स्थानिक बातम्या

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

थोडक्यात बुलढाणा जिल्ह्याबद्दल.....

Breaking 2024 – Briefly about Buldhana district : प्रसिद्ध व्यवसायिक मयूर राका हे व्यवसायानिमित्त देश-विदेशात भ्रमंती करत असतात. भ्रमंती दरम्यान त्यांना आलेले अनुभव आणि आपला भाग सुद्धा विकसित आणि समृद्ध होऊ शकतो. याबद्दल त्यांचे विचार, मनोगत जाणून घेऊया.

मयूर राका, लोणार, जि.बुलढाणा.

Mayur Raka

येत्या काही दिवसात आमच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. व्यावसायिक कामानिमित्त मागील काही वर्षा पासून महाराष्ट्रात फिरत असताना पश्चिम महाराष्ट्राचा “विकास” म्हणजे काय?. पश्चिम महाराष्ट्रात असं काय आहे जे मराठवाडा आणि विदर्भात नाही, म्हणून आपला भाग कायम उपेक्षित वंचित राहतो? . तसेच आपल्या जिल्हयात काय – काय सोयी सुविधा असायला पाहिजे, म्हणजे आपला भाग, आपल्या भागातील शेतकरी आणि जनता सुद्धा विकसित  होईल अन् आपला जिल्हा “सुख-समृद्ध” म्हणून ओळखला जाईल. असे बरेच प्रश्न मनात उपस्थित होत राहिले. मग जसा वेळ मिळेल तसा मी एक-एक बाबीचा अभ्यास करून डायरी मध्ये नोंद करत गेलो.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

आता येऊ मूळ मुद्द्यावर…..

थोडक्यात बुलढाणा जिल्ह्याबद्दल…..

देशात अती मागास म्हणून आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात पहिल्या दहा क्रमांक मध्ये बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. (According to the National Crime Records Bureau, the states and district with the highest incidence of farmer suicide in 2022) बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9688 चौ.किमी असून मुंबई ते हावडा हा महत्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात, तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आई जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे आणि जग प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर लोणार येथे आहे.

माझ्या अभ्यासानुसार खालील बाबी विचारात घेतल्या तर आपला भाग सुद्धा विकसित आणि समृद्ध होऊ शकतो…… !  प्रामाणिक प्रयत्न आणि त्याला साजेस कर्तुत्व-नेतृत्व लाभलं की अशक्य गोष्ट शक्य व्हायला वेळ लागत नाही.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

1) शेती आणि शेतकरी :-

“शेतकरी सुखी तर सर्वच सुखी”

:- शेत मालाला भाव, योग्य आणि रास्त भाव देणाऱ्या बाजारपेठा (कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा सहकार तत्वावरील बाजारपेठ).

:-  शेतमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळाचे गोडाऊन, सहकारी तत्त्वावर फळ/भाजीपाला साठवणुकीसाठी शीतगृहे.

:- शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर वित्त पुरवठा करणाऱ्या जिल्हा सहकारी पतपेढी.

:- शेतीला बारमाही सिंचन/कालवे पाणी आणि सुरळीत वीज पुरवठा (कालवे बारामती/निरा/सुपे/सोराटेवाडी पॅटर्न)

:- फळ प्रक्रिया प्रकल्प, नाशवंत फळासाठी दळणवळण यंत्रणा आणि शीतगृहे.

:- शेतीला लागणारे बी बियाणे, यंत्र, अवजार इतर आवश्यक साधने जिल्हा सहकारी पतपेढी मार्फत गरजू गरीब शेतकऱ्यांना अगदी नाममात्र दरात.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

Briefly about Buldhana district2) औद्योगिक विकास आणि रोजगार :-

:- प्रत्येक तालुक्यातील शेती पिकावर आधारित एमआयडीसी त्या भागात विकसित करणे. (सूतगिरणी आणि कापड गिरण्या संबंधी फाईव स्टार एमआयडीसी, हुपरी जिल्हा कोल्हापूर)

:-  स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून MSME अंतर्गत सहकार तत्वावर उद्योग उभारणे/चालना देणे.

:- फळबाग लागवड भागात Food Processing पार्क.

:- नवं उद्योगांना चालना देण्यासाठी अल्प किंमतीवर जागा आणि मूलभूत सुविधा MSME/MIDC अंतर्गत उपलब्ध करून देणे.

:-  महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी बचतगट किंवा सेल्फ हेल्प ग्रूप आदींना एमआयडीसी अंतर्गत आवश्यक सुविधा पुरविणे आणि बँका मार्फत नाममात्र दरात वित्त पुरवठा करणे.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

3) सिंचन, खार-पाण पट्टा, नदी जोड प्रकल्प :-

Briefly about Buldhana district:- बुलढाणा जिल्ह्यात 91 प्रकल्प (3 मोठे, 7 मध्यम व 81 लघु) असूनही योग्य पाणी व्यवस्थापना अभावी पावसाळा संपताच शेतीसह पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागते.

:- नळगंगा, पेनंटाकळी, खडकपूर्णा हे तीन मोठे प्रकल्प जिल्ह्यातील पावसाळी पाणी आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्या मुळे ही प्रकल्प कमी-अधिक प्रमाणात भरली जातात म्हणून वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प जिल्ह्यात “कायमस्वरूपी” सिंचनासाठी, खार-पाण पट्ट्यासाठी मैलाचा दगड ठरेल.

:- आजघडीला जिल्ह्यात फक्त 31% सिंचन क्षमता असल्यामुळे जिल्ह्यातील 7,50,000 हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य असूनही फक्त 2,20,044  हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येत आहे. म्हणून नदीजोड प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाचा सुवर्ण बिंदू ठरेल!

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

4) आरोग्य केंद्रे/सुविधा :-

Briefly about Buldhana district:- प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुख-सुविधासह “तालुका आरोग्य मंदिर” यात आधुनिक उपकरणासह तज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, अँब्युलन्स आणि औषधी.

:- तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सर्व प्राथमिक चाचण्या आणि औषधी सह “मोहल्ला क्लिनिक”

:- प्रत्येक ग्रामपंचायती प्रमाणे “पशू वैद्यकीय सेवा केंद्र” जनावरांचे लसीकरण आणि उपचार.

:- प्रत्येक सरकारी रुग्णालयात लहान मूल (वय गट 0 ते 5) यांच्या साठी मोफत लसीकरण तसेच गर्भवती मातांसाठी मोफत विविध चाचण्या आणि सात्विक-पोषक आहाराबाबत योग्य ती माहिती.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

5) नामांकित सरकारी शिक्षण संस्था/कॉलेज/शाळा :-

:- प्रत्येक तालुक्यात (लोकसंख्येच्या प्रमाणात) एक नामांकित शिक्षण देणारी संस्था, ज्यात अगदी नाममात्र शुल्कात तळागाळातील गोरगरिबांच्या मुलांना पहिली ते पदवी शिक्षण सोबतच खेळ, कला, साहित्य, उद्योग आणि स्पर्धा परीक्षा आदी बाबत तज्ञाकडून सखोल मार्गदर्शन. (संदर्भासाठी करवीर शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान)

:- अलीकडेच बुलढाणा जिल्ह्यातील काही खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमाविल्याची बातमी वाचली. ग्रामीण मातीतील असे बरेच खेळाडू जागतिक पातळीवर झळकू शकतात त्या साठी Khelo India, National Sports Talent Search Scheme (08-12 years), Sports Authority Of India (SAI) आदी मार्फत विविध खेळांचे साहित्य, तज्ञ प्रशिक्षक, मैदाने आदी सोबतच प्रत्येक तालुक्यात “क्रीडा संकुल” उभारता येईल.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

6) पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळाचा विकास/जतन/संवर्धन :-

:- जागतिक दर्जाचे लोणार सरोवराचे जतन संवर्धन करून “लोणार विकास आराखडा” कार्यान्वित करणे.

Briefly about Buldhana district:- एमटीडीसी, IRCTC आणि टुरिस्ट विभागा मार्फत लोणार सरोवराची माहिती देश-भर पोहोचविणे. (आपल्याला विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे शेजारील जिल्ह्यातील बऱ्याच लोकांना लोणार सरोवर काय आणि कुठे आहे हे माहिती नाही)

:- लोणार अभयारण्य मध्ये “Bio Diversity Park” उभारणे.

:- समृध्दी महामार्गावर आई जिजाऊ जन्मस्थान, सिंदखेड राजा आणि लोणार सरोवर बाबत जागरूकता करणे.

:- सिंदखेड राजा येथे प्राचीन वास्तूंचे जतन करून शिवकालीन शस्त्रे आदीचा संग्रह करून एक प्रशस्त संग्रहालय निर्मिती करणे.

:- तसेच धार्मिक स्थळात गजानन महाराज मंदिर शेगाव, बालाजी मंदिर बुलढाणा, धम्म गिरी बुलढाणा, बालाजी मंदिर मेहकर, बालाजी मंदिर देऊळगाव राजा, सैलानी बाबा दर्गा सैलानी, रेणुका देवी मंदिर चिखली इत्यादी भागाचा विकास धार्मिक बाबीसोबत पर्यटनाच्या दृष्टीने करणे.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

7) रेल्वे महामार्ग विकास :-

:- बहुप्रतिक्षित खामगाव-चिखली रेल्वे महामार्ग.

:- जिल्हयात रेल्वे महामार्गचे जाळे खूप कमी आहे, म्हणजे मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि चिखली आदी भागात नवीन रेल्वे महामार्ग टाकता येतील का? (शेजारील परभणी, हिंगोली, वाशिम, जालना, अकोला इत्यादी ठिकाणातील जंक्शन मधून नवीन रेल्वे लाईन बाबत संपूर्ण राजकीय शक्ती वापरून सर्वोच्च पातळीवरून मंजूर करून आणणे)

:- रेल्वे महामार्ग विकासाबरोबर बुलढाणा जिल्ह्यावरचे “अतिमागास” जिल्हा हा डाग कायमचा पुसण्यासाठी मदत होईल.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

8) इतर मुद्दे :-

:- जिल्ह्यातील प्रत्येक तालुका “बारामती” प्रमाणे विकसित झाला पाहिजे. यात रोड, नागरी सुविधा, प्रशस्त शासकीय कार्यालय, भविष्याचा विचार करून केलेली नगर रचना, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, सुख-सुविधे युक्त बस स्टॉप, खरेदी-विक्री/एपीएमसी यांच्याकडून अतिरिक्त महसूल मिळावा आणि गरजूंना रोजगार मिळावा म्हणून “मेडिकल स्टोअर”, ज्येष्ठांना विरंगुळा केंद्रे/लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क, एमआयडीसी विकास, रूग्णालय इत्यादी.

:- जसे आपल्या राज्यातील आमदार परदेशात “अभ्यास” करायला जातात त्याच प्रमाणे प्रामाणिक आणि विकासाची भूक असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य/नगरसेवक/जिल्हा परीषद सदस्य आदींना महाराष्ट्रातील विकसित भागात अभ्यास करायला पाठविले पाहिजे.

Breaking 2024 – Briefly About Buldhana District

Lonar News YouTube Channel

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button