Breaking 2024, Entry of Monsoon in Andaman !
मान्सून महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार !

Entry of Monsoon : हवेचे दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत ठरत असून, मान्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल, अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे.
मान्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’ ; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार !
शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहतो, त्या मान्सूनचे आगमन (Entry of Monsoon) रविवारी म्हणजे 19 मे 2024 रोजी अंदमानात झाले, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच या मान्सूनला कसलाही अडथळा येणार नसल्याने तो वेगाने पुढे सरकणार आहे. हवेचे दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत ठरत असून, मान्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल, अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. (Entry of Monsoon)
सध्या नैऋत्य मान्सून मालदीव, दक्षिण बंगालचा काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. वातावरणाच्या खालच्या स्तरातील द्रोणीका रेषा उत्तर प्रदेश ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागांवर चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. कोकणात रविवारी (19 /05/2024) व पुढील दोन दिवस बऱ्याच जिल्ह्यांत वातावरण दमट व उष्ण असेल, तर रत्नागिरीत 20 ते 23 मे पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Entry of Monsoon)
मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 21 व 22 मे ला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात 21 व 22 मे 2024 रोजी यलो अलर्ट दिला. मराठवाड्यात 22 मे 2024 पर्यंत बऱ्याच जिल्ह्यांत यलो अलर्ट आहे. दरम्यान, पुणे व परिसरात 21 ते 25 मे पर्यंत आकाश निरभ्र राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. (Entry of Monsoon)
मान्सूनचा प्रवास ! Entry of Monsoon
सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हे तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत वाढेल. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. मान्सून श्रीलंकेमध्ये 26 मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये 31 मे, तसेच दक्षिण कोकणात 5 जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल, असा अंदाज देण्यात आला आहे.
मे महिन्याचा शेवटही विजा-वादळी वाऱ्यानेच होण्याची शक्यता !
अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज होता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच होणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यापुढे उकाडा जाणवेल पण उन्हाचे चटके मात्र जाणवणार नाही, असेच चित्र दिसून येत आहे.
रविवारी विदर्भात सर्वच जिल्ह्यात कमाल तापमानात अंशत: वाढ झाली. अकोल्याचा पारा पुन्हा 43.2 अंशावर गेला. त्याखालोखाल 42.2 अंशावर ब्रम्हपुरी आहे. बाकी चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ व बुलढाण्यात तापमान 40 अंशाच्या आसपास होते. मात्र नागपूर, गोंदिया, गडचिरोलीत पारा 38.6, 38.4 व 36.6 अंशावर आहे. (Entry of Monsoon)
हवामान खात्याने उन्हाची काहीली वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र सध्या परिस्थिती विपरित होत आहे. मध्य महाराष्ट्र व आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे व मध्य प्रदेशपर्यंत झंझावात निर्माण झाला आहे. अंदमानपर्यंत पोहचलेला मान्सून प्रगतीपथावर आहे. त्यामुळे विदर्भात वादळी स्थिती निर्माण झाली आहे.
वेधशाळेच्या वेबसाईटवर दर्शविलेल्या स्थितीनुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात 20 मे चा एक दिवस सोडून, तर अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम येथे पुढचा पूर्ण आठवडा वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जाणार आहे. याची चाहुल रविवारीही दिसून आली. दिवसभर आकाशात उन-सावल्यांचा खेळ चालला होता. सायंकाळी हलक्या वाऱ्यासह वादळी स्थिती तयार झाली होती. तापमान वाढले पण चटक्यांऐवजी उकाडा अधिक जाणवत होता. वेधशाळेने पुढच्या 25 मे पर्यंत वादळासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यापुढे मान्सून पूर्व परिस्थिती सक्रिय होण्याची शक्यता असल्याने मे महिनाही कमी तापाचा ठरणार, असा अंदाज आहे. (Entry of Monsoon)
प्री-मान्सूनची स्थिती शेवटच्या आठवड्यात !
दरम्यान रविवारी अंदमानमध्ये धडकलेला मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. मे च्या शेवटी तो केरळमध्ये व त्यानंतर देशात प्रवेश करण्याचा अंदाज आहे आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तो महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे मे च्या शेवटच्या आठवड्यातच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल, अशीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हवामान अंदाज : विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस !
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी हवामान अंदाज वर्तवला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Entry of Monsoon)
मुंबईत कसं असेल हवामान ?
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 अंश सेल्सिअस आणि 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरु होतो याची सर्वजण वाट पाहत आहेत. यादरम्यान आता सर्वांनाच प्रतिक्षा असलेल्या मान्सूनचं आज अंदमानात आगमन झालं आहे. हवामान विभागाने (Weather Department) सर्वाना आनंदाची बातमी दिली आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. (Entry of Monsoon)
अंदमान-निकोबार, मालदीव आणि कोमोरीन भागात मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान विभागानं याबात माहिती दिली असून, यानुसार 31 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 11 जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच यावर्षी पाऊस जवळपास 106 टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा अंदाज !
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. अंदाजानुसार, 30 ते 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. (Entry of Monsoon)
विदर्भालाही इशारा !
गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाने फटका बसल्याचं दिसून आलंय. अशातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
राज्यातील या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ !
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पासून पुढचे पाच दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, वर्धा, वाशिम, बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. तर 19 मे ते 22 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
सध्या दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी परस्थायेत तामिळनाडू आणि केरळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येथे दोन दिवस रेड अलर्टही देण्यात आला आहे त्या दोन राज्यांमध्ये काही ठिकाणी रविवारी पावसामुळे पाणी साचलेलं दिसलं गोव्यात सहज दक्षिणेकडच्या अन्य राज्यांमध्येही अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय. (Entry of Monsoon)