Loni : संत सखाराम महाराज मंदिरात विधिवत पूजा अर्चना आरती झाल्यावर संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन भक्तांनी प्रसादाचे सेवन केले.
Loni : श्री क्षेत्र लोणी यात्रेत भक्तांची मांदीयाळी…..
संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराजांच्या 146 व्या पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी श्री श्रेत्र लोणी येथे भक्तांचा जनसागर उसळला असून भाविक भक्तांनी शांततेत संत सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ व मराठवाडयातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्रेष्ठ श्री सखाराम महाराज श्री क्षेत्र लोणी येथे यात्रा महोत्सव सुरु झाला आहे. रोषणाई आणि भरगच्च बाजारपेठने लोणी परिसर फुलून गेला आहे. (Loni)
वाशिम जिल्हातील रिसोड तालुक्यातील लोणी येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराजांची पुण्यतिथी व महापंगत संपन्न झाली. यावेळी आयुष व आरोग्य केंद्रिय मंत्री खा. प्रतापराव जाधव, मेहकर विधानसभा माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर, श्री शिवाजी शिक्षण संस्था सचिव प्रकाशराव मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, कल्याण महाराज जोशी, पांडुरंग मुंढे, अरुण गीते, राजू सानप आदी उपस्थित होते. संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भ तसेच मराठवाड्यातून लाखोच्या संख्येने भक्तांनी गर्दी केली. लोणी येथील रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. Lonar News YouTube Channel
संत सखाराम महाराज मंदिरात विधिवत पूजा अर्चना आरती झाल्यावर संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन भक्तांनी प्रसादाचे सेवन केले. संत सखाराम महाराजांच्या महाप्रसाद मध्ये पुरीला अनन्य साधारण महत्व असून हा पुरीचा प्रसाद भक्त घरी नेऊन आपल्या धान्याच्या कोठारात किंवा पैशाच्या तिजोरीत ठेवतात. धान्याला बरकत येते, वैभव प्राप्त होते अशी भाविकांची यामागे धारणा असल्याचे सांगण्यात येते. या महोत्सवादरम्यान भक्तांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली. शेकडो स्वयंसेवकानी महाप्रसाद वितरणासाठी श्री चरणी सेवा दिली. (Loni)
लोणी यात्रेतील रथोत्सवाचे यंदा शंभरावे वर्ष
संत सखाराम महाराज यात्रेला शतकोत्तर परंपरा रविवारी शताब्दी रथोत्सव
अशी आहे रथोत्सवाची परंपरा…..
श्री सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचे विशेष महत्त्व असणाऱ्या पुरीच्या प्रसादाची सुरुवात दरवर्षी प्रमाणे कार्तिक वद्य त्रयोदशीला भव्य प्रमाणात करण्यात येते. मंदिराच्या कोठीघरातून वाजतगाजत स्वयंपाकाचे साहित्य यात्रेच्या स्वयंपाक घरात आणण्यात येते. स्वयंपाक घरातील पूजेचा मान गोसावी घराण्याकडे आहे. सर्वप्रथम कणकेच्या उंड्यातील काही भागाची गणपतीची पार्थिव प्रतिमा तयार करून विधीवत गणेश व अन्नपूर्णा पूजन केले जाते. उंडयाच्या शेष भागाची पहिली पुरी तयार केली जाते. त्यानंतर अग्निकुंडाचे पुजन केले जाते. नंतर पहिली पुरी शुद्ध तुपात तळून विधीपूर्वक स्वयंपाकाची सुरुवात होते. विविध ठिकाणाहून येणारी नवसेमंडळी दोन दिवस रात्रंदिवस शिरापुरीचा प्रसाद तयार करतात. हजारो भक्त श्रद्धेने शिरापुरीचा प्रसाद ग्रहण करतात. ज्याला पुरीचा प्रसाद मिळाला त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.