राजकीय

Breaking 2024 – Assembly Special – प्रचार दौरा

‘आपला माणूस’ म्हणून मतदारांची उमेदवार संघपाल पनाड यांना पसंती ..

Assembly Special : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच मेहकर व लोणार तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मला मतदारांनी आशीर्वाद द्यावा.

Assembly Special : संघपाल पनाड यांची मेहकर विधानसभा मतदार संघातील प्रचारात आघाडी

Assembly Special2024 विधानसभा विशेष : मेहकर विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेना चे उमेदवार संघपाल पनाड यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, गावभेट दौरे, राज्यस्तरीय नेत्यांच्या जाहीरसभा आणि ‘होम टू होम’ प्रचाराबरोरच त्यांचे कार्यकर्ते आता थेट शेताच्या बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना विकासाचे व्हिजन सांगत आहेत. त्यामुळे ‘आपला माणूस’ म्हणून मतदारांची त्यांना पसंती मिळत आहे.

लोणार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुलतानपूर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या संख्येने मताधिक्य घेत सदस्य निवडून आणत संघपाल पनाड यांनी आपल्या पाठीशी असलेला जनाधार दाखवून दिला. जनहिताची कामे केल्याने जनतेने त्यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकशाही मार्गाने त्यांनी अनेक आंदोलन करत अनेकांना न्याय मिळवून दिल्याने पुरुष, महिला, युवक, युवती, वृद्ध यांचेसह तृतीय पंथीयांनी संघपाल पनाड यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर येत आहे.

Assembly Specialजन सामान्यांच्या न्याय हितासाठी अनेक आंदोलन करत विविध खेळ, दहीहंडी, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रोजगार मेळावे, शेतीविषयक मार्गदर्शन  आदी कार्यक्रम घेऊन मेहकर विधानसभा मतदारसंघात संगपाल पनाड यांचे नाव घराघरात पोहचलेले आहे. प्रचारा दरम्यान संघपाल पनाड यांनी मतदार संघातील समस्या जाणून घेतल्या. मतदार संघातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मला विधासभेत पाठवा या हाकेला जनता प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस जनमताचा वाढता कौल पाहता संगपाल पनाड यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. याशिवाय दररोजच्या गाव भेटी दरम्यानही अनेक कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत. (Assembly Special)

Assembly Specialमेहकर व लोणार तालुक्यातील गावांचा झंझावाती दौरा करून उमेदवार संघपाल पनाड यांनी मतदारांशी संवाद साधला. दौर्‍यात मतदारांशी संवाद साधताना रिपब्लिकन सेना उमेदवार संघपाल पनाड यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. मधल्या काळात झालेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. सत्ताधार्‍यांची मुजोरी मोडीत काढणे हे माझे आणि मतदार आपल्या दोघांचे लक्ष्य एकच आहे. विदर्भातील महत्वाचे पिक असलेल्या सोयाबीनला १० हजार भाव मिळवून देण्यासाठी रत्यावर उतरून आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुरु असलेले दुषित वातावरण पाहता ते थांबवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच मेहकर व लोणार तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मला मतदारांनी आशीर्वाद द्यावा.

Assembly Specialमहिलांसाठी मोफत शिक्षण, सर्व क्षेत्रात रोजगार, स्वरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा या मुद्यांवर विशेष भर देणार आहे. शेत पिकाला हमीभाव मिळावा व  शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्राधान्य घेण्यात यावे व युवकांना रोजगार मिळावा किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षणासोबत अर्थसहाय्य मिळावे यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी कोणतेही संभ्रम मनात न ठेवता रिक्षाचे बटण दाबून आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन रिपब्लिकन सेना उमेदवार संगपाल पनाड यांनी केले आहे. (Assembly Special)

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button