महाराष्ट्र

Breaking 2024 Shri Sant Tukaram Maharaj !

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 28 जूनला प्रस्थान !

Shri Sant Tukaram Maharaj! देहू ते पंढरपुर या पालखी मार्गावर वारीतील वारकर्यांना विविध सुविधा देण्यासाठी एक महिना अगोदर पालखी मार्गाची पाहणी केली जाणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे यांनी सांगितले.

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 28 जूनला प्रस्थान !

जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून 28  जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 19 दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा 16  जुलै रोजी पंढरीत दाखल होईल. 17  ते 20 जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 339 वे वर्ष आहे.

Shri Sant Tukaram Maharaj!

याबाबतची माहिती देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली. पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल मोरे, माणिक मोरे, संतोष मोरे महाराज यांची निवड करण्यात आली आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करत असतात. प्रस्थान ठेवल्यानंतर इनामदार वाड्यात पालखी सोहळा पहिला मुक्काम करणार आहे. संत तुकारामांची पालखी 16 जुलै रोजी पंढरीत दाखल होणार असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.

Shri Sant Tukaram Maharaj !

पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

Shri Sant Tukaram Maharaj28 जूनला दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान होणार असून  पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात राहणार आहे . 29 जूनला पालखी सोहळा आकुर्डीत मुक्कामी असणार आहे. 30  जूनला पालखी पुण्यात दाखल होणार असून दोन दिवस नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे. 2  जुलैला पालखी सोहळा लोणी काळभोर ला , 3  जुलैला, 4  जुलैला वरवंड, 5  जुलैला उडंवडी गवळ्याची, 6  जुलैला बारामती शारदा विद्यालय, 7 जुलैला सणसर पालखी तळ, 8  जुलैला पालखी आंथुर्णेत मुक्कामी असून बेलवाडीत दुपारी पहिले गोल रिंगण होणार आहे.

Shri Sant Tukaram Maharaj!

9  जुलैला निमगाव केतकी, 10  जुलैला इंदापूर पालखी तळावर मुक्काम असून दुपारी गोल रिंगण होणार  आहे. 11  जुलैला सराटी पालखी तळ, 12  जुलैला अकलूज माने विद्यालय पालखी तळावर मुक्कामी असून दुपारी गोल  रिंगण होणार आहे. 13  जुलैला बोरगाव येथे मुक्कामी असून दुपारी माळीनगर उभे रिंगण होणार आहे. 14  जुलैला पिराची कुरोली , 15  जुलैला वाखारीला उभे रिंगण होणार आहे. 16 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर संत तुकाराम महाराज नवीन इमारत येथे पालखी सोहळा दाखल होणार असून याठिकाणी उभे रिंगण होणार आहे.  17  जुलै रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत. चार दिवसांच्या पंढरीतील मुक्कामानंतर 21  जुलैला पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

Shri Sant Tukaram Maharaj!

पालखी सोहळ्या निमित्त संत तुकाराम महाराज संस्थानाची जय्यत तयारी सुरू आहे. देहू ते पंढरपुर या पालखी मार्गावर वारीतील वारकर्यांना विविध सुविधा देण्यासाठी एक महिना अगोदर पालखी मार्गाची पाहणी केली जाणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे यांनी सांगितले.

श्री संत तुकाराम महाराज !

Shri Sant Tukaram Maharajसंत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

Shri Sant Tukaram Maharaj!

जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा !’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.

Shri Sant Tukaram Maharaj!

संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकाराम महाराजांचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे.

Shri Sant Tukaram Maharaj!

गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत.

Shri Sant Tukaram Maharaj!

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. 1568, इ.स. 1577, इ.स. 1608 आणि इ.स. 1598 ही आहेत. इ.स. 1650 मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहांता पासून आहे.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते 17-18 वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.

Shri Sant Tukaram Maharaj!

Shri Sant Tukaram Maharajतुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.

Shri Sant Tukaram Maharaj!

देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिल्याचे सांगण्यात  येते. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले.

Shri Sant Tukaram Maharaj!

कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव “हरिनामात” गढलेले असायचे.

Shri Sant Tukaram Maharaj!

चित्रपट आणि लोकप्रिय साहित्य

1936 – संत तुकाराम – संत तुकाराम महाराजवरील हा चित्रपट मुबई मध्ये मोठया पडद्यावर दाखवण्यात आला आणि तो पाहण्यासाठी खेडेगावातील असंख्य लोक चालत आले होते.

1963 – सांता तुकाराम – कन्नडमध्ये

1965 – संत तुकाराम – हिंदी मध्ये

1973 – भक्त तुकाराम – तेलगूमध्ये

2012 – तुकाराम – मराठी मध्ये

भारतातील सर्वात मोठी कॉमिक बुक सीरिज असलेल्या अमर चित्र कथाच्या 68 व्या अंकात तुकारामांचे जीवन होते.

2002 मध्ये भारत सरकारने 100 रुपयांच्या रौप्य स्मारकाचे नाणे काढले.

तुकाराम महाराजांचे नाव दिलेली ठिकाणे

तुकाराम उद्यान (निगडी-पुणे)

तुकारामनगर (खराडी-पुणे)

तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)

तुकारामनगर (पिंपरी-पुणे)

तुकारामवाडी (जळगांव)

तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व)

तुकारामवाडी (पेण-कोंकण)

संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)

Shri Sant Tukaram Maharaj!

पुस्तके

संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध यादी[3]

  1. संत तुकाराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या भक्तीकाव्याचा तुलनात्मक अभ्यास
  2. श्री संत तुकाराम व्यक्तित्व व कवित्व
  3. संत तुकाराम : व्यक्ती आणि वाण्ग्मय
  4. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन संदर्भ आणि चिंतन : एक अभ्यास
  5. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनौपचारिक मूल्यशिक्षणाचा अभ्यास
  6. संत तुकाराम महाराज आणि त्यांची विठ्ठलभक्ती
  7. संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील मुल्यविचारांचा अभ्यास
  8. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत रामदास यांच्यासाहित्यात प्रतिबिंबित झालेले चित्तवृतीनिरोधाचे मार्ग
  9. संत एकनाथ व संत तुकाराम यांचा अनुबंध : एक अभ्यास
  10. संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास
  11. संत तुकारामांच्या गाथेवरील स्वातंत्र्योत्तर समीक्षेचा अभ्यास
  12. संत तुकाराम गाथा – लोकतत्त्वीय अभ्यास
  13. मराठी साहित्यात प्रतिबिंबित झालेले संत तुकारामांचे व्यक्तिमत्त्व
  14. संत साहित्यातील कल्याणाच्या अर्थशास्त्राचा एक तौलनिक अभ्यास : विशेष संदर्भ – संत तुकाराम ,ज्ञानेश्वर, एकनाथ व नामदेव
  15. संत तुकारामांची गौळण रचना : स्वरूप आणि चिकित्सा

Shri Sant Tukaram Maharaj!

Lonar News YouTube Channel

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button