कृषीस्थानिक बातम्या

Breaking 2024 : Fodder Problem Created

चाराटंचाई : पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार !

Fodder Problem Created : दरवर्षी  मार्च- एप्रिल महिन्याच्या अखेरीस अनेक बंधारे कोरडे पडतात. परिणामी पाणी टंचाई निर्माण होऊन पशुधनासाठी लागणारा चारा प्रश्न दरवर्षी उभा राहतो.

चाराटंचाई : पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार !

लोणार न्यूज नेटवर्क : किशोर मापारी :  मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. असे असतानाच शेतधुरा आणि जंगलातील वणव्यांमुळे मोठा भाग जळून खाक होत आहे. नवीन झुडपांसह चारा जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याची परिस्थिती  आहे. चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार होऊ नये म्हणून चारा खरेदी करावा लागणार असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचे एकंदरीत परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Fodder Problemलोणार तालुक्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस होत नाही. पाऊस चांगला झाला तरी पाणी साठवणारे प्रकल्प गाळा ने भरलेले असल्याने पाण्याचा निचरा झटपट होऊन पाणी वाहून जाते. यामुळे दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच  अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागते. त्यातच शेतधुरा आणि जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे मोठा भाग जळून गेला आहे. वणव्यांमध्ये शेतधुरा आणि जंगलातील चारा जळाल्याने ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधन सांभाळणे अवघड होत आहे. महागडा चारा खरेदी करावा लागत असूनही चारा उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन बाळगणे बंद केले आहे. अशात चारा उपलब्ध नसल्याने पशुधन सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Breaking 2024 : Fodder Problem Created

लोणार तालुक्यात अनेक ठिकाणी कालव्यांची कामे झालेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत. चांगले पर्जन्यमान झाले तरी पाणी आले तसे वाहून जाते. त्यामुळे रब्बी हंगामात शेतीला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. परंतु, उन्हाळ्यात तालुक्यातील काही गावांमध्ये एप्रिल  महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते.

पावसाचे पाणी अडवण्यासाठी वाहणाऱ्या नाल्यांवर छोटे-मोठे  प्रकल्प बांधण्यात आलेले आहेत. सदरील प्रकल्पांमध्ये गाळ साचल्याने जास्त काळ पाणी साठून राहत नाही. परिणामी, मार्च- एप्रिल महिन्याच्या अखेरीस बंधारे कोरडे पडतात. परिणामी पाणी टंचाई निर्माण होऊन पशुधनासाठी लागणारा चारा प्रश्न दरवर्षी उभा राहतो.

Breaking 2024 : Fodder Problem Created

उन्हाळ्यात जनावरे आजारी होण्याची शक्‍यता !

Fodder Problemअति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्‍यावर थंड पाणी घालावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत. रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्त्व “क’ आहारातून किंवा औषधाच्या माध्यमातून देण्यात यावे. शेतकरी बांधवांसाठी पशुपालन करणं हे फार जिकरीचे काम झालं आहे. तिन्ही ऋतूमध्ये जनावरांची काळजी घेणं आवश्यक लागते. जवळपास एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्हाळा सुरू होतो. या दिवसात पशुधनाची काळजी घेणं खूप आवश्यक असतं.

Breaking 2024 : Fodder Problem Created

अति उष्णतेमुळे जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्‍यावर थंड पाणी ओतावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे.उन्हाळ्यात हिरव्या वैरणीची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्‍न निर्माण होतात आणि मुकी जनावरे ही या समस्येला सतत तोंड देत असतात. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्‍यता असते. हे आजार झाल्यास काय उपाय करावे व आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्‍यक आहे.

Breaking 2024 : Fodder Problem Created

नाकातील रक्तस्राव

अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्‍यावर थंड पाणी घालावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत. रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्त्व “क’ आहारातून किंवा औषधाच्या माध्यमातून द्यावे.

Breaking 2024 : Fodder Problem Created

विषबाधा

उन्हाळ्यात हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खात असतात, यामुळे विषारी वनस्पती बेशर्म, घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येतात व जनावरांना विषबाधा होते. जनावरे गुंगल्यासारखी करतात, खात नाहीत, खाली बसतात व उठत नाहीत. त्यानंतर पाय सोडून ताबडतोब मरतात. विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.

Breaking 2024 : Fodder Problem Created

उष्माघात

हा आजार अतिप्रखर सूर्याच्या किरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. उष्माघातामुळे जनावरांच्या शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते. यावर उपाय म्हणून जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे किंवा ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्‍यावर ठेवावे व त्यावर वारंवार पाणी मारावे. अशा जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे. भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी व चारा द्यावा. शक्‍य असल्यास पाण्यात मीठ व साखर टाकावी.

Breaking 2024 : Fodder Problem Created

कडव्या

हा आजार अति प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला होतो. हा आजार प्रामुख्याने ज्या जनावरांच्या चामडीचा रंग पांढरा असतो, त्या जनावरांत याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो; कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत (चामडीत) “मेलेनीन’ नावाचा घटक कमी प्रमाणात असतो; तसेच चाऱ्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावरे गाजर (कॉंग्रेस) गवत खात असतात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता हा आजार होतो. या गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावे. भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे. उपचारासाठी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.

Breaking 2024 : Fodder Problem Created

Fodder Problemकॅल्शिअमची कमतरता

उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात. वाढे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्‍झेलेट खनिज व जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होऊन लघवीवाटे निघून जाते, त्यामुळे कॅल्शिअमची पातळी कमी होते. त्यामुळे जनावरांना “मिल्क फिव्हर” नावाचा रोग होतो, त्यामुळे जनावरे थकून एकदम खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते, रवंथ बंद होते, जनावरे खात नाहीत, दूध देणे कमी होते, शरीर थंड पडते, जनावरे मान टाकून बसतात. यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.

Breaking 2024 : Fodder Problem Created

नैसर्गिक आपत्ती  पूर्वसूचना न देता कधीही निर्माण होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती विविध स्वरूपामध्ये आपल्या समोर येऊन उभी राहू शकते. मुख्यत्वे ही सर्व संकटे ‘ग्लोबल वार्मिंग’ मुळे (जागतिक तापमानातील वाढ) निर्माण होतात. अचानक येणाऱ्या या संकटांमुळे अन्न, खाद्य, चारा आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण होते, ज्यामुळे मानवी शरीरावर आणि पशुधनाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.

अन्नाची तसेच खाद्याची निर्माण झालेली कमालीची टंचाई यांमुळे कुपोषणास प्रोत्साहन मिळते. आवश्यक ती पोषक मूल्ये शरीरास न मिळाल्याने पशुधनाची उत्पादक तसेच पुनरुत्पादक कार्यक्षमता घटते. म्हणूनच, चारा टंचाई दरम्यान प्रथम लक्ष्य नेहमी पशुधनाला उपासमारीपासून वाचविणे व नंतर त्यांची उत्पादकता टिकवून ठेवणे हे असले पाहिजे. सद्य परिस्थिती लक्षात घेता पशु खाद्य निर्मितीचा कच्चा माल हा जवळपास दुपटीने वाढला आहे. परिणामी पशु खाद्याचे दर देखील वाढले आहेत.

Breaking 2024 : Fodder Problem Created

नांदेड : संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठक संपन्न

Fodder Problemजिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्ह्यातील पाण्याच्या व चाऱ्याच्या उपलब्धतेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते अशा ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विहिर अधिग्रहण, तात्पुरता पाणी पुरवठा व टंचाई निवारणासाठीची कामे आगामी काळात प्राधान्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात चाऱ्याबाबत कुठल्याही प्रकारची चणचण नसल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागावर लक्ष ठेवून असावे असेही यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

Breaking 2024 : Fodder Problem Created

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button