासाचा हेवा वाटेल.
ही मागणी घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू असलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त यावर ठोस निर्णय घ्यावा, तीच छत्रपती शिवरायांना खरी आदरांजली ठरेल,” अशी शिवभक्तांची मागणी आहे. Breaking 2 February 2024