स्थानिक बातम्या

Breaking 2024 Kironotsava at Daityasudan Temple

लोणार दैत्यसूदन मंदिर येथे किरणोत्सवास प्रारंभ ! 

Kironotsava at Daityasudan Temple : दैत्यसुदन मंदिराचं मुख्य महत्व म्हणजे या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या दोघांचा अप्रतीम मिलाप असल्याचा साक्षात्कार दरवर्षी पाहायला मिळतो. तो असा कि ह्या मंदिरामध्ये दरवर्षी किरणोत्सव होतो.

लोणार दैत्यसूदन मंदिर येथे किरणोत्सवास प्रारंभ ! 

Kironotsava at Daityasudan Temple

वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचा सुंदर मिलाप !

लोणार : दैत्यसूदन मंदिर हे नव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्य शैलीतील पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. कोणार्क सूर्य मंदिर व खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्य शैलीच्या आधारे या मंदिराची रचना केलेली असल्याचे दिसून येते. मुख्यतः हे मंदिर श्री भगवान विष्णू यांना समर्पित केले असून या मंदिरामध्ये भगवान विष्णूची मूर्ती स्थापित केलेली आहे.

Kironotsava at Daityasudan Temple

Kironotsava at Daityasudan Templeपौराणिक कथांच्या आधारे या मूर्तीचे वर्णन आहे. भगवान विष्णू ने लोणारला लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला व त्या राक्षसाच्या नावावरून या गावाला लोणार हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. श्री भगवान विष्णू यांनी लवणासुराचा वध करून त्याच्या पोटावर उभी असलेली सुंदर अशी श्री विष्णूची मूर्ती आहे. लवंग या शब्दाचा संस्कृत मध्ये मीठ असा अर्थ होतो. प्राचीन काळापासून लोणार सरोवर चे पाणी खारे आहे. पूर्वी लोणार येथे मीठ बनवले जायचे असे काही प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन आहे.

Kironotsava at Daityasudan Temple

दैत्यसुदन  मंदिराचं मुख्य महत्व म्हणजे या मंदिरामध्ये वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या दोघांचा अप्रतीम मिलाप असल्याचा साक्षात्कार दरवर्षी  पाहायला मिळतो. तो असा कि  ह्या मंदिरामध्ये दरवर्षी किरणोत्सव होतो. हा किरणोत्सव जवळपास पाच दिवस भाविक भक्तांना अनुभवायला मिळतो. किरणोत्सव हा साधारणतः फक्त दहा मिनिटाचा असतो. त्यामुळे भाविक भक्तांची आणि अभ्यासकांची मंदिरामध्ये खूप गर्दी होते. Kironotsava at Daityasudan Temple

जगप्रसिद्ध उल्का विवरासोबतच लोणारमध्ये एक अपरिचित, प्राचीन पण तितकीच सुंदर वास्तू दैत्यसुदन मंदिराच्या स्वरूपात  उभी आहे. लाखो वर्षापूर्वी अशनी कोसळून तयार झालेल्या विश्वविख्यात सरोवराभोवतालच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. दैत्यसुदन मंदिर हे त्यातलं सर्वात उत्कृष्ट आणि विलक्षण सुंदर आहे. विदर्भातल्या कडकडीत उन्हाळ्यात लांबचा प्रवास करून इथे यायचं म्हणजे एक साहसच म्हणावे लागेल. पण मंदिर पाहिल्यावर मिळणाऱ्या समाधानात पर्यटकांना इथे येण्याचं सार्थक होतं.

Kironotsava at Daityasudan Temple

Kironotsava at Daityasudan Temple

चालुक्य सत्तेच्या काळात राजा विक्रमदित्याने ११ व्या शतकादरम्यान बांधलेले हे मंदिर अनेक शतके मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाले होते. अंदाजे 1878 मध्ये हे मंदिर उजेडात आले. मूळ बांधकामाची हेमाडपंथी शैली अतिशय सुबक आणि मनमोहक आहे. बाहेरून हे मंदिर अनियमित ताऱ्यासारखं दिसतं. मंदिराचं आवार प्रशस्त आणि फरसबंदी आहे. संपूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूने एकाच साच्यातून काढल्याप्रमाणे सलग नक्षीदार खांब कोरून काढले आहेत. त्यावरील विविध देवतांच्या मूर्त्या, चित्ररूपी कथाप्रसंग,  विविध शिल्पे आपल्याला जागीच खिळवून ठेवतात. अगदी जीव ओतून कोरलेल्या या शिल्पचित्रांमध्ये मूर्तींचे सूक्ष्म हावभाव टिपत त्यांना जणू काही जिवंतपणा आणला आहे. जराही कुठे मोकळी जागा न सोडता केलेलं रेखीव आणि चित्तवेधक नक्षीकाम लाजवाब आहे. Kironotsava at Daityasudan Temple

मुख्य द्वार सोडले तर इतर तिनही दिशांना बाहेरच्या बाजूस सूर्य, चामुंडा, नरसिंह आदी देवतांची छोटी-छोटी सुंदर मंदिरे कोरली आहेत. आतमध्ये 3 भाग होतात. गर्भगृह त्यानंतर अंतराळ आणि सर्वात बाहेर सभामंडप. अंतराळात छतावर लवणासुर वध, गंगावतरण, कृष्ण गोपिका, हिरण्यकश्यपू वध असे प्रसंग कोरलेले आहेत. त्यावरील न उडालेले रंग अजूनही स्पष्ट दिसतात. हे मंदिर त्या काळात या भागातील एक महत्वाचे केंद्र नक्कीच असावे. हे मंदिर प्राचीन भारतातील वैभवसंपन्न सत्तेची,  प्रगत स्थापत्यशैलीची, समाजजीवनाची ओळख करून देतं. Kironotsava at Daityasudan Temple

Kironotsava at Daityasudan Templeआत गाभाऱ्यामध्ये  काळ्या पाषाणातील शस्त्रधारी भगवान विष्णू आणि पायांखाली लवणासूर राक्षसाचा वध अशा स्वरूपातील मूर्ती आपल्याला जागीच खिळवून ठेवते. मूर्तीत धातूचे प्रमाण जास्त आहे. उन्मत्त लवणासुर राक्षसाचे पारिपत्य करण्याची विनंती पृथ्वीने श्री विष्णूस केली. तेव्हा आघाताने लवणासुरास मारण्याचे वचन पृथ्वीस दिले. आघातावेळी पृथ्वीचा नाश होऊ नये म्हणून बालरूपात येऊन भगवान विष्णूने लवणासुरास मारले. लवणासुराच्या अस्थींमुळे सरोवराचे पाणी खारट झाले अशी कथा सांगतात.

डोळे बंद करून शांत चित्ताने मूर्तीवर लक्ष केंद्रित करत, अंतर्मुख व्हावे अशी सुबक श्री भगवान विष्णू ची मूर्ती आहे. अशावेळी जे आत्मसुख मिळते ते शब्दांपलीकडले आहे. पण गर्भगृहातली मूर्ती हि मूळ मूर्ती नाही. ती कुठे गेली, कशी  गायब झाली, कोणी  उध्वस्त केली का ? अजून काहीही कळालेले नाही. सध्याची मूर्ती हि नागपूरच्या भोसले राजांनी पाठवली असून ती बऱ्याच नंतरच्या काळातली आहे. Kironotsava at Daityasudan Temple

Kironotsava at Daityasudan Templeदुर्दैवाने आज इतक्या अद्वितीय मंदिराची मूळ मूर्ती आणि शिखर गायब आहे. आत-बाहेरील मूर्त्या, मंदिराचा बराचसा भाग उध्वस्त झाला आहे. मूळ मूर्ती आणि कळस शाबूत असते तर मंदिर आज आहे त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुंदर दिसले असते. नंतरच्या काळात द्वाराच्या कमानींची, उध्वस्त भागाची दुरुस्ती विटांनी करायचा प्रयत्न केलेला दिसतो, जे मूळ मंदिराच्या सौंदर्यास गालबोट लावतं. मूळ मंदिर बांधणीची प्रगत कला उत्तरोतर कशी लोप पावत गेली आणि आज तर आपण ती अगदीच हरवून बसलो आहोत याची खंत प्रत्येक पर्यटकाला, भाविक भक्ताला जाणवते.

विलक्षण अद्भुत स्थापत्यरचना, नाजूक कोरीवकाम, उत्कृष्ट शिल्पकला, शिल्पांचे वैविध्य, त्यावरील भाव हे आपल्या प्रगत प्राचीन भारतीय कलेचा परिचय देत दैत्यसुदन मंदिर आज उभे आहे.हे सगळं पाहताना, कितीही वेळा पाहिलं तरी मन भरून येत नाही, पुनःपुन्हा मन त्या अद्वितीय, अलौकिक कलाकृतीत गुंतून बसत. खरंच आश्चर्य हे आहे कि,  ज्यांनी एवढी अलौकिक कलाकृती स्वतःच्या हातांनी निर्माण केली, त्यांनी आपली साधी निशाणीही पाठीमागे सोडलेली दिसत नाही. मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या पिवळसर सोनेरी प्रकाशातील या दगडी शिल्पाचे सौंदर्य डोळ्यांत भरून घेत,  येणारा प्रत्येक जन  नतःमस्तक होतांना दिसतो.

Lonar News YouTube Channel

फोटो : उमेश चिपडे, लोणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button