Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
पाणी टंचाई गंभीर होण्याच्या मार्गावर !
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year : मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटत असल्यामुळे पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. भूजल पातळी खालावल्यामुळे विहिरी, कूपनलिकांनाही पाणी नसल्यामुळे टंचाई तीव्र झाली आहे.
लघु प्रकल्पातील पाणीसाठ्यात घसरण : यंदा जलसंकटाची भिती !
पाटबंधारे विभागाच्या लोणार तालुक्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण होत आहे. एप्रिल महिन्यात अशीच धरणसाठ्यात झपाट्याने मोठी घसरण होत राहिल्यास जलसंकटाची भीती व्यक्त केल्या जात आहे.
सन 2023 मधील पावसाळ्याच्या हंगामात सुरुवातीच्या काळात दोन ते अडीच महिन्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. तरीही धरणांमध्ये पाणीसाठा चांगला होता. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. वादळी वातावरण निर्माण झाले होते. परंतु पाऊस मात्र झाला नाही. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे.
परिणामी धरणसाठ्यात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे . तसेच भूजल पातळीही खालावली आहे. त्याचाही धरणसाठ्यावर परिणाम होत आहे. पाटबंधारे अंतर्गत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील टिटवी, शिवनी जाट, गंधारी, पिंपळनेर, देऊळगाव कुंडपाळ, तांबोळा, गुंधा, अंभोरा व हिरडव प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी होत आहे. वाढते तापमान आणि खालावलेली जलपातळी पाहता येत्या उन्हाळयात लोणार तालुक्याला जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
तालुक्याचा पाणी टंचाई अहवाल तयार करण्याची गरज !
पावसाअभावी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या काही गावात आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य देऊन दुष्काळाच्या झळा बसलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
पाण्याचे स्त्रोत बळटीकरणासाठी उपयायोजना !
संभाव्य काळात पाण्याचा तुटवडा पडून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये याची यंत्रणांनी काळजी घ्यायला हवी. पाणी पुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दरमहा पाणीपुरवठा योजनांचा तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यायला हवा . पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक निर्णय घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
मराठवाड्यातील पाणी टंचाई गंभीर होण्याच्या मार्गावर !
मराठवाड्यातील पाणी टंचाई गंभीर होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या 11 धरणात 32 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 90 लघु प्रकल्प कोरडे असून 259 धरणांची पाणीपातळी जोत्याखाली आहे. तीन मध्यम प्रकल्प पूर्णत: कोरडे असून 24 प्रकल्पात पाणीसाठा जोत्याखाली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. मार्च अखेरीस कोरड्या पडलेल्या मध्यम आणि लघु प्रकल्पांची संख्या वाढणार आहे.
मराठवाड्यात धरणातील पाणीसाठा वेगाने घटला असून मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. मोठ्या 11 धरणांत 32.47 टक्के पाणीसाठा आहे. एकूण 75 मध्यम प्रकल्पात 15.39 आणि 740 लघु प्रकल्पात सरासरी 15.73 टक्के पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 27 बंधाऱ्यात 23 टक्के आणि गोदावरी नदीवरील 15 बंधाऱ्यात 41.89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
विभागातील एकूण 877 प्रकल्पात केवळ 27.46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. सर्वात मोठ्या आणि पाच जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात 26 टक्के पाणीसाठा आहे. येलदरी (41 %), सिद्धेश्वर (77%), माजलगाव (01%), मांजरा (12%), उर्ध्व पेनगंगा (61%), निम्न तेरणा (07%), निम्न मनार (35%), विष्णुपुरी (28%), निम्न दुधना (12%) अशी धरणनिहाय पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. सिना कोळेगाव धरण पूर्ण कोरडे आहे.
मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने घटत आहे. यामुळे पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. एका लघु प्रकल्पावर दहा ते पंधरा गावे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. उन्हाळी पिकांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडी धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. पाण्याच्या अधिक पाळ्या देण्याची बीड, परभणी जिल्ह्यातून मागणी वाढली आहे. भूजल पातळी खालावल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांनाही पाणी नसल्यामुळे टंचाई तीव्र झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी पासून पाणी टंचाईच्या झळा !
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पाणी प्रश्न डोकं वर काढणार आहे. धरणातील पाणीसाठा दिवसागणिक कमी होत आहे. जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्क्याने कमी झालाय. आजचा उपयुक्त पाणीसाठा 44 टक्क्यांवर आला असून मागील वर्षी 67 टक्के होता.
नाशिकच्या गंगापूर धरणात अंदाजे 61 टक्के पाणी शिल्लक असून मागील वर्षी हाच साठा 74 टक्के होता, दारणा धरणात अंदाजे 43 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 78 टक्के, पालखेडमध्ये 26 टक्के तर मागील वर्षी 51 टक्के होता. गिरणा धरणात 35 टक्के असून मागील वर्षी 56 टक्के पाणीसाठा शिल्लक होता तर मणिकपुंज धरणात अवघा 21 टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी 42 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील 174 गाव आणि 385 वाड्याना 170 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे, ही संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार !
नद्या कोरड्या पडू लागल्यात तर विहिरी तळ गाठू लागल्यानं सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. शिल्लक पाणीसाठा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुरविण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. जिल्ह्यातील गंगापूर सारख्या प्रमुख धरणातील पाणीसाठा हो मागील वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी कमी झाल्याने पाणी कपातीची टांगती तलवार नाशिककरांवर आहे.
559 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा !
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पाणी संभाव्य कपातीचा निर्णय घेणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातून टँकरची मागणी देखील वाढत असून 170 टँकरच्या माध्यमातून 559 गावं, वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात असून टँकरची मागणी देखील वाढत आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
सत्ताधारी सुवर्णमध्य कसा काढणार?
जून, जुलै महिन्यात सुरू होणारा पावसाळा लांबला तर ऐनवेळी पाणी कसे उपलब्ध करायचे या संदर्भात बैठकीत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पाणी कपातीचा पर्याय प्रशासनासमोर आहे. मात्र, पाणी कपात केली तर नागरिकांचा रोष आणि विरोधकांना आयता मुद्दा मिळणार असल्यानं सुवर्णमध्य कसा काढायचा हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर आहे.
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील 45 गावे, 18 वाड्यावस्त्यांवरील नागरिक आणि जनावरांची तहान सध्या 35 टँकरच्या माध्यमातून भगवली जात आहे. येवला तालुक्यात यंदा पाऊस कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
शासनाकडून येवला पंचायत समितीच्या माध्यमातून येवला शहरालगत असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांजवळील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून एका विहिरीत पाणीसाठा करण्यात येत आहे. या विहिरीतील पाण्याच्या साठ्यातून येवला तालुक्यातील तब्बल 45 गावे, 18 वाड्या वस्त्यांवरील नागरिक आणि जनावरांची तहान 35 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करत भगवली जात आहे. तर भीषण भाग येवल्यातील नागरिकांना दैनंदिन कामासोबत जनावरांकरता अधिक पाण्याची आवश्यकता असून देण्यात येणारा पाण्याचा साठा हा पुरेसा नसल्याचे अधिक पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती येवल्यातील नागरिक प्रशासनाकडे करत आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
जळगाव जिल्ह्यात 42 गावांत पाणीटंचाई !
राज्यात कमी पर्जन्यामुळे अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्येच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून तसे नियोजन केले होते.
राज्यात कमी पर्जन्यामुळे अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्येच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून तसे नियोजन केले होते. जिल्ह्यात 42 गावांत पाणीटंचाई असून, तिथे 51 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यात 29 गावांत 33 टँकरने पाणीपुरवठा होत होता. आता टँकरची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
टँकर सुरू असलेली गावे
तालुका – गावे – टँकर
चाळीसगाव – 26 – 31
अमळनेर – 12 – 16
भडगाव – 2 – 2
भुसावळ – 1 – 1
पारोळा – 1 – 1
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
59 गावांसाठी 65 विहिरीचे अधिग्रहण
चाळीसगाव तालुक्यातील 22 गावांतील 26, अमळनेर तालुक्यातील 13 गावांत 14, भडगाव तालुक्यातील तीन गावांसाठी तीन, भुसावळ तालुक्यातील दोन गावांत दोन, पारोळा तालुक्यातील चार गावांत चार, पाचोरा तालुक्यात तीन गावांना तीन, धरणगाव तालुक्यातील 9 गावांत 10, तर जामनेर तालुक्यातील तीन गावांत तीन विहिरीचे अधिग्रहण, अशा 59 गावांत 65 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जि.प.कडून टंचाईसाठी कृती आराखडा
जळगाव जिल्हा परिषदेकडून टंचाईच्या पार्श्वभूमीवर 2023-24 साठी 592 गावांसाठी 9 कोटी 90 लाख 74 हजार रुपयाचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. टंचाईची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी ‘दुष्काळ तपासणी समिती’ गठित केली असून, ही समिती तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्धतेची तपासणी करणार आहे.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year
मनरेगांतर्गत 91 कामे सेल्फवर
जिल्ह्यात टंचाईच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कामाची मागणी करतील, तसे ‘मनरेगा’ची कामे सुरू असून, 91 हजार 396 एवढी कामे सेल्फवर आहेत. त्यामुळे मनरेगा अंतर्गत मागेल त्याला काम मिळेल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Breaking 2024 Fear Of Water Crisis This Year