Breaking 2024 Google Will Launch New Features
गुगल सांगणार कुठे आहे जवळचं ईव्ही चार्जिंग स्टेशन !
Breaking 2024 Google Will Launch New Features : इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी गुगल मोठ्या प्रमाणात नवे फीचर्स लाँच करत आहे.
गुगल सांगणार कुठे आहे जवळचं ईव्ही चार्जिंग स्टेशन !
देशात सध्या इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळेच ईव्ही वापरणाऱ्यांच्या सोयीसाठी गुगल मॅप्स आता एक खास फीचर लाँच करणार आहे. यामुळे आता यूजर्सना जवळच्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचं लोकेशन मॅप्सवर मिळणार आहे. गुगल मॅप्समध्ये एआयच्या मदतीने हे नवीन फीचर देण्यात येणार आहे. यासाठी यूजर रिव्ह्यूजचा देखील फायदा होणार आहे. या डेटामुळे यूजर्सना केवळ चार्जिंग स्टेशनची माहितीच नाही, तर तिथे पोहोचण्यासाठी अगदी अचूक दिशा देखील मिळणार आहेत.
Google Will Launch New Features
गुगल मॅप्सवर दररोज कोट्यवधी यूजर्स आपले रिव्ह्यू देत असतात. यामुळे गुगलकडे माहितीचा भंडार आहे. यामध्ये पेट्रोल पंप, सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशनबाबत देखील माहिती असते. याच माहितीचा वापर करून गुगल इतर यूजर्सना अधिक चांगली सेवा देणार आहे. एखाद्या चार्जिंग स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, तिथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा, चार्जिंगसाठी कोणती पिन उपलब्ध आहे, किती वेळ लागतो? अशा सर्व गोष्टींची माहिती गुगल मॅप्सवर मिळेल.
Google Will Launch New Features
गुगल मॅप्सच्या या फीचरमुळे आता लांब पल्ल्याच्या प्रवासाचं नियोजन करणं सोपं जाणार आहे. इलेक्ट्रिक कार वापरणारे कित्येक लोक, इच्छा असूनही चार्जिंग स्टेशनची माहिती नसल्यामुळे लांबपर्यंत कार नेणं टाळतात. मात्र आता गुगलवर आधीपासूनच कुठे-कसे चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत याची माहिती मिळाल्यामुळे लाँग ट्रिप्सना फायदा होणार आहे.
केवळ चार्जिंग स्टेशनचीच नाही, तर गुगल मॅप्स आता तुम्हाला अशा हॉटेलची माहिती देखील देऊ शकेल, जिथे ईव्ही-चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रवासाचं नियोजन करणं अगदी सोपं होणार आहे. यासोबतच कारमध्ये इनबिल्ट मॅप्सना देखील ईव्ही चार्जिंग स्टेशन लोकेट करण्याची सुविधा देण्याबद्दल गुगलचा विचार सुरू आहे. एकूणच, इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन; त्यांच्या सोयीसाठी गुगल मोठ्या प्रमाणात नवे फीचर्स लाँच करत आहे.
Google Will Launch New Features
सोशल मीडियाच्या चक्रव्यूहातून सुटका करायची तर हे नक्की वाचा !
दिवसेंदिवस लोकांना टेक्नॉलॉजीचा वापर वाढत आहे, इतका की कधी कधी हे व्यसन असल्याचं देखील वाटू लागतं. त्यामुळे अनेकजण यापासून दूर होण्याचे प्रयत्न करत आहेत. यासाठी बाजारात एक नवीन फोन आला आहे जो The Boring Phone नावाने सादर करण्यात आला आहे. ही HMD कंपनी Heineken आणि Bodega च्या कोलॅब्रेशनसह आला आहे. जरी यात स्मार्ट फीचर नसले तरी कनेक्टिव्हिटी मिळेल. चला, जाणून घेऊया याची माहिती.
Google Will Launch New Features
The Boring Phone
HMD म्हटलं आहे की युजर्स आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करत आहेत. त्यामुळे कंपनीनं हेनेकेन आणि बोदेगासह भागेदारी केली आहे. या दोन्ही कंपन्या खाजगी सोशल लाइफला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे बोरिंग फोन तरुण युजर्सना खूप मदत करेल. फोनमध्ये ट्रान्सपरंट डिजाइन आणि अनोखा पॅनल मिळतो. तसेच यात फ्लिप पॅटर्न देखील आहे. त्यामुळे हा हटके वाटतो. डिव्हाइसमध्ये युजर्सना जुना कीपॅड मिळेल. त्याचबरोबर फ्रंट पॅनलवर छोटी स्क्रीन देण्यात आली आहे. थोडक्यात हा फोन तुम्हाला त्या काळात घेऊन जाईल जेव्हा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर स्माटफोन अॅप अस्तित्वात नव्हते. यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल.
Google Will Launch New Features
The Boring Phone चे स्पेसिफिकेशन्स
बोरिंग फोनच्या स्पेसिफिकेशन मध्ये 2.8 – इंचाच्या QVGA प्रायमरी डिस्प्ले आणि बाहेरच्या बाजूला 1.77 – इंचाच्या डिस्प्लेचा समावेश आहे. मोबाइलमध्ये 0.3 एमपीचा कॅमेरा आहे. एचएमडीनुसार डिवाइसची 1,450 एमएएचची बॅटरी 20 तासांपर्यंत व्हॉइस कॉलसह एक आठवड्याचा स्टँडबाय टाइम देऊ शकते. डिव्हाइसमध्ये 128 एमबी इंटरनल स्टोरेज आहे जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून वाढवता येते. फोनमध्ये 4 जी कनेक्टिव्हिटी आहे आणि 2 जी आणि 3 जी नेटवर्क सपोर्ट देखील आहे. डिव्हाइसमध्ये अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेला स्नेक गेम, एफएम रेडियो आणि हेडफोन जॅक आहे.
Boring Phone ची उपलब्धता
बोरिंग फोन एक लिमिटेड एडिशन फोन आहे. जो फक्त एचएमडी, हेनेकेन आणि बोदेगाद्वारे आयोजित ऑफलाइन इव्हेंटच्या माध्यमातून उपलब्ध होईल. हा बाजारात विकला जाणार नाही. हेनेकेनच्या वेबसाइटनुसार मोबाइलचे फक्त 5000 यूनिट्सच बनवण्यात आले आहेत. हा डिव्हाइस युरोप आणि यूएस मध्ये होण्यात काही इव्हेंटमध्ये मिळेल. त्यामुळे भारतात हा येणे शक्य नाही.
Google Will Launch New Features
सेकंड हँड आयफोन घेताय? ‘या‘ गोष्टी नक्की तपासा !
आयफोन खरेदी करण्याच वेड सर्वांनाच असतं. परंतु कमी बजेटमुळे ते आयफोन खरेदी करु शकत नाहीत. बजेट जास्त नसल्यामुळे ते ऑनलाईन स्वस्त आयफोन घेण्याच्या विचारात असतात, तर काही लोक सेकंड हँड आयफोन घेण्याच्या विचारात असतात. कित्येकदा सेकंड हँड आयफोन खरेदी करणे फायदेशीर सुद्धा ठरते. परंतु कधी कधी सेकंड हँड आयफोन घेताना काही गोष्टी तपासून घ्यायला हव्यात, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. शिवाय, जास्त पैसे आयफोन दुरूस्त करायलाच जाऊ शकतात.
Google Will Launch New Features
खरेदीचा पुरावा
जेव्हा आपण सेकंड हँड आयफोन खरेदी करतो, तेव्हा विक्रेत्याकडून त्याने आयफोन खरेदी केल्याचा पुरावा आणि बिलाची पावती आपण घ्यायला हवी. आयफोन खरेदी केल्याच्या ओरिजनल पावतीची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी आपण घ्यायला हवी. कधी कधी सेकंड हँड आयफोनची वॉरंटी संपलेली नसते, त्यामुळे जर फोनची ओरिजनल पावती मिळाली; तर आपण त्याची वॉरंटी डीटेल्स चेक करु शकतो.
सिरीयल नंबर चेक करणे
वॉरंटी चेक करण्यासाठी पहिल्यांदा आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जावे. तेथे जनरलच्या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर अबाऊटवर क्लिक करावे. तेथे आयफोनचा सीरियल नंबर चेक करु शकता. आयफोनचा सीरियल नंबर कॉपी करुन checkcoverage.apple.com या वेबसाईटवर तो टाकून आयफोनची माहिती चेक करु शकता.
Google Will Launch New Features
बॅटरीवर द्या विशेष लक्ष
कोणत्याही आयफोनसाठी त्याची बॅटरी हेल्थ खुप महत्त्वाची असते. आयफोनची बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटिंगमध्ये जावे. त्यानंतर बॅटरीच्या पर्यायावर क्लिक करावे. तेथे बॅटरी हेल्थ आणि चार्जिंगवर क्लिक करावे. जर बॅटरी हेल्थ चेक करु शकत नसाल, तर तो आयफोन नकली असण्याची शक्यता आहे.
डिस्प्लेबद्दल घ्या माहिती
आयफोनचा डिस्प्ले अनऑफिशयल सर्व्हिस सेंटरवर रिप्लेस किंवा रिपेयर केला आहे की नाही याची माहिती तुम्ही खूप सोप्या पद्धतीने चेक करु शकता. हे चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटिंगमध्ये जावे. डिस्प्ले आणि ब्राइटनेसवर क्लिक करावे आणि आप ट्रू टोन एक्टिव करावे. जर ते एक्टिव होत नसेल तर आयफोन रिपेयर केलेला असू शकतो. जर सर्व गोष्टी लक्षात घेऊन आयफोन खरेदी कराल, तर कोणत्याही नुकसानाचा सामना करावा लागणार नाही. त्याशिवाय आयफोनची बॉडी सुद्धा चेक करायला हवी, जेणेकरुन बॉडीवर कोणत्याही प्रकारचा तडा गेलेला नसावा. एखादा सेकंड हँड आयफोन खरेदी करताना सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.
Google Will Launch New Features
शासनाचे आदेश : विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत !
राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजे 22 एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यामध्ये काही दिवसांपासून विदर्भ माराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातही तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे.त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहेत.
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक 20.04.2024 पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे. तसेच राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. तसेच वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी,असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढले आहे.
Google Will Launch New Features