Breaking 2024 – Election – वंचित बहुजन आघाडी
७ नोव्हेंबरला डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या लोणारात गावभेटी, कॉर्नर बैठका होणार
Breaking 2024 – Election : धर्मवीर दिलीपराव रहाटे यांना अपेक्षित असलेला मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध : डॉ.ऋतुजा चव्हाण, वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार
Breaking 2024 – Election : ७ नोव्हेंबरला लोणारमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला सुरुवात
उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या गावभेटी, कॉर्नर बैठका होणार….
सचिन गोलेच्छा, पत्रकार, लोणार, जि. बुलढाणा. www.lonarnews.com
लोणार : मेहकर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण लोणार तालुक्यात ७ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवार रोजी प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
५ नोव्हेंबर २०२४ वार बुधवारला धर्मवीर दिलीपराव रहाटे यांची कर्मभूमी असलेल्या शेंदला येथे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले, ऋषांक चव्हाण यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Breaking 2024)
प्रचाराचा नारळ फोडत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की, धर्मवीर दिलीपराव रहाटे यांना अपेक्षित असलेला मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मेहकर विधानसभा मतदार संघाचा चौफेर विकास व्हावा, शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी हे धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे स्वप्न होते. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन समाजकारणाचा उच्च आदर्श धर्मवीर दिलीपराव रहाटे यांनी घालून दिलेला आदर्श मला पुढे न्यायचा आहे. यासाठी मला साथ द्या.
७ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवार ला जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहर तसेच लोणार तालुक्यातील ग्रामीण भागात गावभेटी, कॉर्नर बैठक ला सुरुवात करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी सांगितले आहे.
https://youtube.com/@LonarNews
वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंबआ, व्हीबीए) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाली. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत.