महाराष्ट्र

1 Breaking – Spiritual Heritage – नागपूर

कामठीतील श्री महादेव घाट परिसरात शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन

Spiritual Heritage : शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spiritual Heritage : शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती 

नागपूर : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या अहंकाराला दूर करण्याचे मार्ग आध्यात्मात मिळतात. शिवतांडव स्तोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून आपण सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 मार्च 2025 रोजी येथे केले.

Spiritual Heritageकामठीतील श्री महादेव घाट परिसरात शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर, राजे मुधोजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते. (Spiritual Heritage)

अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल कामठीतील शिवराज्य प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या स्वसंरक्षणार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासोबतच शिव तांडव स्तोत्र पठण यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. शिव तांडव स्तोत्र पठण या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुकोदगार काढले तसेच येत्या काळातही अशा प्रकारचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. (Spiritual Heritage)

भोसला सैनिके शाळेमुळे सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी,देशासाठी शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे कार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण

जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण

Spiritual Heritageनागपूर : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलासाठी उत्कृष्ट अधिकारी तसेच आधुनिकतेला स्विकारणारे व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे काम होत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व जनरल बिपीन रावत यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे सेवानिवृत्त एयर चिफ मार्शल शिरीष देव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, संस्थेचे कुमार काळे, दिलीप चव्हाण, राहूल दिक्षीत, हेमंत देशपांडे, विवेक रानडे, संजय जोशी, अमरेंद्र हरदास आदी उपस्थित होते. (Spiritual Heritage)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समाजामध्ये सैनिकी मुल्यांचे रोपण व सैन्याचे भारतीयीकरण तसेच त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसला सैनिकी शाळेची स्थापना झाली. आधुनिकतेला स्वीकारणारी पिढी निर्माण करण्याचे काम संस्‍थेच्या माध्यमातून होत आहे. अनुशासित भारत घडविण्याच्या कार्यासोबतच सैन्यदलाला आधुनिकतेकडे घेवून जाणारे सैन्यदल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी.

Spiritual Heritageसंपूर्ण भारतीयांना मेजर बिपीन रावत यांच्या कार्याची व आदर्शांची कायम आठवण रहावी, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र देशात तयार होत आहेत व आपण या शस्त्रांची निर्यातही करत आहोत. भारताने नेहमी शांतीसाठी कार्य केले असल्यामुळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

एयर मार्शल शिरीष देव यांनी भोसला सैनिकी शाळा ही एनडीए च्या धर्तीवर विकसित होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सैनिकी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा तसेच सैनिकी शिक्षणाबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Spiritual Heritage)

माजी सैन्य दल प्रमुख मनोज पांडे म्हणाले, जनरल बिपीन रावत हे देशासाठी अलौकीक कार्य करणारे व विकसित
भारतामध्ये सशस्त्र दलाला आधुनिकतेकडे नेणारे दूरदर्शी नेतृत्व होते. तिन्ही दलाला एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासोबतच युद्धासाठी कायम सज्जता असावी अशा विचारांचे असल्यामुळे भारतीय सैन्य दलात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी स्वागत करून संस्थेमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले. सैनिकी शिक्षणाची सुरूवात करणारे संस्थेचे संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण ही संस्थेसाठी महत्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रख्यात शिल्पकार प्रदिप शिंदे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षला राजगिरे यांनी केले. तर राहूल दीक्षीत यांनी आभार मानले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. (Spiritual Heritage)

Lonar News YouTube Channel

Team Lonar News

लोणार न्यूज वेब पोर्टल हे स्थानिक, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बातम्या देणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे. सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, आरोग्य, क्रिडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, करियर अशा अनेक विषयांवर बातम्या व लेख प्रकाशित करण्यासाठी लोणार न्यूज वेब पोर्टल टीम कायम प्रयत्नशील आहे. वाचकांमध्ये लोणार न्यूज वेब पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button