महाराष्ट्रराजकीयस्थानिक बातम्या

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट, रोज बैठकांचे सत्र

Intelligence Agencies Alert : केंद्रीय गुप्तचर व तपास यंत्रणांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अतिसंवेदनशील यादीत समाविष्ट केले गेले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील 228  तर जिल्ह्यातील 114 हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची यादी तयार !

काही दिवसांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिस विभाग फ्रंट मोडवर आला आहे. शहरातील 227 तर 114 हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. त्याशिवाय 53 कुख्यात गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत 6 गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारीदेखील केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

16 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून देशाच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. पाच महिन्यांपासून पोलिस यंत्रणा या निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागली होती. जानेवारी महिन्यात पोलिस ठाणेनिहाय मतदान केंद्र, ईव्हीएम तयारी व पाहणी केंद्राची उभारणी, मतमोजणी केंद्राचा आढावा घेण्यात आला. गेल्या काही महिन्यांतील राजकीय ध्रुवीकरणामुळे या निवडणुकीत शांतता राखण्याचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर आहे.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

Intelligence Agencies2639 गुन्हेगारांची यादी तयार

शहर पोलिसांनी जानेवारीअखेर 2,639  गुन्हेगारांची यादी तयार केली होती. त्यांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहे. विशेष शाखांकडून शहरातील विदेशी नागरिकांची नव्याने अद्ययावत माहिती तयार करण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाकडूनदेखील सोशल मीडिया, स्थानिक गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली जात आहे.

परिमंडळ 1

पोलिस ठाणे   हिस्ट्रीशीटर          हद्दपार

सिटी चौक           21                  03

क्रांती चौक           21                  02

वेदांतनगर            01                  02

बेगमपुरा              08                  00

छावणी                10                  03

एम. वाळूज           23                 09

वाळूज                  22                00

दौलताबाद           00                  00

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

परिमंडळ 2

पोलिस ठाणे हिस्ट्रीशीटर हद्दपार

सिडको             24           01

एम. सिडको       23           00

जिन्सी              18             05

हर्सूल                03            01

मुकुंदवाडी         11            00

जवाहरनगर        14           00

उस्मानपुरा         10            03

सातारा              07            01

पुंडलिकनगर      12           १४

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

3 हजारांपेक्षा अधिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

शहरात पाेलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्याकडून सातत्याने शहरातील प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीएसंदर्भाने कठोर आदेश देण्यात आले आहेत. एकट्या परिमंडळ 1 च्या 8 पोलिस ठाण्यांतर्गत 2 हजार 41 गुन्हेगारांवर सीआरपीसी 107, 109 व 110 अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात भविष्यात गुन्हेगार कृत्य न करण्याबाबत नोटीस बजावून अनेकांकडून बाँड घेण्यात आले. शिवाय, अनेक गुन्हेगार, समाजकंटकांना ठरावीक काळानंतर ठाण्यात हजेरी लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

सिल्लोड, पैठणमध्ये सर्वाधिक प्रतिबंधात्मक कारवाया

उपविभाग                                      हिस्ट्रीशीटर हद्दपार प्रतिबंधात्मक कारवाया

पैठण                                                 31           12           100

सिल्लोड                                            19            12           208

कन्नड                                                23            02            99

वैजापूर                                              11            05          101

गंगापूर                                              14            03             62

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

2022  च्या अभिलेखानुसार जिल्ह्यात 112 कुख्यात गुन्हेगार सक्रिय होते. 2023 मध्ये त्यात 6  गुन्हेगारांची भर पडली. यात प्रामुख्याने पिशोर, पैठण, पाचोड, सिल्लोडमध्ये सर्वाधिक संख्या आहे.

गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट, रोज बैठकांचे सत्र !

केंद्रीय गुप्तचर व तपास यंत्रणांकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अतिसंवेदनशील यादीत समाविष्ट केले गेले आहे. परिणामी, जालना व औरंगाबाद मतदारसंघात काहीही होऊ शकते, अशी शक्यतादेखील या यंत्रणांच्या अहवालातून निदर्शनास आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्या अनुषंगाने काही दिवासांपूर्वीच बीएसएफची एक तुकडी शहरात दाखल झाली. त्याशिवाय, अलर्टनंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडून सातत्याने बैठका घेऊन आढावा घेतला जात आहे.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

देशातील टॉप 5 स्वस्त शहरांची यादी !

Intelligence Agenciesमुंबई भारतातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर येते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. याशिवाय देशात सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत राष्ट्रीय राजधानी मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच पुणे हे देखील देशातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत येते. म्हणजेच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे शहरे ही देशातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत आहेत. मात्र आज आपण देशातील टॉप पाच स्वस्त शहरांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण अशा पाच शहरांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे राहणे, खाने-पीणे, फिरणे, शॉपिंग करणे, भाड्याने घर घेणे किंवा घर परचेस करणे इतर शहरांच्या तुलनेत काहीसे स्वस्त आढळून आले आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया भारतातील सर्वात स्वस्त शहर कोणते आहेत.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

 भारतातील सर्वात स्वस्त शहरांची यादी खालील प्रमाणे

उदयपूर : राजस्थान राज्यातील उदयपूर हे शहर देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. हे शहर खूपच निसर्गरम्य असून या शहरात राहण्याचा खर्च हा खूप कमी आहे. इतर शहरांच्या तुलनेत या शहरात राहणे परवडणारे आहे. प्रवास भाडे, कपडे, फूड, शिक्षण, आरोग्य, खानपान, राहणे, फिरणे या साऱ्या गोष्टींवर या ठिकाणी कमी प्रमाणात खर्च करावा लागू शकतो असा अंदाज आहे.

अहमदाबाद : हे वेगाने विकसित होत असलेले देशातील एक प्रमुख शहर आहे. गुजरात राज्यातील हे शहर मात्र देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत येते. येथे देखील प्रवास भाडे, कपडे, फूड, शिक्षण, आरोग्य, खानपान, राहणे, फिरणे या साऱ्या गोष्टी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

Intelligence Agenciesचेन्नई : चेन्नईला दक्षिण भारताची सामाजिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर दक्षिण भारताच्या सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवते. हेच कारण आहे की साऊथ इंडिया कॅपिटल म्हणून या शहराला ओळख प्राप्त झालेली आहे. हे एक सर्वात सुरक्षित आणि स्वस्त शहरांपैकी एक आहे. हे शहर राहणे, खाने-पीने, फिरणे, घर खरेदी, भाड्याने घर घेणे  इत्यादीसाठी स्वस्त आहे. हे सुंदर शहर देशातील सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत येते.

हैदराबाद : हैदराबाद हे एक प्रमुख आयटी हब म्हणून ओळखले जाते. या शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. मात्र असे असले तरी आयटी हब म्हणून नावारूपाला आलेले हे शहर देशातील सर्वाधिक स्वस्त शहरांच्या यादीत येते हे विशेष. येथे राहणे, खाने-पिणे, फिरणे, घर खरेदी, घर भाड्याने घेणे स्वस्त असल्याचे म्हटले जाते. यामुळे अनेक जण नोकरीसाठी हैदराबादला पसंती दाखवतात.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सावधतेचा इशारा!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण एकीकडे जोरात तापत असतानाच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यातच सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तायार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवली आहे.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

Intelligence Agenciesराज्यात उष्णतच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने यंदा फेब्रुवारी महिन्यात याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. तसेच लोकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत व्यापक जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाशल्यचिकित्सकांच्या अखत्यारितील आरोग्य यंत्रणांनी व्यापक सर्वेक्षण करणे तसेच उष्णतेसदर्भातील आजारांचे सर्वेक्षण करून नियमितपणे आपले अहवाल आरोग्य विभागाच्या पोर्टलवर संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे ज्या भागात उष्णता विकारांचे प्रमाण वाढलेले आढळेल तेथे तात्काळ आरोग्य यंत्रणेला तसेच महापालिकांशी समन्वय साधून उपाययोजना केल्या जातील. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचे डेथ ऑडिट जिल्हास्तरिय डेथ ऑडिट समितीकडून एका आठवड्यात करण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

देशात 1992 ते 2015 या काळात उष्णतेच्या लाटेमुळे 22,562 लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात 2023 मार्च ते जुलै महिन्यात राज्यात 3,191 लोकांना उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागले होते तर याच काळात राज्यात 22 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. मुंबई महापालिका क्षेत्रात 155 लोकांना उष्माघाताचा फटका बसला होता तर अमरावती 125,  बुलढाणा 43, चंद्रपूर 196, लातूर 190, नागपूर 362, नंदुरबार 220,नांदेड 96, पुणे 409, रायगड 412, ठाणे 156, वर्धा 340 आणि यवतमाळमध्ये 97 जणांना उष्माघाताचा फटका बसला होता.

यंदा मार्च महिन्यात राज्यात 33 जणांना आतापर्यंत उष्माघाताचा फटका बसून रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या पर्श्वभूमीवर कोणत्या वर्गाला उष्माघाताचा फटका बसू शकतो याचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना व कृती आराखडा आरोग्य विभागाने तयार केल्याचे डॉ नितीन अंबाडेकर म्हणाले.

उन्हाचा फटका बसू नये यासाठी काय काळजी घ्यावी तसेच कोणते कपडे परिधान करावे याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत असली तरी तापत्या राजकीय वातावरणाचा विचार करून आरोग्य यंत्रणेला सज्ज राहाण्यास सांगण्यात आले आहे.

Breaking 2024 Intelligence Agencies Alert

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button